Share this...

दि.२३|२४ जुलै २०२२रोजी धनगर साहित्य संमेलन उत्साहात, धूमधडाक्यात,यशस्वी रित्या प्राचार्य आर एस चोपडे सर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून सर्व क्षेत्रातील मंडळी हजर होती. आडीच महिने नियोजनासाठी मिळाले होते. पावसाळ्याचे दिवस होते तरी कर्म, हेतू शुध्द असेल तर दैव आणि निसर्ग ही नतमस्तक होत असतात. मा.सुशीलकुमार शिंदे साहेब माजी ग्रहमंत्री यांनी शुभेच्छा संदेश पाठवला होता. मा. आरविंदजी केजरीवाल मुख्यमंत्री दिल्ली यांनी दूत पाठवला होता. देशभरातील अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांनी शुभेच्छां दिल्या. बरेच आधिकारी हजर होते बरेच आधिकारी भेट देऊन गेले. महाराष्ट्र राज्यातील बरेच राजकीय पार्टीला धनगर जमात फक्त मतदार म्हणून चालते त्यांचा उत्कर्ष, विकास चालत नाही. महाराष्ट्र राज्यात काही लोक असे आहेत त्यांना सर्व जातीचे मतदान चालते पण जातीचे कार्यक्रम चालत नाहीत.

साहित्य संमेलनात अध्यक्ष श्री आर एस चोपडे सर संस्थेतील सर्व शिक्षक ,विद्यार्थी यांनी दिंडीच्या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले होते. चौदा देखावेचे रथ, पालखी, चौदा सांस्कृतिक सामूहिक न्रुत्य प्रकार असे अठ्ठावीस उत्कृष्ट असे कार्यक्रम बसवले होते. सांगोला वासीयांची प्रतीक्रीया होती साहेब आमच्या आयुष्यात आम्ही असा कार्यक्रमच पाहिला नाही.
उदघाटन मा.श्रीमती रतन गणपतराव देशमुख व श्री चंद्रकांत दादा देशमुख यांच्या हस्ते प्रतीमा पुजन, व भंडारा उदळून येळकोट येळकोट जय मल्हार,चांगभले च्या गजरात झाले. अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त केली, अनेक पुस्तकांचे प्रकाशन झाले.पुरस्कार वितरण सोहळाही पार पडला.

नंतर अहिल्या शिक्षण संस्थे ने आयोजित केलेला नियोजन बध्द असा सांस्कृतिक कार्यक्रम झाला या मध्ये विद्यार्थ्यांच्या कला गुणाला वाव देऊन त्यांना अनेक मान्यवरांनी बक्षीसांचा वर्षाव केला.
त्यानंतर सांयकाळचे सात वाजले होते. लोक दिवस भर खूप थकले होते.धनगरांचा गौरव शाली ईतिहासावर परिसंवाद झाला. रात्री नऊ ते अकरा दरम्यान उत्क्रुष्ट असे कवी शिवाजी बंडगर यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन पार पडले .राज्यभरातून कवी, कवयत्री यांनी हजेरी लावली. प्रबोधनात्मक कवीता, लावन्या, भारूड सादर करण्यात आले.

दुसर्या दिवशी विविध विषयांवरील परिसंवाद झाले. रविवार ची सुट्टी असल्याने सभागृह तुडुंब भरले होते. सर्व क्षेत्रातील अधिकाऱ्यांनी आवर्जून हजेरी लावली होती. सर्वात महत्वाची बाब रविवारी सर्वात जास्त विक्रमी पुस्तक विक्री झाली. अहमदनगर वरून आलेले स्टाॅलवर एकही पुस्तक शिल्लक राहीले नाही.

होळकर शाही पुस्तकाची एकही प्रत शिल्लक राहीली नाही. सर्व परिसंवाद अभ्यास पुर्ण होते. नवोदित वक्त्यांनी विषय मांडणी चांगलीच केली. जमातीच्या हिताचे ठराव मांडण्यात आले.
समारोप समारंभास प्रमुख वक्ते म्हणून दिल्लीचे आमदार दिनेश जी मोहनिया आम आदमी पार्टी व तिस अधिकारी उपस्थित होते. मा.आमदार दिनेश मोहनिया दिल्ली पाउण तास व आमदार रामहरी रूपनवर आप्पा यांचे दोन तास तडाखेबंद मार्गदर्शन झाले. रहाण्याची सोय उत्तमच होती. जेवणाची सोय बरी होती. अनेक साहित्यीक मान्यवर सतत दोन दिवस सभागृहात बसून होते.पहिल्या दिवशी सोळा तास कार्यक्रम चालला, तर दुसर्या दिवसी तेरा तास कार्यक्रम चालला. दोन दिवस प्रिंट आणि सोसेल मिडीयाचे पत्रकार बांधव संपादन आणि प्रकाशन करत होते. सोसेल मिडीयात तुफान बातम्या आल्या. तर प्रिंट मिडीयात सर्व लिडींग दैनिकात आडीचशे भर बातम्या छापल्या गेल्या. धनगर जमात देशभर समुद्रा सारखी विखूरलेली आहे. प्रचंड पाऊस चालू होता.राज्याचे राजकारण हवेत होते. वेळ कमी होता त्यामुळे संयोजन टिम व आम्ही आपणा पर्यंत पोहचू शकलो नसेल, अनेकांच्या आपेक्षा, पुर्ण करू शकलो नसेल, जानते, अजानते चुका ही झाल्या असतील, कार्यक्रम राज्यातील जमातीचा होता. वैयक्तिक नव्हता.जमातीच्या प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी होती तरीही आम्ही काही चुकले असेल तर माफ करावे व जमातीच्या प्रमाणीक कार्यात सहभागी व्हाल अशी अशा व्यक्त करतो. तसेच सर्व कार्यकर्ते, सर्व क्षेत्रातील मान्यवर ,विद्यार्थी, पत्रकार, साहित्यीक, सर्व कळत नकळत सहकारी या सर्वांचे जाहीर आभार . स्वर्गीय मा.आमदार गणपतराव देशमुख स्मरणार्थ चौथे आदिवासी धनगर साहित्य संमेलन सांगोला महाराष्ट्र राज्य टिमचे साहित्य संमेलन यशस्वी केल्याबद्दल जाहीर अभिनंदन.

https://dhangarsahityasammelan.org/ या वेबसाईटवर साहित्य संमेलन फोटो बातम्या व्हीडीओ पाहू शकता.

तसेच Adivasi Dhangar Sahitya Sammelan या यू टूबवर सर्व व्हीडीओ पाहू शकता.

डाॅ अभिमन्यु टकले
संस्थापक धनगर साहित्य संमेलन.
धनगर धर्म पीठ महाराष्ट्र राज्य.

Share this...