Share this...

धनगर धर्म पीठ महाराष्ट्र राज्य.

कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन l मा कर्मफलहेतुरभूर्मा ते संङ्गोस्त्वकर्मणी ll

धनगर धर्म पीठ महाराष्ट्र राज्य स्थापना २०१८ ला झाली.

समाजकारण, राजकारण, धर्मकारण, आर्थिककारण, औद्योगिकरण,साहित्य सर्व क्षेत्रात प्रस्थापित लोकांनी कब्जा केलेला आहे. आपण अज्ञानी असल्याने असंघटित आहोत. आपण स्वार्थ, मोह, माया, काम, क्रोध ,अहंकार यांनी ग्रस्त आहोत. म्हणूनच आपण नेते गिरी करत असताना एकत्र येत नाहीत. पण आपली जमात वेळ आली की एकत्र येते आणि राज्याचे चित्र बदलून टाकते हा अनुभव आहे.

अशा जमातीचा इतिहास, साहित्य, संस्कृती, राजकीय पटलावर यावा म्हणून आदिवासी धनगर साहित्य संमेलन साहित्य व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. जमाती मध्ये काही परमेश्वरा सारखी निस्वार्थी,शूर,दानशूर, लोक आहेत म्हणून आपण साहित्य संमेलन घेवू शकलो.

दर वर्षी दिवाळी झाल्यानंतर दुसरी दिवाळी पर्यंत धनगर जमातीच्या लाखो लोकांच्या जत्रा यात्रा भरत असतात. दररोज सूर्योदयापासून ते सुर्यास्त पर्यंत कन्याकुमारी ते काश्मीर पर्यंत भारत भूमीवर घंटानाद ऐकावयास मिळतो.म्हणून भारत भूमी ही दैवतांची भूमी आहे. देशात जरी घटनेचे प्रशासकीय राज्य असले तरी भारत देशातील लोकांच्या ह्रदयावर धर्माचे राज्य आहे. परंतु कलयुगीन अज्ञान आणि स्वार्थ यामुळे आपल्या ह.भ.प. मंडळी ना व्यक्त होण्यासाठी धार्मिक व्यासपीठ नव्हते या साठी आपण धनगर धर्म पीठ तथा लोक धर्म पीठ स्थापन केले आहे.या धर्म पीठ मार्फत कोरोना काळात ऑनलाईन आठवडा सत्संग सुरु केले. दि. २५|१२| २०२२ रोजी १००वा सत्संग आहे. या निमित्त एक दिवसीय स्वर्गीय द्रौपदीबाई काळदाते यांच्या स्मरणार्थ ऐतिहासिक पहिली विदर्भ स्तरीय संत वारकरी परिषद शिंदखेड ता.जि.आकोला येथे रविवार दिनांक २५|१२|२०२२ रोजी आयोजित करण्यात आली आहे. आगदी साध्या पध्दतीने हा कार्यक्रम पार पडणार आहे.वारकरी संत परिषद जत्रा किंवा यात्रा नाही. विदर्भातील ९५ सत्संग मथ्ये योगदान दिलेल्या सहभागी साठी हा कार्यक्रम आहे. राज्यभरातील वारकरी आणि संत मंडळी साठी राज्यस्तरीय महापरीषद आयोजित केली जाणार आहे. त्यामुळे कोणी नाराज होऊ नये किंवा गर्दी करु नये.आम्हाला सर्व समाज घटक देवा प्रमाणे आहेत. आम्ही आपल्या समाजाचे,देशाचे , सेवक नाहीत तर भक्त आहोत.
पुढच्या लेखात संत व वारकरी परिषदे विषयी थोडक्यात माहिती दिली जाणार आहे.

आपले समाज भक्त.
प्रा.डाॅ. अभिमन्यु टकले. संस्थापक धनगर धर्म पीठ महाराष्ट्र राज्य.
हभप श्री प्रभाकर दिवनाले महाराज. धर्म गुरू विदर्भ. धनगर धर्म पीठ तथा लोक धर्म पीठ महाराष्ट्र राज्य.

Share this...