Share this...

सांगोला जि. सोलापुर: रविवार दिनांक १/५/२०२२ रोजी स्वर्गीय आमदार भाई गणपतराव देशमुख आदिवासी धनगर साहित्य सम्मलेन सांगोला राज्यस्तरीय बैठक आयोजित केली होती. राज्यभरातील निवडक साहित्य प्रेमी बौद्धिक मंडळी उपस्थित होती.अध्यक्ष स्थानी सम्मेलन आध्यक्ष प्राचार्य आर एस चोपड़े सर होते तर प्रमुख उपस्थीती संस्थापक डॉ अभिमन्यु टकले, श्री ज्ञानेश्वर ढोमणे अमरावती, श्री अशोक हटकर बुलढाणा हे होते. कामगार दिनानिमित्त MPSC पास झालेले अधिकारी व मान्यवरचा सत्कार सोहळा पार पडला.कु भाग्यश्री ढोन राजपत्रित गट अ जलसंधारण विभाग निवड. राजपत्रित गट ब मधे कु पल्लवी नीलगुडे, कु सायली हाके, डॉ योगेश्वरी आलदर, श्री नितीन आलदार, डॉ अविनाश उत्तम खांडेकर यांना गौरवण्यात आले. प्राचार्य विजयकुमार वाघमोडे, शेंडगे सर यांचा आदर्श प्राचार्य म्हणून सत्कार करण्यात आला. भाग्यवंत नायकूड़े आदर्श पत्रकार व आबासाहेब मोटे आर एस पी पार्टीचे राज्य सचिव झाले म्हणून अभिनन्दन सत्कार करण्यात आला. तसेच सर्व मान्यवरचा सत्कार करण्यात आला. साहित्य सम्मलेन रूप रेषा कशी असावी यावर मान्यवरांनी मार्गदर्शन केले.मार्गदर्शन करताना डॉ अभिमन्यु टकले संस्थापक अध्यक्ष म्हणाले सयोजन समितीला जी योग्य तारीख वाटेल ती ठरवावी .तसेच जो पर्यन्त धनगर समाज्यातील बौद्धिक लोक निस्वार्थ पणे जमाती साठी काम करणार नाहीत तो पर्यत कोणालाही काहिही मिळणार नाही. अडीच कोटी मतदार असलेला समाज्याचे नेते जो पर्यन्त एक व्यासपीठावर येणार नाहीत तो पर्यन्त त्यांचा वापरच होणार आहे. धनगर जमात एक होण्यासाठी तयार आहे. लीडरशिप साठी तयार आहे. पोटभरु वैयक्तिक घरभरु नेते समाज्याचे कधीही भले करू शकत नाहीत. भविष्यात राज्यस्तरीय जमात एक होत आहे.आदिवासी धनगर साहित्यातील मान्यवरांनी सामाजिक राजकीय बदल घडून आणले आहेत.जमात बोलू लिहू लागली आहे. हे साहित्य सम्मलेन झाल्या नंतर राज्यात मोठे सामाजिक बदल होतील हे सांगण्याची गरज नाही. २०१४ पासून आपण निर्णायक भूमीकेत आहोत. साहित्य सम्मेलन सयोंजन समितीला नियोजनाचे पूर्ण अधिकार आहेत . योग्य तारीख निश्चित करावी. कोणत्याही आघाडीवर एकटे लढू नक़ा लवकर सम्पून जाल. हे साहित्य सम्मलेन राज्य आणि देश्यात बदल घडवणारे भव्य दिव्य होणार हे नक्कीच.

श्री बाळासाहेब कर्णवर पाटील यांनी अनेक सुझाव दिले ते सयोंजन समितीने मान्य केले.बाळासाहेब कर्णवर पाटील म्हणाले आदर्श मुख्यमंत्री पुरस्कार सुरु करा. जे समाज्याचे नेते पत्रिकेत नाव टाकून येत नाहीत त्यांची नावे टाकू नयेत. जे नावे टाकायला लावतात त्यांनीच त्यांना आण्यासाठी जावे. जेथे कमी तेथे आम्ही. जी जबाबदारी देणार ती घेऊ असेही ते म्हणाले. मा नितिन गडकरीजी निंमत्रण देण्याची जबाबदारी व मुख्यमंत्री पुरस्कार याची जबाबदारी घेणार असल्याचेही ते म्हणाले.

श्री आर एस चोपड़े नियोजित संमेलन अध्यक्ष म्हणाले व्यासपीठ असल्या शिवाय व्यक़्त होता येत नाही. तसेच कोणाचे कौतुक करता येत नाही.यासाठीच डॉ अभिमन्यु टकले सर यांनी हे व्यासपीठ तयार केले आहे आणि बदल घडत आहेत. आज आपण या सर्व अधिकारी तरुणांचे

सत्कार अभिनन्दन या व्यासपीठावर केले. या सम्मेलना मुळे आज मलाही व्यासपीठ मिळाले आहे. आज मला ही या मुळेच व्यासपीठ मिळाले आहे.या व्यासपीठाचे परिणाम आम्ही २०१७ पासून पाहत आहोत आणि येणाऱ्या काही वर्ष्यात याचे परिणाम समज्यात पाहिला मिळणार आहेत.तसेच सर्व अधिकारी कर्मचारी बौद्धिक वर्ग सम्मेलनात एकवटला अणि टकले सर सारखे निस्वार्थ पने समाज सेवा केली तर समाज्याची प्रगति झाल्या शिवाय राहणार नाहीं. तसेच या सम्मेलनला काहिही कमी पडू देणार नाही.आमच्या संस्थे मधे दहा हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत .तिनसे चारसे स्टाफ आहे ,.रथ यात्रा ,दिंडी , सांस्कृतिक कार्यक्रम जबाबदारी आमची आहे . काहीही कमतरता भासु दिली जाणार नाही. तसेच साहित्य सम्मेलंनात पुढारी लुडबुड नको. निस्पक्ष्य काम करणारे साहित्याची आवड असणारे नितिनजी गडकरी साहेब, सुशीलकुमार शिंदे साहेब असे मान्यवर बोलवावेत. या सम्मेलनात अहिल्या शिक्षण संस्था पूर्ण क्षमतेने उतरनार आहे. सम्मलेन तारीख २३/२४ जुलै २०२२ ठेवण्यात यावी असी सूचनाही चोपड़े सर यांनी केली.

 

श्री अशोक हटकर सभापती बाजार समिति बुलढाणा हे म्हणाले पहिले आदिवासी धनगर साहित्य सम्मलेन जाहिर झाल्यानंतर आम्हाला खुप आनंद झाला होता. सम्मलेन झाले आणि खुप चांगला उपक्रम सुरु झाला आहे. आपल्या समाज्यात जात्यावरची गाणी,धनगरी ओवी , असे अनेक साहित्याचे अनेक प्रकार आहेत ते जतन केले जावेत.

श्री ज्ञानेश्वर ढोमणे सर धनगर धर्मपीठ प्रमुख अमरावती व वधूवर सूचक प्रमुख म्हणाले त्यांनी अमरावती येथे समाज्याची अनेक विकास कामे संस्था स्थापन करून , समाज्याचा विकास करत आहेत. त्यानी विविध विकास कामे केली त्याची माहिती सांगितली. पुढे बोलताना ते म्हणाले आदिवासी धनगर साहित्य सम्मलेन हे महाराष्ट्र राज्यात चर्चेत आहेच, परन्तु हे सम्मलेन देशातील अनेक राज्यात फिरत असतना या सम्मेलन बदल चर्चा केली ज़ाते. त्यामुळे राज्यबाहेरील लोक ही सम्मेलनाला येण्यास उत्सुक आहेत आसेही ते म्हणाले. विदर्भ विभागात जी जबाबदारी दिली जाईल ती स्वीकारली जाईल असे ते म्हणाले.

सम्मलेन स्वागत अध्यक्ष्य संजय सिंगाड़े सर समारोप करताना म्हणाले साहित्य सम्मेलनात सिस्त असेल. सम्मलेन स्थळ लवकरच जाहिर केले जाईल.साहित्य सम्मलेन २३/७/२०२२ व २४/७/२०२२ लाच होणार आहे. केंद्रीय राज्य मंत्री कवी रामदास आठवले हे उपस्थित राहणार असल्याचेही ते म्हणाले. तसेच ते श्री जयंतराव पाटील शेकाप यांनाही निमंत्रण देण्यात येणार असल्याचे सांगीतले.लवकरच सर्व साहित्यिक यांच्या सहकार्यानी पत्रिका तयार करनार आहेात . सांगोलकर आहोत स्वर्गीय आमदार गाणपतराव देशमुख यांच्या नावाच्या उंची सारखेच सम्मलेन घेवू. तसेच लवकरच पुरस्कार समिती नेमली जाईल. पुरस्कार आदर्श शेतकरी,पालक,पत्रकार , अधिकारी ,लोकप्रतिनीधी साहित्यिक यांना दिला जाईल. दिनांक २३/७ /२०२२ व २४ /७ २०२२ या साहित्यसम्मेलन कार्यक्रम तारखा एकमताने जाहीर करून राज्यस्तरीय बैठक संपली. लवकरच सोलापूर येथे पत्रकार परिषद घेऊन संमेलन जाहिर केले जाईल. बंडोपंत येडगे सर यांनी आभार व्यक्त केले.खालील मान्यवर उपस्थित होते

प्रा.डॉ. अभिमन्यु टकले संस्थापक धनगर साहित्य संमेलन, धनगर धर्म पीठ महाराष्ट्र राज्य.
श्री बाळासाहेब कर्णवर पाटील.व्हा. चेरमन श्री. श्री सदगुरू साखर कारखाना राजेवाडी मार्गदर्शक.
श्री प्राचार्य आर एस चोपडे सर अध्यक्ष अहिल्यि शिक्षण संस्था सांगली व अध्यक्ष ४थे आदिवासी धनगर साहित्य संमेलन .
श्री उज्ज्वलकुमार माने संपादक दैनिक तरूण भारत सोलापूर.

सदस्य.
संयोजन समिती धनगर साहित्य संमेलन सांगोला
.श्री संजय शिंगाडे सर
स्वागताध्यक्ष तथा प्रमुख संयोजन समिती ४थे आदिवासी धनगर साहित्य संमेलन सांगोला महाराष्ट्र राज्य.
श्री शिवाजी बंडगर कवी सम्मेलन अध्यक्ष.
श्री कुङंलीक आलदर संयोजक.
डाॅ.उषा देशमुख. श्री राजेंद्र देशमुख.
श्री विष्णु देशमुख कार्याध्यक्ष. प्राचार्य रामचंद्र जानकर खजिनदार.
श्री कृष्णा बुरूंगुले संचालक सदस्य.

सन्माननीय सदस्य
डाॅ.रमेश सिद, .श्री भीवा कांबळे,श्री सुबराव बंडगर, श्री आबासाहेब मोटे,. प्रा.बाळक्रुष्ण कोकरे,, श्री बंडोपंत येडगे,श्री दत्तात्रय जानकर, श्री विजयकुमार वाघमोडे,श्री दिगंबर बंटी लवटे.श्री अमोल खरात,श्री उल्हास धायगुडे,,श्री प्रवीण वाघमोडे,श्री मोहन मस्के पत्रकार, प्रा.बापूराया शिंदे
श्री ज्ञानेश्वर ढोमणे धनगर धर्म पीठ जिल्हाध्यक्ष आमरावती.
श्री अशोक हटकर सभापती
बाजार समिती खामगाव बुलढाणा.
भाग्यवंत नायकुडे पत्रकार आकलुज.
बाळासाहेब टकले जि.संघटक धनगर धर्म पीठ करमाळा .
श्री विठ्ठल सजगने सर जिल्हाप्रमुख धनगर धर्म पीठ सातारा.
श्री गणेश पुजारी सर पत्रकार पुणे .
श्री अशोक माने पत्रकार पुणे.असे अनेक जमातीचे मान्यवर उपस्थित होते.

Share this...