मा.डॉ. अभिमन्यु टकले सर… आपले महत्कार्यास समर्पित चार ओळी
पौराणिक अभिमन्यु चक्रव्यूह भेदणारा,
सांप्रत अभिमन्यु व्यवस्थाचक्र छेदणारा…
प्रस्थापित मक्तेदारी मोडित काढणारा,
जमाती अस्तित्वाची दखल जोडणारा…
विखुरलेला धनगर समाज सांधणारा,
प्रगल्भ विचारमोट एकसंघ बांधणारा…
संघटन कौशल्य ते पणांस लावणारा,
उपेक्षितांचे उद्धारासाठीच धावणारा…
व्यक्तिगत आयुष्याचं सुख त्यागणारा,
समाज हिताचं पसाय-दान मागणारा…
प्रणाम असो आपले दैदिप्यमान धैर्याला,
न् भूतो न् भविष्यति अतुलनीय कार्याला…
——————————–
शुभचिंतक: धनराज खडसे, नागपूर.