स्वर्गीय मा.आमदार गणपतराव देशमुख स्मरणार्थ चौथे आदिवासी धनगर साहित्य संमेलन सांगोला महाराष्ट्र राज्य घोषणा
रविवार दि.०१|०५|२०२२.
स्थळ: बचत भवन पंचायत समिती सांगोला .
वेळ: सकाळी ११वाजता.
————————-
नागपूर
पहिले आदिवासी धनगर साहित्य संमेलन दि.७|८|जानेवारी २०१७ रोजी सोलापुरात झाले.अध्यक्ष प्राख्यात लेखक व ईतिहास संशोधक संजय सोनवणी हे होते. स्वागताध्यक्ष समाज सेवक मा.जयसिंग तात्या शेंडगे होते.न भुत्तो न भविष्यते असे भरगच्च राष्ट्रीय पातळीवरील दोन दिवस साहित्य संमेलन झाले.दुसरे संमेलन लातूर येथे तीन दिवस झाले. अध्यक्षा प्रशासकीय अधिकारी संगिता धायगुडे या होत्या .स्वागताध्यक्ष ऐडव्होकेट आण्णाराव पाटील हे होते.उद्घाटक प्राख्यात रान कवी नां.धो. महानोर होते.
तिसरे साहित्य संमेलन म्हसवड येथे तिन दिवस धुम धडाक्यात झाले संयोजक, स्वागताध्यक्ष मा.बाळासाहेब कर्णवर पाटील.तडफदार कर्तुत्वान, दात्रुतवान,चेरमन श्री श्री सद्गुरू साखर कारखाना हे होते.खरोखरच बाळासाहेब कर्णवर पाटील यांनी एक हाती संमेलन घेतले. उद्घघाटक मा.सुशिलकुमार शिंदे साहेब मा.मुख्यमंत्री, मा .केंद्रीय गृह मंत्री हे होते.अध्यक्ष डॉ मुरहरी केळे संत साहित्य अभ्यासक व त्रिपुरा राज्य महावितरण चे कार्य कारी संचालक हे होते.
चौथे साहित्य संमेलन ही जाहीर झाले होते. स्वर्गीय मा.आमदार गणपतराव देशमुख साहेब यांच्या हयातीत त्यांच्या साठी हे संमेलन आयोजित करण्यात आले होते. सर्व तयारी पूर्ण झाली होती.आमचा खर्च ही खूप झाला होता.ऐन वेळेस संमेलन रद्द करावे लागले. संमेलनावर दुसराही आघात झाला स्वर्गीय मा.आमदार गणपतराव देशमुख साहेब अचानक सोडून गेले.ते आम्हास म्हणाले होते कसे करा संमेलन घ्या पण माझ्या पर्यंत काहीही येवू देवू नका? स्वर्गीय मा.आमदार गणपतराव देशमुख यांनीही खूप वर्षांपूर्वी सांगोला येथे साहित्य संमेलन घेतले होते त्याची आठवण ही त्यांनी सांगितली.सूतगिरणी कार्यालयातील जुने फोटोही दाखवले.
या साहित्य संमेलनाचे बरेच सोपस्कार पूर्ण झाले आहेत. संमेलन अध्यक्ष म्हणून प्राचार्य आर एस चोपडेसर यांची निवड केली आहे. संमेलन स्वागताध्यक्ष शिंगाडे सर आहेत. सांगोल्यातील अनेक मान्यवर सक्रिय सहभागी आहेत.
फेर पत्रीका फेर नियोजन करावे लागणार आहे.खरतरं हे साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्यातील तमाम धनगर जमातीचे अनेक समाज सेवक, अनेक अधिकारी कर्म चारी, शिक्षक, साहित्यीक,पत्रकार, उद्योजक, यांनी स्वत:च्या खांद्यावर घेतलेले आहे. हे लोक समाजाचे खरे आधार स्तंभ आहेत.
या साहित्य संमेलना मुळे अनेक प्रतिभावतांना व्यासपीठ मिळाले आहे.धनगर जमात प्रवाहात नाही पण मिडीयात आली आहे. होळकर शाहीचे लेखक संशोधक राम लांडे यांच्या म्हणण्यानुसार या साहित्य संमेलनामुळे धनगर जमातीचा ईतिहास राजकीय पटलावर आला आहे. मी म्हणेल साहित्य संमेलनामुळे धनगर जमात प्रवाहा मध्ये येत आहे.
मी कालच आपले पहिले अध्यक्ष संजय सोनवणी सर यांच्याशी चर्चा केली. दुसर्या साहित्य संमेलनात संजय सोनवनी सरांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्यावर दोनशे भागाची मालीका काढायचे ठरले होते.काढली. देशात एकच नंबर मालीका चालू आहे. कर्नाटक राज्यात मालीकेचा टीआरपी एक नबंर आहे. मी काल आणखी आग्रहाची विनंती केली भारतीयांचा नेपोलियन यशवंतराव होळकर यांच्यावर लवकरात लवकर मालीका काढा किंवा सिनेमा काढा. चाचपणी चालू आहे.संतोष कोल्हे हे या साठी चाचपणी करत आहेत. लवकरच यश मिळेल अशी अशा करूया.
अशा तर्हेने हे साहित्य संमेलन समाजाचे अनेक पैलू उघडत आहेत.
अनेक लोक म्हणतात धनगर जमात एक होत नाही.मी म्हणतो ९९.९९% धनगर जमात वेळ आली की एक होते. विविध पक्षात सक्रिय असलेले नेते व सामाजिक संघटनांचे स्वयंघोषित नेते एकत्र नाहीत. ते समाजा साठी काम करत नाहीत ते बिचारे पोटभरू आहेत.किंवा राजकीय पक्षाने दिलेल्या पदाच्या बदल्यात समाजा मध्ये फुट पाडत असतात. ते त्यांनी करायला पाहिजे नाहीतर पक्ष त्यांना काढून टाकेल.
साहित्य संमेलना मुळे लोक जागृत झाले आहेत होत आहेत. माझे मत आहे सांगोला तालुक्यातील धनगर जमातीचा आदर्श संपूर्ण महाराष्ट्र राज्याने घेतला पाहिजे.कारण सांगोला तालुक्यातील धनगर जमात कोणतिही अपेक्षा न करता जमातीचे राजकीय शक्ती फक्त जमातीलाच मिळाली पाहिजे या हेतुने काम करत आहेत. सांगोल्याचा आदर्श संपूर्ण महाराष्ट्र राज्याने घ्यावा या हेतूनेच आपण हे संमेलन घेऊया.स्वर्गीय मा.आमदार गणपतराव देशमुख यांचा आदर्श संपूर्ण महाराष्ट्र राज्याने घ्यायला हवा.या हेतूनेच हे संमेलन सांगोला येथे आयोजित करण्यात गरज आले आहे.साहित्य संमेलन आणि धनगर धर्म पीठ या दोन्हीही संस्थाच्या दोन वेबसाईट निर्माण केलेल्या आहेत.यां वेबसाईट चे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दि.१|५|२०२२ रोजी करण्यात येणार आहे.या मुळे जगभरातील संबधित सर्व क्षेत्रातील लोकांना धनगर साहित्य आणि धनगर धर्माची माहिती उपलब्ध होणार आहे.तसेच साहित्य आणि धर्म या साठी योगदान दिलेल्या सर्व कार्यकर्ते व मान्यवर यांची माहितीही या वेबसाईट वर टाकली जाईल.
तरी क्रुपया राज्यातील, शिक्षण,समाज, साहित्य, सांस्कृतिक, धर्म, सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून सुजाव, मार्गदर्शन, योगदान द्यावे.तसेच राग, लोभ, काम, क्रोध, संशय,जात, धर्म, सर्व भेद विसरून राजकीय पक्षाचे जोडे बाहेर काढून जमातीच्या व्यासपीठावर सर्वांचे स्वागत आहे.
आपले विनीत:
प्रा.डॉ. अभिमन्यु टकले (संस्थापक धनगर साहित्य संमेलन, धनगर धर्म पीठ महाराष्ट्र राज्य.)
श्री संभाजीराव सुळ उपाध्यक्ष धनगर साहित्य संमेलन.
श्री बाळासाहेब कर्णवर पाटील. मार्गदर्शक.
श्री प्राचार्य आर एस चोपडे सर अध्यक्ष ४थे आदिवासी धनगर साहित्य संमेलन सांगोला.
श्री बबन बरकडे उपाध्यक्ष धनगर धर्म पीठ.
श्री सोमनाथ कर्णवर पाटील एपिआय, सदस्य.
श्री चंद्रकांत हजारे प्रवक्ते धनगर साहित्य संमेलन.
संयोजन समिती धनगर साहित्य संमेलन सांगोला
श्री संजय शिंगाडे सर
स्वागताध्यक्ष तथा प्रमुख संयोजन समिती ४थे आदिवासी धनगर साहित्य संमेलन सांगोला महाराष्ट्र राज्य.
श्री कुङंलीक आलदर संयोजक.
श्री विष्णु देशमुख कार्याध्यक्ष. प्राचार्य रामचंद्र जानकर खजिनदार.
श्री कृष्णा बुरूंगुले संचालक सदस्य.
सन्माननीय सदस्य
डाॅ.रमेश सिद, श्री कुङंलीक एरंडे,श्री बाळासाहेब एरंडे.श्री भीवा कांबळे,श्री सुबराव बंडगर, श्री आबासाहेब मोटे,श्री उल्हास धायगुडे, डाॅ.विजय बंडगर,प्रा.बाळक्रुष्ण कोकरे,श्री राजेंद्र देशमुख, वकिल टी डी ढेरे, श्री बंडोपंत येडगे,श्री दत्तात्रय जानकर, श्री विजयकुमार वाघमोडे,श्री दिगंबर बंटी लवटे,डाॅ.महेश राऊत,श्री अमोल खरात, ॲड. धनंजय मेटकरी,श्री परमेश्वर कोळेकर, श्री प्रवीण वाघमोडे,श्री मोहन मस्के पत्रकार, प्रा.बापूराया शिंदे
निमंत्रीत:
श्री रामराव वडकुते माजी आमदार व भाजप जिल्हाध्यक्ष हिंगोली वाशीम.
श्री ज्ञानेश्वर ढोमणे धनगर धर्म पीठ जिल्हाध्यक्ष आमरावती.
श्री अशोक हटकर सभापती
बाजार समिती खामगाव बुलढाणा.
श्री सुरेश भूमरे भाजप युवक जिल्हाध्यक्ष परभणी.
भाग्यवंत नायकुडे पत्रकार आकलुज.
बाळासाहेब टकले जि.संघटक धनगर धर्म पीठ करमाळा .
श्री विठ्ठल सजगने सर जिल्हाप्रमुख धनगर धर्म पीठ सातारा.
विजय हुबाले धनगर धर्म पीठ अध्यक्ष सांगली.