Blog

समाजासाठी काहीतरी करू शकलो याचे समाधान – डाॅ अभिमन्यु टकले

प्राचार्य श्री आर एस चोपडे सर. शिक्षण महर्षी. अध्यक्ष अहिल्या शिक्षण संस्था सांगली. अध्यक्ष चौथे आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य. यांच्या आम्रुत महोत्सवा निमित्त मी लेख लिहला तो महाराष्ट्र भर सर्व साहित्य प्रेमीनी दैनिकात आणि साप्ताहिकात छापला. सर्वाचे आभार. येथून पुढे आर एस चोपडे सरानां शिक्षण महर्षी या पदवीनेच सर्वत्र गौरविण्यात यावे तसा ठराव सहावे आदिवासी धनगर साहित्य संमेलन चांदवड जि.नाशिक येथे घेण्यात येईल.

तसेच दिनांक २०|६|२०२५ प्राचार्य डाॅ मधुकर सलगरे सर यांचा संपादकीय लेख व श्री भरतकुमार मोरे, उपसंपादक, दैनिक पुण्य नगरी यांनी माझ्या वाढदिवसा निमित्त घेतलेली मुलाकात आवश्य वाचा🙏

डाॅ अभिमन्यु टकले.🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

READ MORE
Blog

दुष्काळी भागांतील विद्यार्थ्यांचा दीपस्तंभ प्राचार्य आर एस चोपडे सर

प्राचार्य डाॅ.अभिमन्यु टकले

संस्थापक धनगर धर्म पीठ/आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य 🔏🔏🔏🔏🔏🔏🔏🔏🔏🔏🔏🔏🔏
बॅरिस्टर टि के शेंडगे यांनी दुष्काळग्रस्त भागातील मुलामुलींना शिक्षण मिळावे या साठी महाराष्ट्र राज्यातील पहिली अहिल्या शिक्षण संस्थेची शाळा सुरू करुन ज्ञानाची ज्योत पेटवली. प्राचार्य आर एस चोपडे सर हे वयाच्या एकविसाव्या वर्षी १९७१ ला संस्थेत पहिले प्रशिक्षित शिक्षक म्हणून रूजू झाले.प्राचार्य चोपडे संरानी शैक्षणिक संस्थेची पालखी आपल्या खांद्यावर घेतली आणि बॅरिस्टर टि के शेंडगे यांनी पेटवलेल्या या ज्ञानाच्या ज्योतीला ज्योत पेटवत ज्ञानाची गंगा सांगली,सातारा, सोलापूर च्या दुष्काळी भागात नेली.पेटवलेल्या एका ज्योतीचे रुपांतर चोपडे संरानी दीपस्तंभात केले. दुष्काळी भागातील अनेक विद्यार्थ्याची कुटुंब या दीपस्तंभानी उजळून निघाली आहेत. अनेक विद्यार्थ्यी देश सेवा करत शैक्षणिक, औद्योगिक, संरक्षण, पोलीस, प्रशासकीय, सहकार, वैद्यकीय क्षेत्रात आपले कर्तव्य बजावत आहेत. संस्थेत बालवाडी पासून काॅलेज पर्यंत 33युनीट आहेत. ३०० शिक्षकव्रुंद आहेत. बारा हजार विद्यार्थ्यी शिक्षण घेत आहेत. संस्थेत १४ माध्यमिक विद्यालय आहेत.६कनिष्ट महाविद्यालय आहेत. १महाविद्यालय आहे.०५ प्राथमिक शाळा आहेत. ०४ वस्ती ग्रह आहेत. सीबीएसई नर्सरी ते दहावीपर्यंत शाळा आहे. तिनशे शिक्षक आहेत. चोपडे सर ३५वर्षे मुख्याध्यापक,१३वर्षे अहिल्या शिक्षण संस्थेचे सचिव होते.१८वर्षे झाले संस्थेचे कार्यकुशल अध्यक्ष आहेत.

अनेक सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, कार्यात सहभागी आहेत. ३०/६/२००८ला सर सेवेतून निवृत्त झाल्यानंतर ही तरुणाला लाजवेल असे कार्य करीत आहेत. २०१७ पासून म्हणजे पहिले आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य मध्ये सहभागी आहेत. २०१९ला तिसरे आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य मध्ये सर सक्रिय सहभागी झाले.

सरांनी अनेक संस्थेचे अंक सपांदित प्रसिद्ध केले आहेत. ३००वर लेख लिहिले आहेत.संरानी प्रेमाचे झरे नावाचे आत्मकथन लिहिले आहे.संराच्या या शैक्षणिक,सामाजिक, साहित्यिक प्रकाशमय कर्तृत्वाचा विचार करून चौथे आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य अध्यक पदी निवड झाली. सांगोला वासीया बरोबर तीन दिवस धूमधडाक्यात साहित्य संमेलन घेतले आणि सर्व माणदेश उजळून निघाला.

ग्रामीण भागातील समाज सेवकाना विश्वासात घेऊन,शिक्षकांना मार्गदर्शन करत अहिल्या शिक्षण संस्था दिप समई सारखी कार्य करत आहे.

विद्यार्थ्यी समईतील तेला सारखे कार्य करत आहेत .

संस्थेतील शिक्षक समईतील वाती सारखे जळत कष्ट करत आहेत. संस्थेचे अध्यक्ष चोपडे सर दिप समई ची ज्योत बनून दिप स्तंभासारखे मार्गदर्शन करत आहेत.प्राचार्य आर एस चोपडे सर यांचा आम्रुत महोत्सवी वाढदिवस रविवार दि.१५/०६/२०२५ संस्था व माजी विद्यार्थ्यी साजरा करत आहेत. संराचे अभिनंदन. प्राचार्य आर एस चोपडे सर आप जिवो हजारो साल. साल के दिन हो पचास हजार.

READ MORE
Blog

चांदवड येथील ६ व्या आदिवासी धनगर साहित्य संमेलनास तालुक्यातील समाज बांधवांनी उपस्थितीत राहावे- संभाजीराव सुळ..

करमाळा -प्रतिनीधी..

साहित्यिक विचाराने माणूस घडतो विचारांचे मंथन करण्यासाठी साहित्य संमेलने आयोजित करणे आवश्यक असल्याचे मत लातूर येथील उद्योगपती संभाजीराव सूळ यांनी व्यक्त केले ते चांदवड जिल्हा नाशिक येथे होणाऱ्या सहा वे आदिवासी धनगर साहित्य संमेलनाच्या नियोजनाच्या पार्श्वभूमीवर बोलत होते यावेळी अध्यक्षस्थानी डॉ अभिमन्यू टकले हे होते पुढे बोलताना श्री सूळ म्हणाले की ज्या ज्या समाजांनी पुस्तके हाती घेतली तोच समाज क्रांती करू शकला साहित्य संमेलनाच्या माध्यमातून आपली मूळ ओळख रीती रिवाज चालीरीती परंपरा महापुरुषांचे योगदान व त्यांच्या योगदानामुळे राष्ट्र निर्माण करणे कामी त्यांचा असणारा वाटा आपल्या नव्या पिढीला कळणार आहे यामुळे महाराष्ट्रातील तमाम बांधवांनी हे साहित्य संमेलन यशस्वी करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले
आज करमाळा के, हाईट्स येथे आढावा बैठक संपन्न झाली यावेळी धनगर साहित्य संमेलन संस्थापक अध्यक्ष डॉ.अभिमन्यू टकले व महाराष्ट्राचे उपाध्यक्ष उद्योगपती संभाजीराव सुळ यांच्या प्रमुख उपस्थितीत करमाळा येथे आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी संभाजीराव सुळ, डॉ.अभिमन्यू टकले यांचा सकल धनगर समाज करमाळा तालुक्याच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी आदिवासी धनगर साहित्य संमेलन व धनगर समाजाची आसलेली पिछेहाट, धनगर आरक्षण आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३००व्या जयंती सह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी धनगर धर्म पिठाचे जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब टकले, राष्ट्रीय समाज पक्षाचे मा.जिल्हा सरचिटणीस अंगद देवकते, भाजप किसान मोर्चा जिल्हा सरचिटणीस नरेंद्रसिंह ठाकूर, भाजप युवा मोर्चा तालुका अध्यक्ष शुभम बंडगर, दैनिक संचार चे पत्रकार काळे साहेब, रासपचे विधानसभा अध्यक्ष शंकर सूळ , प्रगतशील बागायतदार पप्पू सलगर, उद्योजक अशोक जाधव, श्रीराम देवकाते , रासप ता.संपर्क प्रमुख विकास मेरगळ, बाबासाहेब चौगुले , आशिष बंडगर आदी मान्यवर उपस्थितीत होते.

READ MORE
Blog

ऐतिहासिक सहावे धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य

नियोजन बैठक 🔏🔏🔏🔏🔏🔏🔏🔏🔏🔏🔏🔏🔏 पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जंयती निमित्त ऐतिहासिक सहावे धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य घेपले जानार आहे.
महाराष्ट्र राज्यातील सामाजिक, साहित्य, संस्कृती,धर्म शैक्षणिक क्षेत्रातील आवड असलेल्या सर्व मान्यवरांना कळवण्यात येते की रविवार दिनांक ११/०५/२०२५ रोजी सकाळी नाशिक व चांदवड मधील मान्यवराच्या गाटीभेटी घेणे व पत्रकार परिषद व सायकांळी धनगर साहित्य संमेलन बैठक व पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रीशताब्दी जयंती निमित्त प्रतीमा पुजन होईल.

नियोजनाचे विषय
१) स्थळ ठरवने,२) संमेलन दिनांक ठरवणे, ३) संमेलन अध्यक्ष ठरवणे, ४)स्वागताध्यक्ष ठरवणे,५)कार्यक्रम रूपरेषा ठरवणे, ६) साहित्य संमेलनाची जबाबदार समिती ठरवणे. अध्यक्ष च्या परवानगीने आलेल्या विषयावर चर्चा करणे.ई.
श्री विनायक काळदाते कार्याध्यक्ष धनगर धर्मपीठ महाराष्ट्र राज्य यांनी व श्री समाधान बागल समाज सेवक नाशिक यांनी बैठकीचे आयोजन व नियोजन केले आहे.खालील मान्यवर उपस्थित राहणार आहेत मा. अध्यक्ष मा.आमदार रामहरी रुपनवर माळशिरस , उपाध्यक्ष श्री संभाजीराव सुळ लातूर,
श्री ज्ञानेश्वर ढोमणे सचिव आमरावती.
श्री बाळासाहेब कर्णवर पाटील राजेवाडी,
श्री आर एस चोपडे सर चौथे अध्यक्ष सांगली
श्री सोमनाथ कर्णवर पाटील एपीआय ठाणे.
श्री संजय शिंगाडे सर सांगोला, ,
श्री उज्ज्वलकुमार माने संपादक लेखक सोलापूर
डाॅ स्नेहा सोनकाटे तुळजापूर.
श्री बिसलसिद्ध काळे पत्रकार,
श्री हनमंतराव चौरे सातारा,.
श्री चंद्रकांत हजारे प्रवक्ते

डाॅ अभिमन्यू टकले
संस्थापक धर्मपीठ महाराष्ट्र राज्य.
आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य

READ MORE
Blog

ऐतिहासिक सहावे धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य

नियोजन बैठक पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जंयती निमित्त ऐतिहासिक सहावे धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य घेतले जानार आहे.

महाराष्ट्र राज्यातील सामाजिक, साहित्य, संस्कृती,धर्म शैक्षणिक क्षेत्रातील आवड असलेल्या सर्व मान्यवरांना कळवण्यात येते की रविवार दिनांक ११/०५/२०२५ रोजी सकाळी नाशिक व चांदवड मधील मान्यवराच्या गाटीभेटी घेणे व पत्रकार परिषद व सायकांळी धनगर साहित्य संमेलन बैठक व पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रीशताब्दी जयंती निमित्त प्रतीमा पुजन होईल.

नियोजनाचे विषय
१) स्थळ ठरवने,२) संमेलन दिनांक ठरवणे, ३) संमेलन अध्यक्ष ठरवणे, ४)स्वागताध्यक्ष ठरवणे,५)कार्यक्रम रूपरेषा ठरवणे, ६) साहित्य संमेलनाची जबाबदार समिती ठरवणे. अध्यक्ष च्या परवानगीने आलेल्या विषयावर चर्चा करणे.ई.
श्री विनायक काळदाते कार्याध्यक्ष धनगर धर्मपीठ महाराष्ट्र राज्य यांनी व श्री समाधान बागल समाज सेवक नाशिक यांनी बैठकीचे आयोजन व नियोजन केले आहे.राज्य स्तरीय बैठकीला
खालील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

मा.आमदार रामहरी रूपनवर अध्यक्ष पाचवे आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य.

प्राचार्य
श्री आर एस चोपडे सर अध्यक्ष अहिल्या शिक्षण संस्था सांगली. अध्यक्ष चौधे आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य.
श्री संभाजीराव सुळ उपाध्यक्ष साहित्य संमेलन. मा.संचालक डीसीसी बॅक लातूर.
श्री बाळासाहेब कर्णवर पाटील व्हा.चेअरमन श्री श्री सदगुरू साखर कारखाना राजेवाडी.
प्रा.संजय शिंगाडे स्वागताध्यक्ष चौथे धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य.
श्री ज्ञानेश्वर ढोमणे सर सचिव आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य.
श्री श्रीराम हनुमंतराव पाटील बेलाटीकर सोलापूर, आयोजक पाचवे आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य.
श्री सोमनाथ कर्णवर पाटील एपीआय ठाणे.
श्री चंद्रकांत हजारे प्रवक्ते आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य.
श्री उज्ज्वलकुमार माने लेखक, संपादक पत्रकार सोलापूर.

प्राचार्य डाॅ.अभिमन्यु टकले संस्थापक अध्यक्ष धनगर धर्मपीठ महाराष्ट्र राज्य व धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य.
श्री बिसलसिद्ध काळे पत्रकार, लेखक प्रसिद्धीप्रमुख आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य.

READ MORE
Blog

सहावे आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य. २०२५.

रंगमहाल ता.चांदवड जि. नाशिक येथे घेण्या साठीचे पत्र.

सहावे आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य २०२५.
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर त्रिजन्म शताब्दीनिमित्त घेण्यात येणार आहे.धनगर साहित्य संमेलना साठी अनेक ठिकाणाहून प्रस्ताव आले आहेत.
दिनांक २४/०३/२०२५ रोजी राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर
सार्वजनिक जन्मोत्सव समिती नाशिक यांचे लेखी पत्र मिळाले आहे. श्री विनायकजी काळदाते कार्याध्यक्ष धनगर धर्मपीठ महाराष्ट्र राज्य व श्री समधान बागल समाज सेवक व प्रहार संघटन नाशिक यांनी विनंती केली आहे की सहावे आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य २०२५ हे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर रंगमहाल ता.चांदवड जि. नाशिक येथे घेण्यात यावे.चांदवड येथे होळकरशाहीची उपराजधानी असून या ठिकाणी सुंदर असा रंगमहाल आहे. या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे अनेक वेळेस वास्तव्य असल्याचे समजते. सदरील रंगमहाल भारत सरकार च्या पुरातत्व खात्याने संरक्षित केला असून महाराष्ट्र राज्यातील जातीच्या राजकारणा मुळे जसा धनगर जमातीचा ईतिहास दुर्लक्षित आहे तसाच हा रंगमहाल व उपराजधानी दुर्लक्षित आहेत.

देशाच्या ईतिहासाला, ऐतिहासिक पुरुषाना, व्यक्तीना, ऐतिहासिक वारसांना जात आणि धर्म नसतो.लोकशाहीत राजेशाही कधीच नष्ट झाली. आता जे आहे ते राजे नाहीत तर राजघराण्याचे वारस आहेत. ते राजे म्हणून घेतात हे लोकशाहीची थट्टाच आहे. तर हे राजे समजून जातीवाद करत फिरतात हा त्या राजघराण्याचा आपमान आहे.अशा जातीय व धर्मावर चाललेल्या राजकारणात राजा हल सातवाहन, चंद्रगुप्त मौर्य, अशोक सम्राट, होळकर शाही यांचा ईतिहास आजही ईतिहासाच्या पुस्तकात व परदेशी ग्रंथालयात बंद आहे.

अशा भयानक परिस्थितीत २००७ पासून धनगर धर्मपीठ संस्थेमार्फत आदिवासी धनगर साहित्य संमेलन घेण्याचा प्रयत्न केला आणि ७/८ जानेवारी २०१७ ला पहिले आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य हे श्री संजय सोनवनी प्राख्यात लेखक ईतिहास संशोधक यांच्या अध्यक्ष खाली धुमधडाक्यात धनगर जमातीचा ईतिहास राजकीय पटलावर आणत यशस्वी रित्या सुरु झाले. सलग ऐतिहासिक पाच साहित्य संमेलन एक संत वारकरी परिषद घेण्यात आली.लवकरच आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य यांची टिम मा. अध्यक्ष मा.आमदार रामहरी रुपनवर माळशिरस , उपाध्यक्ष श्री संभाजीराव सुळ लातूर,
श्री संजय सोनवनी पहिले अध्यक्ष, प्राख्यात लेखक ईतिहास संशोधक पुणे.

श्री हरिदास जी भदे मा.आमदार आकोला.
श्री ज्ञानेश्वर ढोमणे सचिव आमरावती.
श्री बाळासाहेब कर्णवर पाटील राजेवाडी,
श्री आर एस चोपडे सर चौथे अध्यक्ष सांगली,श्री पांडुरंग रुपनवर सांगली. श्री विष्णू माने नगरसेवक सांगली. प्राचार्य
डाॅ.मधुकर सलगरे लेखक लातूर.
श्री छगनशेठ पाटील ठाणे उद्योजक मुंबई. श्री सोमनाथ कर्णवर पाटील एपीआय ठाणे.
श्री संजय शिंगाडे सर सांगोला, श्री आलदर सर कोळा, श्री सिध्दारूड बेडगनूर सर , श्री बिसलसिद्ध काळे पत्रकार, कवी होनमाने सर,कवी लेखक गोविंद काळे,
श्री भरत कुमार मोरे पत्रकार उपसंपादक पुण्यनगरी,
श्री हनमंतराव चौरे सातारा, श्री विठ्ठल सजगने सर,म्हसवड.
श्री पवन थोटे यवतमाळ.
श्रीराम पाटील सर्व सोलापूर. श्री चंद्रकांत हजारे प्रवक्ते लातूर.
श्री बाळासाहेब टकले करमाळा, श्री अगंद देवकते करमाळा.
श्री क्रुष्णा बुरूंगुले मुंबई,
ईजिंनियर धुळाभाऊ शेंडगे बेगंलोर.या मान्यवरांच्या मार्गदर्शना खाली नाशिक आणि रंगमहाल चांदवड या ठिकाणास भेट देऊन सहावे आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य याचे स्थळ ठरवून रितसर जाहीर केले जाईल.

डाॅ अभिमन्यू टकले
संस्थापक धर्मपीठ महाराष्ट्र राज्य.
आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य.

READ MORE
Blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूरच्या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात दिनांक 08 एप्रिल, 2025 रोजी विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांनी बोलावली बैठक

सोलापूर भेटीनंतर तातडीची कार्यवाही

मुंबई दिनांक 04 एप्रिल, 2025 (प्रतिनिधी / वार्ताहर) –

महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार, दिनांक 08 एप्रिल, 2025 रोजी सकाळी 10.00 वाजता विधान भवन, मुंबई येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या विविध प्रलंबित प्रश्नांसंदर्भात उच्चस्तरीय बैठक विधान भवन, मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे. दिनांक 31 मार्च, 2025 रोजी महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांनी विद्यापीठास प्रत्यक्ष भेट देऊन विद्यापीठ विकासासंदर्भात विविध विषयांवर कुलगुरु प्रा.डॉ.प्रकाश महानवर यांच्याशी चर्चा केली होती. त्यावेळी येत्या 15 दिवसात यासंदर्भात मुंबईत बैठक घेऊन प्रश्नांची सोडवणूक करण्याबाबत त्यांनी आश्वासीत केले होते, त्यानुसार ही बैठक 15 दिवसांच्या आत आयोजित करण्यात आली आहे. कुलगुरु, संबंधीत खात्यांचे मंत्री, सचिव तसेच जिल्हाधिकारी, सोलापूर हे या बैठकीस उपस्थित राहणार असून प्रलंबित प्रश्न मार्गी लागणार असल्याने या बैठकीकडे सोलापूर जिल्हावासिय तसेच विद्यार्थी – पालकांचे लक्ष वेधले गेले आहे.

दिनांक 31 मार्च, 2025 रोजीच्या सोलापूर दौऱ्यात महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांनी विद्यापीठातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक, विस्तारीत प्रशासकीय इमारत आणि परीक्षा भवन येथे प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली होती. विद्यापीठाने संपादित केलेल्या जमिनीवर माळढोक पक्षी अभयारण्य, पर्यावरण संवेदनशील क्षेत्र आणि राखीव वनक्षेत्र असे विविध आरक्षण आहे. विद्यापीठ क्षेत्राच्या चारही बाजूस आरक्षण असल्याने येण्या-जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नाही. या आणि अन्य प्रलंबित प्रश्नांसंदर्भात मंगळवार, दिनांक 08 एप्रिल, 2025 रोजी ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. बैठकीस मा.उच्च व तंत्र शिक्षण मंत्री, मा.वन मंत्री, मा.महसूल मंत्री, मा.कुलगुरु आणि मा.जिल्हाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
…….

प्रति,
मा. संपादक/वृत्तसंपादक

कृपया उपरोक्त बातमीस आपल्या लोकप्रिय इलेक्ट्रॉनिक/प्रिंट माध्यमाद्वारे ठळक प्रसिध्दी देण्यात यावी, हि विनंती.

आपला,

(निलेश मदाने)
मा. सभापती, महाराष्ट्र विधानपरिषद यांचे जनसंपर्क अधिकारी

READ MORE