Share this...

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर त्रिजन्म शताब्दीनिमित्त आपले सहावे राष्ट्रीय धनगर साहित्य संमेलन रंगमहाल ता.चांदवड जि.नाशिक महाराष्ट्र राज्य येथे घेण्यात येणार आहे. मान्यवराच्या तारखा मिळाल्या की चांदवडचे संयोजन टिम बरोबर बैठक आयोजित करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे पुर्ण नियोजन झाले की कार्यक्रम पत्रिका तयार केली जाणार आहे व मगच संमेलनाची तारीख जाहीर करण्यात येणार आहे.

साहित्य संमेलनाच्या पहिल्याच बैठकीत होळकर वाडा, रंगमहाल महाराष्ट्र राज्याच्या ऐतिहासिक, राजकीय पटलावर आला. चांदवडच्या मुद्रण प्रसार माध्यमांनी खूपच उचलून धरले.चांदवड होळकर शाहीची उपराजधानी असल्यामुळे व पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची त्रिजन्म शताब्दीनिमित्त धनगर साहित्य संमेलन होणार असल्याने संमेलनाला आणखीनच वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे.

या संमेलनाची उत्सूकता खूपच वाढलेली आहे.अनेक लोकांचे फोन येत आहेत.आपले हे व्यासपीठ सर्व क्षेत्रातील ,सर्व जाती धर्मातील बौद्धीका साठी खुले आहे. साहित्य संमेलनाला उशीर होण्याचे कारण नगरपरिषद, महानगरपालिका, पंचायत व जि.प. निवडणूका होत्या. साहित्य संमेलन हे जमाती साठी क्रांतीकारी आणि ऐतिहासिक निर्णय आहे. साहित्य संमेलन घेण्या साठी अनेक मान्यवर तयार आहेत. अनेक तरुण पुढे येत आहेत. त्यातीलच एक तरुण श्री समाधान बागल हे तरूण आहेत. तसेच नाशिक मधील अनेक लोक संपर्कात आहेत. तसेच संमेलन यशस्वी करण्यात सर्वात महत्वाचा घटक म्हणजे राज्यातील सर्व पत्रकार, सर्व क्षेत्रातील साहित्यीक आहेत.

लोकशाही असो की राजे शाही असो साहित्य आणि वक्तृत्व हे शस्त्र आहेत ते राज्याचे, देशाचे तक्त बदलतात ,समाज परिवर्तन करतात. अशा या चळवळीत सहभागी होण्या साठी सर्व क्षेत्रातील साहित्यीकांनी आपली नावे कळवावेत. सर्व क्षेत्रातील अनेक दिग्गज आपल्या संमेलनात सहभागी पूर्वी झाले आहेत आणि आता ही होणार आहेत. चुकून कोणी राहू नये. लवकरच साहित्य संमेलन अध्यक्ष आणि साहित्य संमेलन तारीख जाहीर करण्यात येणार आहे.
आपल्या जमातीचा आवाज राज्याच्या आणि देशाच्या काना कोपऱ्यातून घुमन्या साठी एकमेव व्यासपीठ राष्ट्रीय धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य चांदवड जि.नाशिक.तरी राज्यातील सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी या आपल्या हक्काच्या व्यासपीठात सामील व्हावे.
खालील मान्यवराकडे फोन करुन नावे कळवावीत.

श्री गोविंद काळे
वरिष्ठ कवी,लेखक सोलापूर. 8459874278.
श्री ज्ञानेश्वर ढोमणे सर आमरावती.
राज्य सचिव. धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य
फोन 9423434223.
श्री बापूसाहेब हटकर.मुंबई. कवी,लेखक, नाटककार, अध्यक्ष धर्म पीठ.
फोन:7710020069,
श्री बिसलसिद्ध काळे लेखक व पत्रकार सोलापूर. प्रसिद्धी प्रमुख आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य.
फोन:9921018221′
श्री उज्ज्वलकुमार माने लेखक पत्रकार 9922424619
श्री समाधान बागल स्वागत अध्यक्ष
9373531094
श्री बाळासाहेब कर्णवर पाटील
7798987001

जास्तीत जास्त ग्रुपवर पाठवण्यात यावे.

Share this...