Share this...

सहावे राष्ट्रीय आदिवासी धनगर साहित्य संमेलन शनिवार व रविवार दिनांक 11 व 12 एप्रिल 2026 रोजी होळकर वाडा चांदवड जिल्हा नाशिक येथे होणार आहे. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर प्रकाश महानवर कुलगुरू पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर यांची निवड झालेली आहे. अशी माहिती सस्थापक अध्यक्ष प्राचार्य डॉ. अभिमन्यू टकले यांनी कळवले आहे.
या साहित्य संमेलनाचे कार्यवाहक प्राचार्य दत्तात्रय बारगळ हे आहेत तर संयोजक बापूसाहेब शिंदे हे आहेत. साहित्य संमेलन मार्गदर्शक व महाराष्ट्राचे अध्यक्ष बाळासाहेब कर्णवर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. तसेच एडवोकेट सौ. जयश्री तेरकर कवयित्री या महाराष्ट्राच्या महिला विभाग अध्यक्ष आहेत. साहित्य संमेलनाचे उद्घाटक युवा नेते आमदार गोपीचंद पडळकर हे आहेत.साहित्य संमेलनाची सुरुवात ग्रंथ दिंडीने होणार आहे. साहित्य दिंडीचे उद्घाटन श्रीमंत अमरजीत बारगळ राजे यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख उपस्थितीमध्ये दिंडीच्या उद्घाटनास श्री वैभव बागुल नगराध्यक्ष चांदवड.श्री अभिमन्यू होळकर चांदवड हे असतील. यानंतर साहित्य संमेलनाचा उद्घाटन सोहळा होईल. उद्घाटन आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते दीप पूजन करून व भंडारा उधळून येळकोट येळकोट जय मल्हारच्या गजरात होईल.

उद्घाटन समारंभाला खालील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
मा. राम शिंदे सभापती विधान परिषद महाराष्ट्र शासन.
मा. सुधीर दास महाराज काळाराम मंदिराचे मुख्य पुजारी महंत महामंडलेश्वर.
मा. डॉक्टर प्रकाश महानवर नियोजित संमेलन अध्यक्ष. माजी आमदार रामहरी रुपनवर संमेलन अध्यक्ष.आमदार गोपीचंद पडळकर साहित्य संमेलन उद्घाटक. श्री रामराव वडकुते खासदार राज्यसभा.
माजी आमदार हरिदास हरिदास जी भदे. मा. श्री सैतान सिंग पाल मंत्री मध्य प्रदेश. मा. उत्तम कांबळे माजी अध्यक्ष अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन.मा. सुभाष बोंद्रे कार्यकारी संपादक दैनिक दिव्य मराठी महाराष्ट्र राज्य.उद्घाटन सोहळ्यामध्ये ज्या साहित्यिकांना आपल्या पुस्तकांचे प्रकाशन करायचं आहे त्यांचं प्रकाशन केलं जाईल.आपल्या साहित्य संमेलनाचे व्यासपीठ सर्व जाती धर्मातील साहित्यिकांसाठी खुले राहील तसेच या उद्घाटन सोहळ्यामध्ये महाराष्ट्राच्या विविध क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कार्य केलेले जे मान्यवर आहेत त्यांचा पुरस्कार देऊन सत्कार केला जाईल.
पुरस्काराचे स्वरूप शाल, श्रीफळ, मानाचा फेटा, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र,काठी, घोंगडे असा असेल. तसेच चांदवडच्या विकासामध्ये जे चांदवडचे प्रश्न आहेत त्याचा पाठपुरावा करणारे चांदवडचे जे काही पत्रकार आहेत ते अगदी उत्कृष्ट कार्य करत आहेत. यामध्ये चांदवडच्या पत्रकारांचाही विशेष असा गौरव करण्यात येईल.

राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त मान्यवरांची नावे पुढील प्रमाणे आहेत.
श्री संजीवन खांडेकर सर भूम जिल्हा धाराशिव यांना उत्कृष्ट सामाजिक व शैक्षणिक कार्यासाठी पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर शैक्षणिक रत्न पुरस्कार देण्यात येणार आहे.
प्राचार्य श्री सिद्धारूढ बेडूगणर सर सोलापूर यांचे शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आणि सामाजिक सेवा अगदी उत्कृष्ट आहे. कोणत्याही कामासाठी ते सदैव तत्पर असतात. ते एका शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष असून प्राचार्य आहेत यांना श्री संत बाळूमामा समाजभूषण पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

सौ.रूपालीताई लंभाते अवचरे कवयित्री पुणे. या कवियत्री असून दिवाळी अंक व अनेक नवोदित आणि प्रख्यात लेखक यांच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्याचे काम करतात. त्यांचीही अखंड साहित्यिक सेवा सामाजिक सेवा विचारात घेऊन त्यांना कवी कालिदास साहित्य भूषण पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

श्री प्रवीण काकडे कराड, जिल्हा सातारा यांचे समाजासाठी व समाज प्रबोधनासाठी खूप मोठे कार्य आहे.दरवर्षी अनेक प्रकारचे कार्यक्रम आयोजित करून समाजातील युवकांना व युवतींना मार्गदर्शन करत असतात. प्रबोधन करत असतात. मानव सेवा करण्यासाठी प्रवृत्त करत असतात.यांना महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

श्री गणेश पुजारी पुणे या व्यक्तीने आयुष्यभर धनगर समाजाच्या सेवेसाठी वाहून घेतलेले आहे. कोणत्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता त्यांनी आजपर्यंत त्यांची सर्व हयात समाजाच्या सेवेसाठी घालवलेली आहे. अशा या महान कार्यासाठी यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

एडवोकेट बळवंतराव खोत सांगली यांचे सामाजिक कार्य अगदी उत्कृष्ट आहे. सांगलीमध्ये बाहेरून येणारे कोणीही समाजसेवक कार्यक्रम घेत असतील किंवा राज्यभर कोणत्याही प्रकारची चळवळ चालू असेल त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची अपेक्षा न करता धावून जाणारे एडवोकेट बळवंतराव खोत यांना सुभेदार मल्हारराव होळकर समाजसेवा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
श्री पवन थोटे यवतमाळ जिल्ह्यातील समाजसेवेमध्ये जीवनभर कार्यरत असलेले श्री पवन थोटे यांनी यवतमाळ जिल्ह्याची समाजसेवा जिवंत ठेवलेली आहे. तसेच राज्यभर ज्या विविध चळवळी होतात त्या चळवळीमध्ये यवतमाळकरांना सक्रिय सहभाग घ्यायला लावणारे श्री पवन थोटे यांना राजा हल सातवाहन समाजसेवा पुरस्कारने सन्मानित करण्यात येत आहे.

डॉ. महादेव बनसुडे लातूर, वैद्यकीय सामाजिक व राजकीय क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य करणारे प्राध्यापक डॉक्टर महादेव बनसुडे यांना क्रांतिरत्न विठोजी होळकर वैद्यकीय सेवा पुरस्कार देण्यात येत आहे.
श्री गोविंद गोरे नांदेड. गोविंद गोरे हे रुग्णालयामध्ये हे सर्व सामान्य कर्मचारी असलेली व्यक्ती यांना समाजाबद्दल खूप गर्व आणि अभिमान आहे तसेच रुग्णालयीन सेवा असो,समाजसेवा असो किंवा राज्यस्तरीय कुठल्याही प्रकारच्या चळवळी असो, राज्यस्तरीय कोणत्या प्रकारचे कार्यक्रम असो ते त्यामध्ये सक्रिय भाग घेतात व सर्व प्रकारचे सहकार्य करतात.अशा या व्यक्तीला आपण संत कनकदास समाजसेवा पुरस्काराने सन्मानित करणार आहोत.रविवार दिनांक 12 एप्रिल 2026 साहित्य संमेलनाचा दुसरा दिवस.

सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत परिसंवाद आणि चर्चासत्र होतील.
चर्चा सत्राचे विषय व वक्ते खालील प्रमाणे आहेत.
धनगर समाजाची शैक्षणिक स्थिती. अध्यक्ष प्राचार्य आर एस चोपडे सर सांगली.
वक्ते.प्राचार्य धोंडीराम गडदे पुणे..
धनगर जमातीच्या मेंढपाळ व्यवसायाची स्थिती काल आज आणि उद्या वक्ते चंद्रकांत हजारे आंबेजोगाई.
पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकरांची त्रि जन्मशताब्दी एक आढावा, वक्ते राम लांडे होळकर शाळेचे अभ्यासक जालना.
प्राचार्य डॉक्टर मधुकर सलगरे सर लातूर साहित्यिक व लेखक यांचेही व्याख्यान होईल.

श्री लक्ष्मण नजन सर यांचेही व्याख्यान होईल.
दुपारी तीन ते पाच साहित्य संमेलनाच्या समारोपाचा कार्यक्रम होईल.

समारोपाचे अध्यक्ष माननीय बाळासाहेब पाटील आयपीएस हे असतील. कार्यक्रमाचे उद्घाटक प्राध्यापक डॉक्टर यशपाल भिंगे सर असतील. प्रमुख उपस्थितीमध्ये माननीय बच्चुभाऊ कडू माजी आमदार व अध्यक्ष प्रहार जनशक्ती पार्टी हे असतील.मा. दिलीप भाऊ येडतकर मुख्य संपादक दैनिक विदर्भ मतदार अमरावती. मा. रेश्मा पुणेकर भारतीय बेसबॉल कप्तान. मा. श्री गणेश निंबाळकर. मा. श्री विनायक जी काळदाते कार्याध्यक्ष धनगर धर्म पेठ महाराष्ट्र राज्य.
समारोप सोहळ्यात सर्व स्थानिक संयोजक आयोजक व पाहुण्यांचा सत्कार करण्यात येईल.तसेच राहिलेल्या पुरस्कारांचे वितरण करण्यात येईल. सर्व वक्त्यांचे मार्गदर्शन होईल.
प्रमुख उपस्थितांची भाषणे होतील. धनगर जमातीवरील विविध प्रश्नावरती ठराव मांडले जातील. ठरावाचा कार्यक्रम झाल्यानंतर साहित्य संमेलना चे आभार प्रदर्शन होईल व राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप होईल संयोजन समिती.

संस्थापक प्राचार्य डॉक्टर अभिमन्यू टकले.
माननीय बाळासाहेब कर्णवर पाटील संचालक व मार्गदर्शक ्
श्री उज्वल कुमार माने पत्रकार साहित्यिक ़
श्री सोमनाथ कर्णवर पाटील एपीआय ठाणे संचालक ़
माननीय एडवोकेट जयश्री तेरकर महिला अध्यक्ष महाराष्ट्र राज्य
श्री संभाजी सुळ उपाध्यक्ष
प्राध्यापक देवेंद्र मदने सर. प्राचार्य दत्तात्रय बारगळ सर कार्यवाहक ़
श्री बापूसाहेब शिंदे संयोजक.
श्री शिवाजी ढेपले कार्याध्यक्ष ़ श्री समाधान बागल स्वागत अध्यक्ष

Share this...