Share this...

पूर्वीचा उस्मानाबाद जिल्ह्य़ात सध्या धाराशिव ता.उमरगा येथील स्वर्गीय डाॅ.के.डी.शेंडगे हे नाव समाज सेवेत आणि वैद्यकीय क्षेत्रात खूपच प्रसिद्ध आहे.आजही सर्व पत्रकार, समाज सेवक त्यांना विसरू शकत नाहीत. डाॅ.के.डी.शेंडगे हे धनगर जमाती मध्ये समाज सेवक म्हणून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसिद्ध होते. जो आवडे सर्वाना तो आवडे देवाला या उक्ती प्रमाणे ते कार्य करतच सोडून गेले.

त्यांचा वैद्यकीय सेवेचा व शैक्षणिक सेवेचा वारसा त्यांचे बंधू डाॅ. राजेंद्र(आरडी) शेंडगे व सर्व नातेवाईक चालवत आहेत. तसेच नुकत्याच तुळजापूर विधान सभा लढवलेल्या डाॅ. स्नेहा सोनकाटे या त्यांच्याच भाची.

डाॅ. आर.डी.शेंडगे हे एम.बी.बी.एस.व एम एस जनरल सर्जन आहेत. त्यांनी उमरगा येथे शंभर खाटांचे शेंडगे हाॅस्पीटल स्थापन केले.तसेच जय मल्हार बहु उद्देशीय संस्थेची स्थापना केली आहे. त्यांनी बालवाडी ते दहावीपर्यंत ईंग्लींश स्कूल ची स्थापना केली आहे. तसेच आकरावी व बारावी सायन्स व काॅमर्स काॅलेज ही काढलेले आहेत. तसेच या शिक्षणाची गुणवत्ताही सांभाळली आहे. गेल्या दोन वर्षांपासून त्यांनी त्यांच्या बंधूच्या नावाने शासकीय मान्यता प्राप्त व महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक संलग्न डाॅ.के.डी. शेंडगे आयुर्वेदिक महाविद्यालय उमरगा हे सुरु केले आहे. दर वर्षी पन्नास आयुर्वेदिक डाॅक्टर बाहेर पडणार आहेत. तसेच त्यांनी शासन मान्य व महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ संलग्न सुश्रुत बीएस्सी नर्सिंग काॅलेज उमरगा सीईटी काॅलेज कोड 09389 हे सुरू केले असून कॅप रांउड मध्ये प्रवेश चालू आहेत. तसेच डाॅ आर डी शेंडगे यांनी गेल्या वर्षी शासन मान्य जी एन एम तिन वर्षाचा नर्सिंग कोर्स सुरू केला आहे. या सर्व कोर्स ची दर वर्षी प्रवेश क्षमता पन्नास आहे. या ठीकाणी प्रवेश घेणार्या सर्व विद्यार्थ्यांना शासनाच्या सर्व सवलती आहेत . जीएनएम नर्सिंग ला आर्ट, काॅमर्स,सायन्स बारावी पास मुली मुले हा कोर्स करून आर्थिक द्रुष्टया स्वतःच्या पायावर उभा राहू शकतात.प्रथम बॅचला पन्नास पैकी पन्नास विद्यार्थ्यी शिक्षण घेत आहेत.सध्या जीएनएम नर्सिंग दुसर्‍या बॅचचे प्रवेश चालू आहेत. राज्यभरातील गरजू बारावी पास आर्ट, काॅमर्स, सायन्स च्या विद्यार्थ्यांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे.समाजातील लोकांनी याचा लाभ घ्यावा.ही संस्था विकसनशील आहे . ही संस्था उभा करताना डाॅ. आर.डी.शेंडगे यांना अर्थातच अनेक सामाजिक, आर्थिक, शासकीय संघर्ष करावा लागला आहे. कोणत्याही प्रकारचा सामाजिक,आर्थिक राजकीय पाठीबां नसताना स्वबळावर मराठवाडय़ातील उमरग्या सारख्या ग्रामीण भागात डाॅ आर डी शेंडगे हे कार्य करत आहेत. मध्यमवर्गीय, गोरगरीब पालक आणि विद्यार्थ्यांना नाममात्र फी आकारून हमखास नोकरी उपलब्ध करून देणारे शिक्षण संस्थे मार्फत दिले जात आहेत. डाॅ.आर डी शेंडगे हे जमिनीवरून चालनारे डाॅक्टर आहेत. समाजाच्या कार्यात राज्यभर सक्रिय असतात.डाॅ शेॅडगे पहिल्या व दुसर्‍या साहित्य संमेलनाला सक्रिय सहभागी होते. हाॅस्पीटल व संस्थेमार्फत ग्रामीण भागात त्यांनी अनेक गरजू लोकांना वैद्यकीय सेवा व रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत.
तसेच महाराष्ट्र शासनाच्या गरिब रुग्णांना मिळणार्या सर्व शासकीय सवलतीत मिळणारे उपचार व सेवा हाॅस्पीटल मध्ये उपलब्ध आहेत.

राज्यभरातील गरजू रुग्णानी व गरजू पालक, विद्यार्थ्यी, हितचिंतक यांनी नक्कीच डाॅ.आर डी शेंडगे यांना संपर्क करावा. संपर्का साठी भ्रमण ध्वनी: 9422464584/ 8626050262.
प्राचार्य डाॅ. अभिमन्यु टकले.

Share this...