Share this...

संजय सोनवणी ईतिहास संशोधक. प्राख्यात लेखक, महाराष्ट्र राज्यातील एक विचारवंत. ७/८जानेवारी २०१७ रोजी पहिले आदिवासी धनगर साहित्य संमेलन सोलापूर महाराष्ट्र राज्य या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व मार्गदर्शक. सर्व जाती धर्माच्या भिंती बाजूला
सारून सोनवनी यांनी महाराष्ट्र राज्य आणि भारतातील सांस्कृतिक चळवळीचे मार्गदर्शन सुरु ठेवले आहे.

महाराष्ट्र, जळगाव जिल्ह्यात संजय सोनवणींचा जन्म श्री. देविदास सोनवणी आणि सौ. इंदुमती सोनवणी या दांपत्याच्या घरी झाला. वडील श्री देविदास सोनवणी हे प्राथमिक शिक्षक होते. त्यांनी राजगुरुगर येथील हुतात्मा राजगुरू महाविद्यालयातून बी. कॉम ही पदवी मिळवली. पुढील शिक्षणासाठी ते पुण्यात आले. येथे त्यांनी एम.कॉम ही पदवी प्राप्त केली. गडचिरोलीसारख्या आदिवासी आणि नक्षलवादाने ग्रस्त भागात त्यांनी काही काळ धातु-भुकटी कारखाना चालविला. अवघ्या पाच हजार रुपयांच्या भांडवलावर त्यांनी सुरुवात केली होती. त्यांनी लेह (लडाख) येथेही फळप्रक्रिया उद्योग उभारण्याचा प्रयत्नव केला. पुष्प प्रकाशन लि. या संस्थेमार्फत त्यांनी ८५०पेक्षा अधिक पुस्तके प्रसिद्ध केली.
साहित्य प्रवास

सोनवणींनी ११ वर्षांचे असताना “फितुरी” हे नाटक लिहिले. वयाच्या १६ व्या वर्षी त्यांनी लिहिलेली पहिली बालकादंबरी (नरभक्षकांच्या बेटावर) मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केली. महाराष्ट्र राज्य शासनाच्या अनुदानाने त्यांचा पहिला कवितासंग्रह “प्रवासी” प्रसिद्ध झाला. सव्यसाची, मृत्युरेखा, रक्त हिटलरचे, बीजिंगच्या वाटेवर, क्लिओपात्रा इ. त्यांच्या कादंबर्याफ इंग्रजीत अनुवादित झाल्या. भारतातील स्वतंत्र प्रज्ञेचे ते पहिला थरार कादंबरीकार मानले जातात. त्यांने एकून २८ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय थरार कादंब-या लिहिलेल्या असून “On the Brink of the Death” ही इंग्रजीतील थरार कादंबरी जगभर गाजलेली आहे. कल्की, शून्य महाभारत, कुशाण, ओडीसी आणि यशोवर्मन या त्यांच्या तत्त्वचिंतनात्मक कादंबर्याी आहेत. कुशाणचा अनुवाद इंग्रजीत “Last of the wanderers” या नावाने आणि यशोवर्मनचा “The Jungle” या नावाने प्रसिद्ध झाला. त्यांची राणी शीबाला केंद्रीभूत धरून लिहिलेली “The Awakening” ही इंग्रजी कादंबरी प्रसिद्ध आहे. या कादंबरीचा मराठी अनुवादही आहे. त्यांच्या “पर्जन्य सूक्त” या काव्याचा इंग्रजीत अनुवाद झाला आणि त्यातील निवडक ८ कवितांना संगीतबद्ध करून त्याची ध्वनिफीतही प्रसिद्ध झाली. त्यांची “असुरवेद” ही गाजलेली सांस्कृतिक थरारकथाही आहे. त्यांची “…आणि पानिपत” ही कादंबरी सर्वावधिक गाजली. ही मराठीतील पहिली subaltern कादंबरी आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनातून लिहिलेला त्यांचा नीतिशास्त्र हा नैतिक समस्यांबद्दलचा चिंतनपर ग्रंथ प्रसिद्ध आहे. त्यांनी अनेक नाटकेही लिहिली. त्यातील काहींचे प्रयोगही झाले. अलीकडेच त्यांची “तृतीय नेत्र” ही कादंबरीही प्रकाशित झाली असून “भाषेचं मूळ” या पुस्तकातून त्यांनी भाषनिर्मितीचा प्रश्न सोडवत प्राकृत भाषाच मूळ कशा आहेत हे सिद्ध करून दाखवले आहे. महाराजा यशवंतराव होळकर यांचे मराठी व इंग्रजी भाषेतील चरित्र ही त्यांची महत्वाचे निर्मिती मानली जाते.
संजय सोनवणी यांनी विश्वनिर्मितीबाबतचा स्वतंत्र सिद्धान्त “अवकाशताण सिद्धान्त आणि विश्वनिर्मिती” नामक पुस्तकात मांडला आहे.

सोनवणी यांनी धर्मेतिहासावर “हिंदू धर्माचे शैव रहस्य” आणि “विठ्ठलाचा नवा शोध” हे ग्रंथ सिद्ध केले.

संशोधन
सोनवणी यांनी धर्मेतिहासावर “हिंदू धर्माचे शैव रहस्य” आणि “विठ्ठलाचा नवा शोध” हे ग्रंथ सिद्ध केले. त्यांचा “महार कोण होते?” हा महार समाजाचा पुरातन इतिहास उलगडून दाखवणारा महत्त्वाचा ग्रंथ प्रकाशित झाला आहे.
धनगरांचा गौरवशाली इतिहास हा त्यांचा एक महत्वाचा ग्रंथ असून महाराजा यशवंतराव होळकर यांच्या क्रांतीकारी जीवनावर प्रकाश टाकणारा “भारतीय स्वातंत्र्याचे आद्य प्रणेते महाराजा यशवंतराव होळकर” हा ग्रंथ सर्वाधिक लोकप्रिय आहे. त्यांनी इंग्रजीतही “Unsung Hero of India- Maharaja Yashavantrao Holkar” हा ग्रंथ लिहिला आहे. जगभरच्या अभ्यासकांने त्याचे स्वागत केले आहे.

वाघ्याचे सत्य हे रायगडावरील वाघ्याची सत्यस्थिती मांडणारी पुस्तिकाही प्रसिद्ध असून जेंव्हा वाघ्याबद्दल विवाद निर्माण करण्यात येऊन तो पुतळा उखडून फेकण्यात आला तेंव्हा सोनवणी यांनी उपोषणाचे हत्यार उपसले होते. त्यांना महाराष्ट्रातील आम जनतेने पाठींबा दिल्याने वाघ्याची पुनर्स्थापना झाली.

धनगर आरक्षण, त्यांचे आदिवासी असण्याचे वास्तव यावर महत्वाच्या वृत्तपत्रे-मासिके यात असंख्य लेख लिहिले तर वाहिन्यांवरून धनगर आरक्षणाबाबत झालेल्या चर्चांमध्ये सहभाग घेऊन धनगर समाजाची बाजू मांडली. धनगर आरक्षणासाठी पुणे येथे भर पावसात उपोशनही केले.

२०११ साली महाराजा यशवंतराव होळकर यांचे वाफगाव येथील जन्मस्थळ शोधून तेथे त्यांची जयंती साजरी करण्याची प्रथा सुरु केली तसेच वाफगाव येथील हे जन्मस्थान राष्ट्राय संरक्षित स्मारक व्य्हावे अशी मागणीही २०१२ सालापासून सुरु केली.थोरले सुभेदार मल्हारराव होळकर यांचे अत्रे यांनी १८९३ साली प्रसिद्ध केलेल्या चरित्राचे संपादनही त्यांनी केले.

ते पहिल्या आदिवासी धनगर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले होते.

धनगर समाजाच्या आराध्यांविषयी जेंव्हाही कोणा लेखकाने, राजकीय नेत्याने चुकीचे आरोप केले त्यावेळीस त्यांनी त्यांचा समाचार घेतला आहे.

सध्या सोनी वाहिनीवर रोज प्रसिद्ध होणा-या “पुण्यश्लोक अहिल्या” या मालिकेचे इतिहास संशोधक म्हणून ते काम पाहत आहेत. ही मालिका त्यांच्या प्रयत्नांमुळेच सुरु होऊ शकली व ती मालिका आज देशभर लोकप्रिय आहे.

वैदिक धर्म-संस्कृतीचे उगमस्था्न या विषयावरचे Origins of the Vedic Religion and Indus-Ghuggar Civilisation हा सोनावणी यांचा ग्रंथ २०१५ साली प्रकाशित झाला. सोनवणी यांनी लोहभुकटी निर्मितीचा, संगणकप्रणाली व सेंट्रीफ्युगल पंखे निर्मितीचेही उद्योग उभारले होते व ते लोहभुकटी तंत्रज्ञानातील देशातील नामवंत तज्ञ मानले जातात.

सोनवणी यांची आजवर मराठी व इंग्रजी अशी एकुण ११७ पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. ते संगीतकार, अभिनेते व चित्रपट दिग्दर्शकही आहेत.

स्वर्गीय हरी नरकेजी यांच्या सारखा विचारवंत सहकारी तारा निखळला याचे दुख त्यांना व आपल्या सर्वांनाच आहे.

संजय जी सोनवणी यांना शतकी दीर्घायुष्य लाभो हीच वाढदिवसानिमित्त हार्दिक, हार्दिक शुभेच्छा.
संजय सोनवणी फोन नंबर 9860991205
लेखक:
प्राचार्य डाॅ.अभिमन्यु टकले .
संस्थापक अध्यक्ष
आदिवीसी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य .

Share this...