विदर्भस्तरीय वारकरी संत परिषद , सिंदखेड जि. आकोला.रविवार दिनांक २५|१२|२०२२
धनगर धर्मपीठ महाराष्ट्र राज्य .
🌹🌹🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️
काय सांगो आता संतांचे उपकार ।
मज निरंतर जागविती ॥
काय द्यावे त्यांसी व्हावे उतराई ।
ठेविता हा पायी जीव थोड़ा ॥
सहज बोलणे हित उपदेश ।
करुनि सायास शिकविती ॥
तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ती ।तैसे मज येती सांभाळीत ॥
महाराष्ट्र ही संतांची भूमि . येथिल लोकांवर संतांनी आईच्या मायेने प्रेम केले . वेळप्रसंगी त्यांनी स्वतःची अथवा स्वतःच्या कुटुंबाची पर्वा केली नाही . स्वतःवर कितीही अन्याय, अत्याचार झालेत, पदरी दुःरव पडले तरी त्यांनी आपले कार्य अविरतपणे सुरुच ठेवले .
” बुडतां हे जन न देखवे डोळा ।येतो कळवळा म्हणूनिया ॥”
कालबाहय झालेल्या अथवा अनावश्यक जून्या चालीरीती ,प्रथा, अंधश्रध्दा, कर्मकांड या विरुद्ध आपल्या संत साहित्यातून अथवा प्रत्यक्ष मार्गदर्शनातुन जनजागृती केली. संतांना सर्वसामान्याचे दुःरव सहन झालेच नाही. दु:खी पिडीतांचे उद्धाराचाच त्यांनी नेहमी विचार केला.
” जगाच्या कल्याणा संतांच्या विभूति ।देह कष्टविती परउपकारे ॥ ”
संतांचा जन्मच मूळी उपकारासाठी झालेला असतो . सर्वांचे उपकार सांगता येतील परंतु संतांचे उपकार , कृतज्ञता शब्दबध्द करणे शक्यच नाही. त्यांच्या उपकारातून उतराई होणे शक्यच नाही. त्यांच्या पायी जीव ठेवला तरी त्याची किंमत अल्पच आहे. संत हे जीवात्म्याला अविद्येतून , अज्ञानातून , व्यावहारिक झोपेतून जागे करत असतात . अतिजलद गतीने अधोगतीला जाणाऱ्या जीवाच कस होईल याचीच त्यांना नेहमी चिंता असते .
जीवन जगत असतांना प्रत्येक जीवालाआधिभौतिक,आधिदैविक व अध्यात्मिक या त्रिविध तापांना सामोरे जावेच लागते .मनुष्य कोणत्याही जातीधर्माचा, पंथाचा असो त्याचे सांसारिक दुःख हे सारख्याच प्रतिचे असते . आज घरोघरी संत उपलब्ध होत नसले तरी संत साहीत्याच्या माध्यमातून आपल्याला संत नेहमीच मार्गदर्शक ठरत असतात . अपकार करणाऱ्यावर सुध्दा संत उपकारच करत असतात .गाईच्या चित्तामध्ये वासराविषयी जो जिव्हाळा असतो त्या भावनेने संत कष्ट सोसून जीवाचे हीत जोपासतात . देव म्हणजे संत किंवा संत म्हणजे देवच असतात . आपल्याला प्रत्यक्षपणे देव भेटत नसले तरी संतांच्या रुपाने देव या भूतलावर अवतरित होत असतात .
संत साहित्य , संतांचे विचार घराघरात पोचविण्याचे काम वारकरी संप्रदाय अविरतपणे वर्षानुवर्षापासून करित आहे .
डॉ.अभिमन्यु टकले संस्थापक अध्यक्ष यांनी स्थापन केलेल्या धनगर धर्मपीठाला याचा सार्थ अभिमान आहे .उपेक्षितांचा सन्मान व्हावा , नवोदितांना हक्काच व्यासपीठ मिळाव तसेच सर्वसामान्यांना भक्तीचे खरे मर्म कळावे . भगवंत विन्मुखांना भगवंत सन्मुख करणे,त्यांची अध्यात्मिक प्रगती करणे या उद्देशाने स्थापन केलेल्या धनगर धर्मपीठाला राजकारणापासून नेहमीच अलिप्त ठेवण्याचा प्रयत्न केल्या जात आहे .
अल्पप्रमाणात कां होईना संतांच्या उपकारातून उतराई होण्याकरिता तसेच राजकारणापासून नेहमीच अलिप्त असलेल्या वारकरी संप्रदायातील काही सज्जन संतमंडळींना प्रोत्साहित करण्याकरिता या वारकरी संत परिषदेचे रविवार दि. २५ डिसेंबर रोजी स्व. द्रौपदाबाई काळदाते यांचे प्रथम पुण्यस्मरणार्थ सिंदखेड जि. अकोला येथे आयोजन करण्यात येत आहे. या कार्यक्रमात कीर्तनातून प्रबोधन, संताच्या स्मरणार्थ उपस्थित हभप मंडळीचा गौरव करण्यात येणार आहे. सद्यस्थितीत धार्मिक, अध्यात्मिक,संस्कृतीचे,धर्म संस्थाचे ,मठांचे प्रश्न,धर्म शिक्षणाचे प्रश्न, यात्रा जत्रांचे प्रश्न,धर्म साहित्याचे प्रश्न,गोशाळांचे प्रश्न भेडसावत आहेत. यावरती या संत वारकरी परिषदेत ठराव घेऊन राज्य, केंद्र सरकार कडे पाठपूरावा धनगर धर्मपीठ महाराष्ट्र राज्य मार्फत केला जाईल. खरंतर श्री विनायकराव काळदाते यांनी धनगर धर्मपीठ मार्फत दि.१९|१२|२०२२ पर्यंत अखंड आठवडी ९९ ऑनलाईन सत्संग घेत आहेत. दि. २५|०१२| २०२२चा सत्संग हा अखंड १००वा सत्संग आहे. आणि तो त्यांच्या शिवभक्त मातोश्री स्व. द्रौपदाबाई काळदाते यांच्या स्मरणार्थ होत आहे.
सदर कार्यक्रम भव्यदिव्य स्वरूपाचा नसला,मर्यादित स्वरूपाचा असला तरी या मागील भावना व या वारकरी संत परिषदेचा उद्देश महत्वाचा आहे असे मला वाटते .
” तुका म्हणे आता । उरलो उपकारा पुरता ॥
🎻🎻🎻🎻🎻लेखक:
हभप श्री प्रभाकर महाराज दिवनाले. अध्यक्ष
विदर्भस्तरीय वारकरी संत परिषद , धनगर धर्मपीठ महाराष्ट्र राज्य.
धन्यवाद.