सांगोला येथे ४थे स्व.भाई गणपतरावजी देशमुख आदिवसी धनगर साहित्य संमेलन मोठ्या जल्लोषात
सांगोला येथे ४थे स्व.भाई गणपत रावजी देशमुख आदिवसी धनगर साहित्य संमेलन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृती भवन मध्ये मोठ्या जल्लोषात पार पडले.दोन दिवसीय या संमेलनात पहिल्या दिवशी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर व डाक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास संमेलन अध्यक्ष आर. एस.चोपडे व कार्यकारणीनी पुष्प हार अर्पण करुन ग्रंथ दिंडीने संमेलनाची अत्यंत उत्साहात,जल्लोषात सुरुवात झाली.
ग्रंथदिंडी मध्ये अनेक शालेय मुलामुलींनी लेझीम,धनगरी गजनृत्य,पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची वेशभूषा,बापू वाटेगावकर वेशभूषा, वाघ्या मुरली वेशभूषा, खंडोबा बानू वेशभूषा, वारकरी वेशभूषा, अशा प्रकारच्या लक्षवेधक रैली ने संपूर्ण सांगोला शहराचे लक्ष वेधले .उदघाटनाच्या वेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुतळ्यास व स्व.भाई गणपतरावजी देशमुख यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलीत केले.कोरोनाने मरण पावलेल्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली.प्रा.संजय शिंगाडे सरांनी मार्मिक वेधक प्रास्ताविक केले.संमेलन अध्यक्ष आर. एस चोपडे यांनीं आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की,” आजच्या तरुणानी येळकोट, येळकोट जय मल्हार चा आवाज वाढवावा,आतापर्यंत ७५ वर्षाच्या कालावधीत आपले २ खासदार व २०आमदार झाले याचा विचार करणे गरजेचे आहे. विधानसभेत व लोकसभेत आपले लोक कमी असल्यामुळें आपल्या समाजाचे प्रश्न सुटत नाहीत. धनगर समाजाची निरपक्षीय संघटना व्हायला पाहिजे.”या वेळी धनगर समाजाच्या साहित्यिकांची काही पुस्तके मान्यवरांचे हस्ते प्रकाशित करण्यात आली. तर काही मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले. नंतरच्या सत्रात शालेय मुलामुलींच्या सांस्कृतीक कार्यक्रमाने भरपूर मनोरंजन केले.कविसंमेलनात अनेक कवी वकवयित्रीनी सकस,दर्जेदार कवीता सादर केल्या,एकंदरींत या संमेलनात मनोरंजना बरोबरच वैचारीक माहिती ही मिळाल्याने धनगर समाज बांधव तृप्त झाला.उदघाटनाच्या वेळी श्रीमती रतन गणपतराव देशमुख, चंद्रकांत देशमुख, बाबासाहेब देशमुख तहसिलदार अभिजीत पाटील,संस्थापक अभिमन्यु टकले सर,मुख्याधिकारी कैलास केंद्रे,बाळासाहेब करनवर,राणीताई माने,संमेलन अध्यक्ष आर. एस.चोपडे, स्वागताध्यक्ष प्रा.संजय शिंगाडे,प्रा.यशपाल भिंगे सर अमोल पांढरे आदि मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्रातून विविध भागातून साहित्यिक पत्रकार व समाज बांधव उपस्थित होते.