Share this...

सोलापूर, दिनांक ( अमोल पांढरे, याजकडून ) 24 आणि 25 फेब्रुवारी 2024 रोजी, सोलापूर जिल्ह्यातल्या उत्तर सोलापूर तालुक्यातील “बेलाटी” येथे होणाऱ्या, 5 व्या आदिवासी धनगर साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी, माजी आमदार तथा ज्येष्ठ साहित्यिक, मा. अँड. श्री. रामहरी रुपनवर यांची निवड करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवरती त्यांच्या कार्याचा आढावा आणि त्यांचा अल्प परिचय उपलब्ध करून देण्याचा हा एक छोटासा प्रयत्न…

एक हसतमुख, सोज्वळ, जिद्दी, मनमिळाऊ आणि लढावू व्यक्तिमत्व म्हणून आमदार, मा. ॲड. श्री. रामहरी रुपनवर यांची सर्वत्र ओळख आहे. महाराष्ट्रातील सर्व जनता त्यांना प्रेमाने आप्पा म्हणून संबोधते. त्यांचा जन्म सोलापूर जिल्ह्यातल्या माळशिरस तालुक्यातील एकशिव या गावी निरा नदीच्या काठावरील एका खेडेगावात झाला. वडील लहानपणीच गेल्यामुळे कुटुंबाची आर्थिक जबाबदारी त्यांच्यावरती येवून पडली. ही जबाबदारी पेलत असताना त्यांना शेतीत काबाड-कष्ट करावे लागले. तसेच अकलूज येथिल कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नोकरीही करावी लागली. आणि ही नोकरी करीत करीतच त्यांनी बी.कॉम (ऑनर्स) व त्यानंतर एल.एल.बी.चे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर नोकरीचा राजीनामा देऊन, त्यांनी माळशिरसच्या न्यायालयात वकिली व्यवसायिक सुरू केला. वकिली व्यवसाय करीत असताना ते एकशिव ग्रामपंचायतचे सदस्य म्हणूनही निवडून आले. तेथेही त्यांनी दहा वर्षे काम केले. त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य म्हणूनही ते सलग दहा वर्ष निवडून आले. आणि सर्वसामान्यांसाठी झपाटून काम केले. त्यानंतर विधान परिषदेचे आमदार म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. आमदार म्हणून कामकाज करण्याची संधी मिळाल्यानंतर त्यांनी अधिवेशनं असो की सभागृहातील चर्चा विविध प्रश्नांच्यावरती आवाज उठविला. आणि सर्वसामान्य जनतेसह समाजाचे अनेक प्रश्न तसेच विविध योजनाही मार्गी लावल्या. त्याबरोबरच शासनाच्या विविध धोरणात्मक निर्णयामध्येही त्यांनी भाग घेतला अनेक धोरणं ठरवली आणि अमलातही आणली. ज्या शासनाच्या विविध योजना होत्या त्या अंमलात आणून सर्वसामान्यांचे जिवनं सुखी करण्याचा प्रयत्नं केला. त्याशिवाय या काळात त्यांनी दूध संघ, पतसंस्था, शिक्षण संस्था, ट्रस्ट आणि विविध कंपन्यांची निर्मिती करण्यातही त्यांनी मोलाचे योगदानं दिले.

नेहमीचं सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्याने रुपनवर आप्पा यांनी यशाची अनेक शिखरे गाठली. प्रचंड साहित्यनिर्मीती केली. विविध विषयांवरती व्याख्याने दिली. समाजासोबत अखंड संवाद साधण्याचे त्यांचे कसबं वाखाणण्यासारखे आहे. हे कार्य आजही सुरूच आहे. अनेकवेळा त्यांनी अभ्यासासाठी विदेशदौरेही केले आहेत. लहानपणापासूनच वारकरी सांप्रदायाची शिकवण लाभल्याने ते पूर्णपणे शाकाहारी आणि निर्व्यसनी आहेत. वाचनाची, भाषणाची त्यांना प्रचंड आवड आहे. अनेक थोरा – मोठ्यांचा सहवास त्यांना लाभला. ही त्यांच्या जिवनात जमेची बाजू राहिली आहे. परिणामी ते यशाच्या आणि लोकप्रियतेच्या शिखरावरती पोहोचले आहेत. त्यांच्या या सर्व कार्याची दखल घेऊनच, आदिवासी धनगर साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.


त्यांच्याविषयी अगदी थोडक्यात…✍️🌹

नाव – अँड. रामहरी गोविंदराव रुपनर

जन्म – दिनांक 1 जून 1956

शिक्षण – बी.कॉम (ऑनर्स) एल.एल.बी

पत्ता – मु. पो. नातेपुते (पालखी मैदान) तालुका – माळशिरस, जिल्हा – सोलापूर

मोबाईल नंबर – 99 22 96 89 26, 98 34 88 30 36

– माजी सदस्य – महाराष्ट्र विधान परिषद

– सरचिटणीस – महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी

– प्रशिक्षण – प्रशिक्षणप्रमुख, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी

– अध्यक्ष – महाराष्ट्र धनगर समाज महासंघ

– चेअरमन – श्रीराम शेती दुग्ध प्रक्रिया लिमिटेड, नातेपुते

– अध्यक्ष – ज्ञानगंगा शिक्षण प्रसारक मंडळ एकशिव

– अध्यक्ष – निरा कालवा, पाणी वाटप संस्था एकशिव

– अध्यक्ष – जय मल्हार कृषी व ग्रामीण विकास प्रतिष्ठानं, एकशिव

– अध्यक्ष – रामहरी रुपनवर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, नातेपुते

– सदस्य – पंचायत राज समिती, विधानमंडळ मुंबई

📜✒️🌹राजकीय व सामाजिक कार्य 🌹

– संघटक – सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी

– सदस्य – जिल्हा परिषद, सोलापूर 10 वर्षे (1997 ते 2007)

– संचालक – महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ मर्यादित, पुणे

– चेअरमन – एकशिव विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी, दहा वर्ष (1988 ते 1998) सरचिटणीस – महाराष्ट्र धनगर समाज महासंघ

– संचालक – महाराष्ट्र राज्य बाजार समिती संघ, धुळे

– संस्थापक अध्यक्ष – सिद्धनाथ ग्रामीण सहकारी पतसंस्था, एकशिव

– अध्यक्ष – महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ कर्मचारी युनियन

– अध्यक्ष – 44 फाटा शेतकरी अन्याय निवारण कृती समिती, नातेपुते

– सदस्य – जिल्हा शिक्षण सल्लागार समिती, सोलापूर

– सदस्य – ग्रामपंचायत एकशिव 10 वर्षे (1989 ते 2000)

– सदस्य – बांधकाम समिती, जिल्हा परिषद, सोलापूर

– सिनेट सदस्य – सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे

📜✒️🌹 उल्लेखनिय सामाजिक कार्य – 🌹

– ४४ फाटा बारमाही पाणी योजनेसाठी संघर्ष करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला.

– ऊस उत्पादक शेतकऱ्यांना संघटित करून त्यांनाही न्याय मिळवून दिला.

– बी.सी. आणि ओबीसी समाजासाठी जमीन मिळावी यासाठी संघर्ष केला.

– महाराष्ट्रात अहिल्या संदेश यात्रेचे आयोजनं

– पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर एका पोवाड्याची रचना केली.

– राजकारण, समाजकारण तसेच पारमार्थिक विषयावरती अनेक व्याख्यानें दिली…

अशा या बहुआयामी व्यक्तिमत्वाची, म्हणजेच रुपनर आप्पा यांच्या सर्व कार्याची दखल घेऊन त्यांना सन्मानित करण्याचा चंग, आदिवासी धनगर साहित्य संमेलनाच्या टीमने बांधला होता. म्हणून तर संमेलनाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आप्पांची भेट घेऊन त्यांना या संमेलनाचे अध्यक्षपद स्वीकारण्याची विनंती केली असता, त्यांनी सर्वांच्या विनंतीला मानं देवून, हे अध्यक्षपद स्वीकारले आहे. याबद्दल सकल महाराष्ट्रातील धनगर-ओबीसी आणि बहुजन समाजबांधवांच्याकडून तसेच महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेकडून, साहित्यिक, लेखक, विचारवंत, कवी, इतिहासतज्ञ, इतिहास संशोधक, इतिहासाचे अभ्यासक या आणि अशा सर्वच घटकातून त्यांच्यावरती अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

📜✒️🔥🌹🌹🌹

या साहित्य संमेलनाला आपण यायला विसरायचं नाही.

🔥दिनांक – 24 आणि 25 फेब्रुवारी 2024 रोजी…

वेळ – सकाळी 8 वाजल्यापासून…

📜✒️ स्थळ – संत सद्गुरू बाळुमामा मंदिर, विजयपूर बायपास रोड, बेलाटी, तालुका उत्तर सोलापूर, जिल्हा सोलापूर

आपले विनीत 🙏📜✒️🌹- आदिवासी धनगर साहित्य संमेलन, संयोजन समिती, सोलापूर

Share this...