Share this...

डाॅ. अभिमन्यु टकले यांच्या प्राचार्य पदास महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांनी ११ वर्षा साठी मान्यता प्रदान केली आहे.

अभिमन्यु टकले हे महाराष्ट्र शासकीय सेवेत वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय आतर्गंत परिचर्या विभागात विविध पदावर कार्यरत होते. त्यांचे बीएस्सी नर्सिंग पिबी व पिजी हे शिक्षण आयएनई जे जे रुग्णालय मुंबई येथे झाले आहे.

महाराष्ट्र शासना मार्फत त्यांची सहायक प्राध्यापक गट ब राजपत्रित या पदावर निवड झाली होती. त्यानंतर त्यांनी परिचर्या महाविद्यालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे प्राध्यापक,उप प्राचार्य, प्राचार्य या पदावर कार्यरत होते. ते महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे पदवी व पदव्युत्तर, संशोधन मार्गदर्शक, मान्यताप्राप्त प्राध्यापक आहेत. त्यांचे पिजी,मेंटल हेल्थ, सायक्याट्रीक नर्सिंग (मनोरुग्ण परिचर्या) या विषयात झाले आहे.

त्यांचे सामाजिक, शैक्षणिक, साहित्य, सांस्कृतिक, क्षेत्रातही खूप मोठ कार्य आहे.

ते सध्या एम.एम. पटेल ट्रस्टमार्फत चालवले जानार्या, श्रीमती कमलाबेन पटेल एएनएम,पॅरामेडिकल, बिएस्सी नर्सिंग, महाविद्यालयाचे प्राचार्य पदावर कार्यरत आहेत. हे महाविद्यालय अश्विनी ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय कुभांरी दक्षिण सोलापूर येथे संलग्न आहे.तसेच हे महाविद्यालय आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक संलग्न आहे.या महाविद्यालयाचे बिपीनंभाई पटेल, कार्यकारी विश्वस्त मेहुल पटेल, सौ.दिप्ती पटेल, सर्व शिक्षक, विद्यार्थी यांनी प्राचार्य टकले यांचे अभिनंदन केले. तसेच त्यांचे सर्व स्तरातून राज्य भरातून अभिनंदन होत आहे.

Share this...