5 व्या, आदिवासी धनगर साहित्य संमेलनाचे “राज्य स्तरीय पुरस्कार” जाहीर…
ख्यातनामं साहित्यिक मा. श्री. संजय सोनवणी यांच्यासह 12 जणांचा होणार सन्मानं, 24, 25 फेब्रवारीला बेलाटी येथिल संत बाळूमामा मंदीरात होणार संमेलनं…🌹
सोलापूर, आदिवासी धनगर साहित्य संमेलनामार्फत दरवर्षी दिल्या जाणा-या अत्यंत प्रतिष्ठित अशा राज्यस्तरीय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. साहित्य संमेलनाच्या पदाधि-का-यांनी आयोजित केलेल्या बैठकीत या सर्व नावांच्यावर चर्चा होवून सर्वानुमते या पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली आहे. निवड करण्यात आलेल्यामध्ये समाजातील सर्व स्तरांतील गुणवंतांचा समावेश आहे. ख्यातनामं साहित्यिक संजय सोनवणी यांच्यासह सामाजिक, राजकीय, सांस्कृतीक, पत्रकारिता, वैद्यकीय अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांना सन्मानित केले जाणार आहे. हे पुरस्कार पुढीलप्रमाणे आहेत…
🌹 1) मा. श्री. संजय सोनवणी, पुणे, प्राख्यात साहित्यिक तथा इतिहास संशोधक
पुरस्कार – पुण्यश्लोक, लोकमाता- राजमाता अहिल्यादेवी होळकर सामाजिक कृतज्ञता पुरस्कार
कार्य – साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य, पहिल्या आदिवासी धनगर साहित्य संमेलनाचे संमेलनं अध्यक्ष, राष्ट्रीय स्तरावरील वाहिनीवरुन प्रसारित होणा-या, पु्ण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या सोनेरी इतिहासावरील मालीकेचे लिखाणं, त्याशिवाय होळकराशाहीवरील अनेक पुस्तकांचे लेखणं
🌹2) मा. श्री. सोमनाथ तुकाराम कर्णवर पाटील, सहायक पोलीस निरीक्षक ‘नारपोली पोलीस स्टेशनं भिवंडी, ठाणे शहर
पुरस्काराचे नावं – महाराजे यशवंतराव होळकर समाजरत्नं पुरस्कार
कार्य – श्री. सोमनाथ कर्णवर पाटील यांनी माळशिरस येथे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी आपल्या भागातील सर्व अधिकारी वर्गास एकत्र करुन, स्पर्धा परिक्षा देणा-या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परिक्षा अकादमी सुरू करण्यात मोलाचे योगदानं दिले आहे.
🌹3) मा. प्रा. श्री. शिवाजीराव बंडगर सर, माजी सभापती, बाजार समिती करमाळा, जि. सोलापूर
पुरस्कार – थोरले सुभेदार मल्हाराव होळकर समाजभूषणं पुरस्कार
कार्य – धनगर आरक्षणं चळवळ, सोलापूर विद्यापीठ नामांतर लढा, उजनी धरणंग्रस्त शेतकरी अन्याय निवारणं समिती अशा विविध चळवळीत महत्वपूर्ण भूमीका
🌹4) मा. श्री. बाळासाहेब कोपनर, डी. वाय. एस. पी, पिंपरी चिंचवड, पुणे
पुरस्कार – थोरले सुभेदार मल्हारराव होळकर, सर्वोत्कृष्ट प्रशासकीय अधिकारी पुरस्कार
कार्य – प्रशासकीय सेवेत राहूनही उत्कृष्ट समाजसेवा आणि सामाजिक कार्य
🌹5) मा. श्री. रामदास कोकरे, सहआयुक्त, नगर विकास, जिल्हाधिकारी कार्यालय लातूर
पुरस्कार – पुण्यश्लोक, अहिल्यादेवी होळकर उत्कृष्ट प्रशासकीय अधिकारी
कार्य – शहरी कचरा व्यवस्थापनं पॅटर्न महाराष्ट्र राज्यात प्रसिद्ध, उत्कृष्ट प्रशासकीय अधिकारी म्हणूनं ख्याती
🌹6) मा. डॉ. सौ. उषा देशमुख, सांगोला,
पुरस्कार – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर उत्कृष्ट वैद्यकीय शिकण सेवा पुरस्कार
कार्य – सर्व साहित्य संमेलनात सक्रिय सहभाग, अनेक शासकीय समित्यांवर सदस्य म्हणून उत्कृष्ट कार्य, विविध आयुर्वेद महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून उल्लेखनीय सेवा, तसेच महिला आणि बालकल्याणं क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी
🌹7) मा. श्री. बिपीनंभाई पटेल, कार्यकारी विश्वस्त, एम.एम.पटेल, ट्रस्ट सोलापूर
पुरस्कार – पुण्यश्लोक, अहिल्यादेवी होळकर सोलापूरभूषणं पुरस्कार
कार्य – एम. एम. पटेल ट्रस्टमार्फत सोलापूर जिल्ह्यातील एकमेव खासगी वैद्यकीय महाविद्यालय चालविणे, बी. एस्सी. नर्सिंग महाविद्यालय, जि. एन. एम., पँरामेडिकलसारखे शिक्षण सुरू करणे, अश्विनी रुग्णालयामार्फत वैद्यकीय सेवा
🌹8)श्री रामचंद्र खांडेकर दाजी ता.मोहळ जि.सोलापूर.
पुरस्कार: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर समाज रत्न पुरस्कार.
कार्य: सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय कार्य, अनेक नेते घडवण्याचे कार्य यांनी केले आहे. ५० वर्ष झाले दाजी निरपेक्ष पने कार्य करत आहेत.
🌹9) मा. प्रा. डॉ. श्री. एन. जी. काळे, इंदौर, इतिहास संशोधक,
पुरस्कार – कवीवर्य संत कालीदास जिवनं गौरव पुरस्कार
कार्य – सिद्दहस्त लेखक, साहित्यिक, अनेक पुस्तकांचे लेखनं
🌹10) मा. श्री. नागू विरकर, केंद्र प्रमुख, जिल्ह परिषद, पालघर
पुरस्कार – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर साहित्यरत्नं पुरस्कार
कार्य – धनगरी जिवनावर हेडामं नावाची सुप्रसिद्द कांदबरी
🌹11 ) मा. श्री. शेखर बंगाळे, सामाजिक कार्यकर्ता
पुरस्कार – महाराजे यशवंतराव होळकर आदर्श कार्यकर्ता पुरस्कारकार्य – समाजहितासाठी सदैव आग्रही, विविध आंदोलनात सक्रीय सहभाग, आक्रमक कार्यकर्ता
🌹12) मा. श्री. सलीमभाई आदमभाई पटेल, ( म्हसवड ) पत्रकार
कार्य – समाजाच्या वविध प्रश्नांना वाचा फोडली, पत्रकारितेच्या माध्यमातून गोरगरीब आणि तळागाळातील घटकांना नेहमी सहकार्य केले.
पुरस्कार – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार
१३)डाॅ.संदिप हजारे कोल्हापूर,
पुरस्कार;शूर वीर क्रांतीरत्न विठोजीराजे होळकर समाज भूषण.
कार्य: वैद्यकीय सेवा, कोल्हापूरात राज्य स्तरीय महाराजा यशवंतराव होळकर जयंती, समाज सेवा.
पाचवे, आदिवासी धनगर साहित्य संमेलन हे शनिवार दिनांक 24 आणि 25 फेब्रुवारी 2024 रोजी, श्री. संत. सदगुरू बाळुमामा मंदिर, विजयपूर, बायपास रोड, मु. पो. बेलाटी, ता. उत्तर सोलापूर, जि. सोलापूर येथे होत आहे. आणि याच साहित्य संमेलनात वरील सर्व मान्यवरांना, गुणवंतांना, महाराष्ट्रातील आणि देशभरातील जनतेच्या व समाजाच्या वतीने सन्मानित केले जाणार आहे. या पुरस्काराचे स्वरूप, शाल, श्रीफळ, मानाचा फेटा, धनगरी काठी अन् घोंगडे, सन्मान पत्र व सन्मान चिन्हं असे आहे. जे मान्यवर उल्लेखनीय सेवा करतात त्यांचा गौरव व सन्मान व्हावा आणि नवोदितांनाही प्रोत्साहन मिळावे. हा या उपक्रमाचा हेतू आहे.
सर्व पुरस्कारप्राप्त मान्यवरांनी याबद्दल आदिवासी धनगर साहित्य संमेलनं या विचारपीठाचे आभार मानले आहेत. तर पुरस्कर जाहीर झाल्यानंतर संबंधित मान्यवरांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
डाॅ.अभिमन्यु टकले
संस्थापक आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य.