Share this...

रंगमहाल ता.चांदवड जि. नाशिक येथे घेण्या साठीचे पत्र.

सहावे आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य २०२५.
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर त्रिजन्म शताब्दीनिमित्त घेण्यात येणार आहे.धनगर साहित्य संमेलना साठी अनेक ठिकाणाहून प्रस्ताव आले आहेत.
दिनांक २४/०३/२०२५ रोजी राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर
सार्वजनिक जन्मोत्सव समिती नाशिक यांचे लेखी पत्र मिळाले आहे. श्री विनायकजी काळदाते कार्याध्यक्ष धनगर धर्मपीठ महाराष्ट्र राज्य व श्री समधान बागल समाज सेवक व प्रहार संघटन नाशिक यांनी विनंती केली आहे की सहावे आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य २०२५ हे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर रंगमहाल ता.चांदवड जि. नाशिक येथे घेण्यात यावे.चांदवड येथे होळकरशाहीची उपराजधानी असून या ठिकाणी सुंदर असा रंगमहाल आहे. या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे अनेक वेळेस वास्तव्य असल्याचे समजते. सदरील रंगमहाल भारत सरकार च्या पुरातत्व खात्याने संरक्षित केला असून महाराष्ट्र राज्यातील जातीच्या राजकारणा मुळे जसा धनगर जमातीचा ईतिहास दुर्लक्षित आहे तसाच हा रंगमहाल व उपराजधानी दुर्लक्षित आहेत.

देशाच्या ईतिहासाला, ऐतिहासिक पुरुषाना, व्यक्तीना, ऐतिहासिक वारसांना जात आणि धर्म नसतो.लोकशाहीत राजेशाही कधीच नष्ट झाली. आता जे आहे ते राजे नाहीत तर राजघराण्याचे वारस आहेत. ते राजे म्हणून घेतात हे लोकशाहीची थट्टाच आहे. तर हे राजे समजून जातीवाद करत फिरतात हा त्या राजघराण्याचा आपमान आहे.अशा जातीय व धर्मावर चाललेल्या राजकारणात राजा हल सातवाहन, चंद्रगुप्त मौर्य, अशोक सम्राट, होळकर शाही यांचा ईतिहास आजही ईतिहासाच्या पुस्तकात व परदेशी ग्रंथालयात बंद आहे.

अशा भयानक परिस्थितीत २००७ पासून धनगर धर्मपीठ संस्थेमार्फत आदिवासी धनगर साहित्य संमेलन घेण्याचा प्रयत्न केला आणि ७/८ जानेवारी २०१७ ला पहिले आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य हे श्री संजय सोनवनी प्राख्यात लेखक ईतिहास संशोधक यांच्या अध्यक्ष खाली धुमधडाक्यात धनगर जमातीचा ईतिहास राजकीय पटलावर आणत यशस्वी रित्या सुरु झाले. सलग ऐतिहासिक पाच साहित्य संमेलन एक संत वारकरी परिषद घेण्यात आली.लवकरच आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य यांची टिम मा. अध्यक्ष मा.आमदार रामहरी रुपनवर माळशिरस , उपाध्यक्ष श्री संभाजीराव सुळ लातूर,
श्री संजय सोनवनी पहिले अध्यक्ष, प्राख्यात लेखक ईतिहास संशोधक पुणे.

श्री हरिदास जी भदे मा.आमदार आकोला.
श्री ज्ञानेश्वर ढोमणे सचिव आमरावती.
श्री बाळासाहेब कर्णवर पाटील राजेवाडी,
श्री आर एस चोपडे सर चौथे अध्यक्ष सांगली,श्री पांडुरंग रुपनवर सांगली. श्री विष्णू माने नगरसेवक सांगली. प्राचार्य
डाॅ.मधुकर सलगरे लेखक लातूर.
श्री छगनशेठ पाटील ठाणे उद्योजक मुंबई. श्री सोमनाथ कर्णवर पाटील एपीआय ठाणे.
श्री संजय शिंगाडे सर सांगोला, श्री आलदर सर कोळा, श्री सिध्दारूड बेडगनूर सर , श्री बिसलसिद्ध काळे पत्रकार, कवी होनमाने सर,कवी लेखक गोविंद काळे,
श्री भरत कुमार मोरे पत्रकार उपसंपादक पुण्यनगरी,
श्री हनमंतराव चौरे सातारा, श्री विठ्ठल सजगने सर,म्हसवड.
श्री पवन थोटे यवतमाळ.
श्रीराम पाटील सर्व सोलापूर. श्री चंद्रकांत हजारे प्रवक्ते लातूर.
श्री बाळासाहेब टकले करमाळा, श्री अगंद देवकते करमाळा.
श्री क्रुष्णा बुरूंगुले मुंबई,
ईजिंनियर धुळाभाऊ शेंडगे बेगंलोर.या मान्यवरांच्या मार्गदर्शना खाली नाशिक आणि रंगमहाल चांदवड या ठिकाणास भेट देऊन सहावे आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य याचे स्थळ ठरवून रितसर जाहीर केले जाईल.

डाॅ अभिमन्यू टकले
संस्थापक धर्मपीठ महाराष्ट्र राज्य.
आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य.

Share this...