Share this...

हैद्राबाद शनिवार दिनांक 29/7/2023 रोजी सायंकाळी मा.मुख्यमंत्री तेलंगणा यांची नियोजित भेट घेतली.समाजाला योग्य प्रतिनिधित्व मिळावे व यशस्वी मुख्यमंत्र्यांकडून यशाचे गमक जानूंन घेण्यासाठी भेट घेतली.एप्रील ,मे मध्ये बि आर एस चे इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मिडियात बरेच वारे सुटले होते. मे महिन्यात अनेक बिआर एस च्या नेत्यांना मुख्यमंत्री के सी आर यांची भेट घेण्यासाठी विचारणा केली होती परंतु आमचे म्हणणे हैदराबाद पर्यंत कोणीही पोहोचवले नाही. बाळासाहेब कर्णवर पाटील यांनी मुख्यमंत्र्यांची वेळ घेतली आणि आम्हाला माननीय मुख्यमंत्री यांनी चर्चेसाठी तीन तासाची वेळ दिली. यामध्ये त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणावर प्रकाश टाकत तीन तास विविध विषयावरती चर्चा केली. महाराष्ट्र राज्यामध्ये संभ्रमाचे राजकारण असल्यामुळे सर्व पक्षातील नेते व महाराष्ट्र राज्यातील जनता राजकीय संभ्रमात असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी चर्चा केलेले विषय खालील प्रमाणे आहेत.

१) पहिली चर्चा महाराष्ट्र राज्यातील शेतकरी आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या यावरती चर्चा केली.

२) महाराष्ट्र राज्य आजही 75 वर्षानंतर जनतेला पिण्यासाठी पाणी देऊ शकलेले नाही आणि शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी वीज देऊ शकले नाही याबद्दल खंत व्यक्त केली.

३) त्यांनी महाराष्ट्र राज्यात खूप मोठ्या प्रमाणात जवळजवळ दीड दोन कोटी धनगर समाज असून त्यांना कोणीही राजकीय न्याय दिला नसल्याबद्दल बोलले.

धनगर समाज राजकीय दृष्ट्या आर्थिक दृष्ट्या शैक्षणिक दृष्ट्या मागास असून त्यांचे प्रबोधन होणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

मी त्यांना सांगितले की आम्ही दरवर्षी साहित्य संमेलना मार्फत महाराष्ट्र राज्यातील बौद्धिक धनगर समाजाकडून आणि इतर सर्व जाती धर्माच्या समाजाकडून धनगर समाजाचे दोन-तीन दिवस प्रबोधन करत असतो. आणि महाराष्ट्र राज्यात त्याला चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळत असल्याचेही सांगितले. आदिवासी धनगर साहित्य संमेलनामुळे महाराष्ट्र राज्यातील धनगर समाजामध्ये सामाजिक, राजकीय इतिहास याबद्दल चांगली जनजागृती झालेली आहे व होत आहे असे आम्ही सांगितले. पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले महाराष्ट्रातील धनगर समाजाने इतर समाजाला बरोबर घेऊन एकत्रितपणे निवडणूक लढल्यास महाराष्ट्र राज्याचे राजकीय समीकरण बदलल्याशिवाय राहणार नाही.
बी आर एस पार्टीमध्ये धनगर समाजाला चांगल्या प्रकारे प्रतिनिधित्व देण्यात यावे अशा प्रकारची भूमिका आम्ही मुख्यमंत्र्यांकडे मांडली. धनगर समाजाच्या महाराष्ट्र राज्यातील वेगवेगळ्या समस्या वरती अर्धा तास चर्चा करण्यात आली त्यामध्ये धनगर समाजाच्या आरक्षणाची झालेली फसवणूक तसेच धनगर समाजाला आतापर्यंत निवडणूक अजिंडा मध्ये आश्वासने देऊन केलेली फसवणूक यावरती ही चर्चा झाली. तसेच महाराष्ट्र राज्यातील मेंढी पालन व मेंढपाळांचे प्रश्न यावरती ही चर्चा झाली.
महाराष्ट्र राज्यातील धनगर समाजाने भाजप व राष्ट्रवादी ला मोठ्या प्रमाणात मदत केल्याचं सांगितलं.

४) तसेच महाराष्ट्र राज्यातील प्राथमिक शिक्षण, महाराष्ट्र राज्यातील आरोग्य सेवा, महाराष्ट्र राज्यातील शैक्षणिक धोरण, महाराष्ट्र राज्यातील भ्रष्टाचार, महाराष्ट्र राज्यातील गौण खनिज वाटप, महाराष्ट्र राज्यातील मागासवर्गीय घटकांना नसलेला प्रतिनिधित्व,
महाराष्ट्र राज्यातील युवकांची बेकारी.महाराष्ट्र राज्यातील राजकारण्यांना जनतेचा काहीही देणे घेणे नाही. महाराष्ट्र राज्यातील सर्व पक्षांचे राजकारण हे फक्त सत्तेसाठी चालले आहे. सत्ताधारी कोण आणि विरोधक कोण हे महाराष्ट्रातील जनतेला समजायला तयार नसून महाराष्ट्रातील जनता पूर्णपणे संभ्रमात आहे. महाराष्ट्र राज्याची राजकीय नाचक्की पूर्ण देशात झालेली आहे असे ते म्हणाले.

तीन तासांची चर्चा झाली.
महाराष्ट्र राज्यातील विविध भागातील ४२ प्रतिनिधी उपस्थित होते.गुलाबी पट्टी घालून सर्वांचाच सत्कार करण्यात आला.

आम्ही कोणत्याही प्रकारचे बिआर एस पार्टीचे सदस्यत्व स्वीकारलेले नाही.योग्य प्रतिनिधित्व मिळाल्या स नक्कीच समाज विचार करेल.या ठिकाणी श्री बाळासाहेब कर्णवर पाटील,श्री अर्जुन दादा सलगर, श्री सुजित कोकरे,श्री क्रुष्णा बुरुंगुले,सौरभ टकले,आदी बेचाळीस मान्यवर उपस्थित होते.

मी कोणत्याही राजकीय लाभासाठी उत्सुक नसून जो राजकीय पक्ष सर्व समाजाला योग्य भागीदारी देतील त्या पार्टीच्या मागे भक्कम उभा रहावू हाच उद्देश.
समाजातील अनेक मान्यवरांनी विचार लेल्या प्रश्नाचे उत्तर दिले आहे.

डॉ अभिमन्यू टकले.
संस्थांपक आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य.

Share this...