डाॅ.प्रकाश महानवर कुलगुरू व मा.खासदार रामराव वडकुते यांचा सत्कार सोहळा.

सत्कार सोहळा मंगळवार दिनांक २४/०३/२०२६
वेळ : सायंकाळी ०६वाजता
स्थळ:नानासाहेब कर्णवर पाटील निवास.
गोरडवाडी. ता.माळशिरस जि.सोलापूर.
महाराष्ट्र राज्यातील सर्व क्षेत्रातील साहित्य प्रेमीना कळवण्यात येते की डाॅ.प्रकाश महानवर कुलगुरू पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर यांची सहावे राष्ट्रीय आदिवासी धनगर साहित्य संमेलन चांदवड जि.नाशिक च्या अध्यक्ष पदी निवड झाली आहे. हे संमेलन शनिवार व रविवार दिनांक ११ व १२एप्रील २०२६ रोजी होत आहे. हे संमेलन होळकर शाहीच्या उपराजधानीत होत आहे व होळकरांच्या राजवाड्यात होत आहे. या ठिकाणी सुभेदार मल्हाराव होळकर आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे वास्तव्य होते.तसेच हे साहित्य संमेलन पुण्यश्लोक श्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिजन्म शताब्दीनिमित्त होत आहे.
अशा या संमेलनाध्यक्ष पदी डॉ. प्रकाश महानवर कुलगुरु यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा संयोजन समिती मार्फत सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे व संमेलन नियोजन बैठक ही ठेवण्यात आली आहे. तसेच मा.रामराव वडकुते साहेब यांची खासदार म्हणून निवड झालेली आहे त्या साठी त्यांचा सत्कार करणार आहोत.
उपस्थित सर्व मान्यवरांसाठी सहभोजन कार्यक्रम ठेवलेला आहे. तरी या कार्यक्रमास हजर रहावे असे संयोजन समिती मार्फत :श्री बाळासाहेब कर्णवर पाटील उपाध्यक्ष श्री श्री सदगुरू साखर कारखाना राजेवाडी यांनी कळवले आहे .खालील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
डाॅ.प्रकाश महानवर कुलगुरु पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर.
श्री रामराव वडकुते नवनिर्वाचित खासदार. हिंगोली.
डाॅ. आर.डी. शेंडगे जनरल सर्जन उमरगा.
प्राचार्य आर एस चोपडे सर अध्यक्ष अहिल्या शिक्षण संस्था सांगली.
डाॅ.अभिमन्यु टकले संस्थापक आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य.
मा.ब्रम्हानंद पडळकर मा.सभापती सांगली.
श्री हणमंतराव चौरे शिवसेना नेते सातारा.
श्री संभाजीराव सुळ मा.संचालक डीसीसी बॅक लातूर.
श्री ज्ञानेश्वर ढोमणे सचिव साहित्य संमेलन
श्री गोविंद काळे सोलापूर. श्री उज्ज्वलकुमार माने लेखक पत्रकार सोलापूर.
श्री देवेंद्र मदने सर सोलापूर. प्राचार्य श्री बेडगनूर सर सोलापूर
श्री बापूसाहेब शिंदे संयोजक नाशिक.
भजनदास चोरमले चेअरमन.
नईम खान पठाण
प्रा.शिवाजी बंडगर सर माजी सभापती करमाळा.
डाॅ.मारूती पाटील
श्री आप्पासाहेब देशमुख मा.नगराध्यक्ष माळशिरस.
