चांदवड येथील ६ व्या आदिवासी धनगर साहित्य संमेलनास तालुक्यातील समाज बांधवांनी उपस्थितीत राहावे- संभाजीराव सुळ..
करमाळा -प्रतिनीधी..
साहित्यिक विचाराने माणूस घडतो विचारांचे मंथन करण्यासाठी साहित्य संमेलने आयोजित करणे आवश्यक असल्याचे मत लातूर येथील उद्योगपती संभाजीराव सूळ यांनी व्यक्त केले ते चांदवड जिल्हा नाशिक येथे होणाऱ्या सहा वे आदिवासी धनगर साहित्य संमेलनाच्या नियोजनाच्या पार्श्वभूमीवर बोलत होते यावेळी अध्यक्षस्थानी डॉ अभिमन्यू टकले हे होते पुढे बोलताना श्री सूळ म्हणाले की ज्या ज्या समाजांनी पुस्तके हाती घेतली तोच समाज क्रांती करू शकला साहित्य संमेलनाच्या माध्यमातून आपली मूळ ओळख रीती रिवाज चालीरीती परंपरा महापुरुषांचे योगदान व त्यांच्या योगदानामुळे राष्ट्र निर्माण करणे कामी त्यांचा असणारा वाटा आपल्या नव्या पिढीला कळणार आहे यामुळे महाराष्ट्रातील तमाम बांधवांनी हे साहित्य संमेलन यशस्वी करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले
आज करमाळा के, हाईट्स येथे आढावा बैठक संपन्न झाली यावेळी धनगर साहित्य संमेलन संस्थापक अध्यक्ष डॉ.अभिमन्यू टकले व महाराष्ट्राचे उपाध्यक्ष उद्योगपती संभाजीराव सुळ यांच्या प्रमुख उपस्थितीत करमाळा येथे आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी संभाजीराव सुळ, डॉ.अभिमन्यू टकले यांचा सकल धनगर समाज करमाळा तालुक्याच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी आदिवासी धनगर साहित्य संमेलन व धनगर समाजाची आसलेली पिछेहाट, धनगर आरक्षण आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३००व्या जयंती सह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी धनगर धर्म पिठाचे जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब टकले, राष्ट्रीय समाज पक्षाचे मा.जिल्हा सरचिटणीस अंगद देवकते, भाजप किसान मोर्चा जिल्हा सरचिटणीस नरेंद्रसिंह ठाकूर, भाजप युवा मोर्चा तालुका अध्यक्ष शुभम बंडगर, दैनिक संचार चे पत्रकार काळे साहेब, रासपचे विधानसभा अध्यक्ष शंकर सूळ , प्रगतशील बागायतदार पप्पू सलगर, उद्योजक अशोक जाधव, श्रीराम देवकाते , रासप ता.संपर्क प्रमुख विकास मेरगळ, बाबासाहेब चौगुले , आशिष बंडगर आदी मान्यवर उपस्थितीत होते.