Blog

५ वे आदिवासी धनगर साहित्य संमेलन बेलाटी येथे होणार

 

पाचवी आदिवासी धनगर साहित्य संमेलन सोलापूर येथील बेलाटी या ठिकाणी होत आहे त्यासंदर्भात संस्थापक अध्यक्ष अभिमन्यू टकले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले

 

READ MORE
Blog

5 व्या आदिवासी धनगर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, मा. ॲड. श्री. रामहरी रुपनवर (आप्पा) यांचा अल्प परिचय…!

सोलापूर, दिनांक ( अमोल पांढरे, याजकडून ) 24 आणि 25 फेब्रुवारी 2024 रोजी, सोलापूर जिल्ह्यातल्या उत्तर सोलापूर तालुक्यातील “बेलाटी” येथे होणाऱ्या, 5 व्या आदिवासी धनगर साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी, माजी आमदार तथा ज्येष्ठ साहित्यिक, मा. अँड. श्री. रामहरी रुपनवर यांची निवड करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवरती त्यांच्या कार्याचा आढावा आणि त्यांचा अल्प परिचय उपलब्ध करून देण्याचा हा एक छोटासा प्रयत्न…

एक हसतमुख, सोज्वळ, जिद्दी, मनमिळाऊ आणि लढावू व्यक्तिमत्व म्हणून आमदार, मा. ॲड. श्री. रामहरी रुपनवर यांची सर्वत्र ओळख आहे. महाराष्ट्रातील सर्व जनता त्यांना प्रेमाने आप्पा म्हणून संबोधते. त्यांचा जन्म सोलापूर जिल्ह्यातल्या माळशिरस तालुक्यातील एकशिव या गावी निरा नदीच्या काठावरील एका खेडेगावात झाला. वडील लहानपणीच गेल्यामुळे कुटुंबाची आर्थिक जबाबदारी त्यांच्यावरती येवून पडली. ही जबाबदारी पेलत असताना त्यांना शेतीत काबाड-कष्ट करावे लागले. तसेच अकलूज येथिल कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नोकरीही करावी लागली. आणि ही नोकरी करीत करीतच त्यांनी बी.कॉम (ऑनर्स) व त्यानंतर एल.एल.बी.चे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर नोकरीचा राजीनामा देऊन, त्यांनी माळशिरसच्या न्यायालयात वकिली व्यवसायिक सुरू केला. वकिली व्यवसाय करीत असताना ते एकशिव ग्रामपंचायतचे सदस्य म्हणूनही निवडून आले. तेथेही त्यांनी दहा वर्षे काम केले. त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य म्हणूनही ते सलग दहा वर्ष निवडून आले. आणि सर्वसामान्यांसाठी झपाटून काम केले. त्यानंतर विधान परिषदेचे आमदार म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. आमदार म्हणून कामकाज करण्याची संधी मिळाल्यानंतर त्यांनी अधिवेशनं असो की सभागृहातील चर्चा विविध प्रश्नांच्यावरती आवाज उठविला. आणि सर्वसामान्य जनतेसह समाजाचे अनेक प्रश्न तसेच विविध योजनाही मार्गी लावल्या. त्याबरोबरच शासनाच्या विविध धोरणात्मक निर्णयामध्येही त्यांनी भाग घेतला अनेक धोरणं ठरवली आणि अमलातही आणली. ज्या शासनाच्या विविध योजना होत्या त्या अंमलात आणून सर्वसामान्यांचे जिवनं सुखी करण्याचा प्रयत्नं केला. त्याशिवाय या काळात त्यांनी दूध संघ, पतसंस्था, शिक्षण संस्था, ट्रस्ट आणि विविध कंपन्यांची निर्मिती करण्यातही त्यांनी मोलाचे योगदानं दिले.

नेहमीचं सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्याने रुपनवर आप्पा यांनी यशाची अनेक शिखरे गाठली. प्रचंड साहित्यनिर्मीती केली. विविध विषयांवरती व्याख्याने दिली. समाजासोबत अखंड संवाद साधण्याचे त्यांचे कसबं वाखाणण्यासारखे आहे. हे कार्य आजही सुरूच आहे. अनेकवेळा त्यांनी अभ्यासासाठी विदेशदौरेही केले आहेत. लहानपणापासूनच वारकरी सांप्रदायाची शिकवण लाभल्याने ते पूर्णपणे शाकाहारी आणि निर्व्यसनी आहेत. वाचनाची, भाषणाची त्यांना प्रचंड आवड आहे. अनेक थोरा – मोठ्यांचा सहवास त्यांना लाभला. ही त्यांच्या जिवनात जमेची बाजू राहिली आहे. परिणामी ते यशाच्या आणि लोकप्रियतेच्या शिखरावरती पोहोचले आहेत. त्यांच्या या सर्व कार्याची दखल घेऊनच, आदिवासी धनगर साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.


त्यांच्याविषयी अगदी थोडक्यात…✍️🌹

नाव – अँड. रामहरी गोविंदराव रुपनर

जन्म – दिनांक 1 जून 1956

शिक्षण – बी.कॉम (ऑनर्स) एल.एल.बी

पत्ता – मु. पो. नातेपुते (पालखी मैदान) तालुका – माळशिरस, जिल्हा – सोलापूर

मोबाईल नंबर – 99 22 96 89 26, 98 34 88 30 36

– माजी सदस्य – महाराष्ट्र विधान परिषद

– सरचिटणीस – महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी

– प्रशिक्षण – प्रशिक्षणप्रमुख, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी

– अध्यक्ष – महाराष्ट्र धनगर समाज महासंघ

– चेअरमन – श्रीराम शेती दुग्ध प्रक्रिया लिमिटेड, नातेपुते

– अध्यक्ष – ज्ञानगंगा शिक्षण प्रसारक मंडळ एकशिव

– अध्यक्ष – निरा कालवा, पाणी वाटप संस्था एकशिव

– अध्यक्ष – जय मल्हार कृषी व ग्रामीण विकास प्रतिष्ठानं, एकशिव

– अध्यक्ष – रामहरी रुपनवर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, नातेपुते

– सदस्य – पंचायत राज समिती, विधानमंडळ मुंबई

📜✒️🌹राजकीय व सामाजिक कार्य 🌹

– संघटक – सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी

– सदस्य – जिल्हा परिषद, सोलापूर 10 वर्षे (1997 ते 2007)

– संचालक – महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ मर्यादित, पुणे

– चेअरमन – एकशिव विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी, दहा वर्ष (1988 ते 1998) सरचिटणीस – महाराष्ट्र धनगर समाज महासंघ

– संचालक – महाराष्ट्र राज्य बाजार समिती संघ, धुळे

– संस्थापक अध्यक्ष – सिद्धनाथ ग्रामीण सहकारी पतसंस्था, एकशिव

– अध्यक्ष – महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ कर्मचारी युनियन

– अध्यक्ष – 44 फाटा शेतकरी अन्याय निवारण कृती समिती, नातेपुते

– सदस्य – जिल्हा शिक्षण सल्लागार समिती, सोलापूर

– सदस्य – ग्रामपंचायत एकशिव 10 वर्षे (1989 ते 2000)

– सदस्य – बांधकाम समिती, जिल्हा परिषद, सोलापूर

– सिनेट सदस्य – सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे

📜✒️🌹 उल्लेखनिय सामाजिक कार्य – 🌹

– ४४ फाटा बारमाही पाणी योजनेसाठी संघर्ष करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला.

– ऊस उत्पादक शेतकऱ्यांना संघटित करून त्यांनाही न्याय मिळवून दिला.

– बी.सी. आणि ओबीसी समाजासाठी जमीन मिळावी यासाठी संघर्ष केला.

– महाराष्ट्रात अहिल्या संदेश यात्रेचे आयोजनं

– पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर एका पोवाड्याची रचना केली.

– राजकारण, समाजकारण तसेच पारमार्थिक विषयावरती अनेक व्याख्यानें दिली…

अशा या बहुआयामी व्यक्तिमत्वाची, म्हणजेच रुपनर आप्पा यांच्या सर्व कार्याची दखल घेऊन त्यांना सन्मानित करण्याचा चंग, आदिवासी धनगर साहित्य संमेलनाच्या टीमने बांधला होता. म्हणून तर संमेलनाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आप्पांची भेट घेऊन त्यांना या संमेलनाचे अध्यक्षपद स्वीकारण्याची विनंती केली असता, त्यांनी सर्वांच्या विनंतीला मानं देवून, हे अध्यक्षपद स्वीकारले आहे. याबद्दल सकल महाराष्ट्रातील धनगर-ओबीसी आणि बहुजन समाजबांधवांच्याकडून तसेच महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेकडून, साहित्यिक, लेखक, विचारवंत, कवी, इतिहासतज्ञ, इतिहास संशोधक, इतिहासाचे अभ्यासक या आणि अशा सर्वच घटकातून त्यांच्यावरती अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

📜✒️🔥🌹🌹🌹

या साहित्य संमेलनाला आपण यायला विसरायचं नाही.

🔥दिनांक – 24 आणि 25 फेब्रुवारी 2024 रोजी…

वेळ – सकाळी 8 वाजल्यापासून…

📜✒️ स्थळ – संत सद्गुरू बाळुमामा मंदिर, विजयपूर बायपास रोड, बेलाटी, तालुका उत्तर सोलापूर, जिल्हा सोलापूर

आपले विनीत 🙏📜✒️🌹- आदिवासी धनगर साहित्य संमेलन, संयोजन समिती, सोलापूर

READ MORE
Blog

पाचवे आदिवासी धनगर साहित्य संमेलन

सोलापूर दिनांक.१२|०२|२०२४ रोजी मा.मनिषा आव्हाळे मॅडम मुख्य कार्यकारी अधिकारी सोलापूर जिल्हापरिषद यांना आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य बेलाटी निमंत्रण दिले, मी येणारच आहे असे त्यांनी सांगितले. मा.कुमार आशिर्वाद जिलाहाधिकारी सोलापूर यांनाही निमंत्रण देण्यात आले ते म्हणाले निवडणूकीचे खूप काम आहे मी प्रयत्न करतो.

श्री महादेव जानकर आमदार यांना अध्यक्ष श्री रामहरी रूपनवर माजी आमदार लेखक व वक्ते व श्रीराम हणमंतराव पाटील बेलाटीकर स्वागताध्यक्ष यांनी साहित्य संमेलनाचे निमंत्रण दिल्यानंतर ते मध्य प्रदेशात जानार आहेत असे म्हणाले, सोबत आमचे समाजाचे आक्कलकोटचे धडाडीचे नेते सुनीलभाऊ बंडगर होते ते रासप पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष आहेत. ते नक्कीच दोन दिवस चांगले लोक घेवून येणार आहेत व स्वागताध्यक्ष श्रीराम हणमंतराव पाटील बेलाटीकर त्यांचा सत्कार करतील. मा.आमदार रामहरी रूपनवर आप्पा अध्यक्ष यांनी श्री सुनीलभाऊ बंडगर आक्कलकोट यांच्या कार्याचा गौरव केला.

आमचे मित्र विनोद निकाळजे झारखंड आरपीआय संपर्क प्रमुख यांनी श्री रामभाऊ सरवदे महाराष्ट्र अध्यक्ष आरपीआय यांना भेटून पत्रीका देण्याचे कळवले होते त्या प्रमाणे मी त्यांना भेटून निमंत्रण दिले. दि. २५|२|२०२४ रोजी रामदास जी आठवले केंद्रीय समाज कल्याण मंत्री सोलापूरात येणार आहेत ते संमेलनाला भेट देण्याची शक्यता आहे.आमचे आठवले साहेबांशी जुनेच संबंध आहेत.आले तर संमेलनात स्वागतच आहे.तसेच डाॅ.श्रीमंत कोकाटे लेखक, वक्ते, विचारवंत, व संमेलनाच्या समारोपाचे उद्घाटक यांनाही निमंत्रण दिले ते येणारच आहेत.

त्या मुळे संमेलनाला येणार्या रसीकांना नक्कीच यांचे बहुमोल विचार ऐकावयास मिळतील. संमेलनात विविध विचारांचे रंग भरले जातील.
निमंत्रण देण्यासाठी व समन्वयक म्हणून श्री बिसलसिद्ध काळे पत्रकार, श्री उज्ज्वलकुमार माने संपादक, लेखक यांनी महत्वाची भूमीका बजावली.

डाॅ.अभिमन्यु टकले.

READ MORE
Blog

पाचवे आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य जाहीर.

सोलापूर: पाचवे आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य

शनिवार व रविवार दिनांक २४|२|२४ व २५|२|२४ रोजी श्री संत सदगुरू बाळूमामा मंदिर विजापूर हायवे बेलाटी ता.उत्तर सोलापूर जि सोलापूर येथे होणार आहे.या दोन दिवसात श्रोत्यांना बौद्धीक मेजवानी व विचाराची आदानप्रदान होणार आहे. अशी माहिती डाॅ.अभिमन्यु टकले यांनी पत्रकार परिषदेत मांडली.पाचव्या आदिवासी धनगर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून साहित्यिक वक्ते माजी आमदार ऐडव्होकेट रामहरी रूपनवर माळशिरस यांची निवड झाली आहे.तर या संमेलनाचे स्वागताध्यक्ष पदी श्री संत बाळूमामा ट्रस्ट विजापूर बायपास हायवे बेलाटी चे अध्यक्ष श्रीराम हणमंतराव पाटील यांची निवड झाली आहे.

शनिवार दिनांक २४|०२|२०२४ रोजी सकाळी ८ते११:३०या दरम्यान साहित्य दिंडी निघणार आहे. दिंडीच्या पालखीचे पुजन माजी आमदार दिलीपराव माने हे करतील. दिंडी श्रीराम हणमंतराव पाटील बेलाटीकर स्वागताध्यक्ष यांच्या बेलाटीतील वाड्यासमोर पुजन करून निघेल. श्री सदगुरू बाळू मामा मंदिर येथे बाळू मामाच्या नावान चांग भल म्हणून टेकवली जाईल.

दिंडीत गजे ढोल, लेझीम अशी पथके आहेत.

दुपारी १२ते ३या वेळेत श्री संत सदगुरू बाळूमामा मंदिर विजापूर हायवे बेलाटी येथे साहित्य संमेलना चा उद्घाटन सोहळा आहे.साहित्य स्थळाला संत बाळूमामा साहित्य नगरी असे नाव दिले आहे. विचार पिठाला श्री सिध्देश्वर विचार पीठ असे नाव देण्यात आले आहे.उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या नावाचे उद्घाटन करण्यात येणार आहे.उद्घाटन साठी मा.सुशीलकुमार शिंदे साहेब माजी ग्रंहमंत्री यांना निमंत्रण दिले आहे.

मा.चंद्रकांत दादा पाटील पालक मंत्री सोलापूर, आमदार श्री राम शिंदे माजी मंत्री, श्री विजय देशमुख आमदार उत्तर सोलापूर, श्री सुभाष देशमुख आमदार दक्षिण सोलापूर, प्रा. श्री अजय दासरी शिवसेना जिल्हाप्रमुख, पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
संमेलनास राज्यासह देश भरातून अनेक साहित्यीक उपस्थित राहणार आहेत. डाॅ.श्रीपाल सबनीस अध्यक्ष अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, मा.संजय सोनवनी अध्यक्ष पहिले आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य सोलापूर, श्री राजा माने अध्यक्ष सोशेल मिडीया अध्यक्ष महाराष्ट्र राज्य, घनश्याम होळकर भरतपुर राजस्थान लेखक, श्री पंडीत चंद्रकांत बिज्जरगी गुरूजी प्रसिद्ध साहित्यिक विजापूर, डाॅ.मुरहरी केळे संत साहित्य अभ्यासक मुंबई, डाॅ.श्रीमंत कोकाटे,साहित्यीक व वक्ते पुणे,डाॅ.प्रकाश महानवर कुलगुरू पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर, श्री सुभाष बोंद्रे दिव्य मराठी स्टेट हेड व साहित्यीक, प्रा.यशपाल भिंगे साहित्यीक नांदेड, आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

उद्घाटन समारंभा पुर्वी निधन झालेल्या साहित्यीकांना आदरांजली वाहिली जाणार आहे.स्वागत गीताने मान्यवरांचे स्वागत करण्यात येणार आहे.भंडारा उधळून यळकोट यळकोट जय मल्हार च्या घोषणा देत साहित्य संमेलनाचे उद्घाटन केले जाणार आहे.नंतर पुस्तक प्रकाशन केले जातील. सर्व मान्यवरांचे स्वागत केले जाणार आहेत. राज्यभरातील विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी केलेल्या सेवकांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे.त्यानंतर मान्यवरांकडून श्रोत्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे.अध्यक्षीय भाषणाने उद्घाटन समारंभ समारोप होईल. ३ते ४:३० या वेळेत एक परिसंवाद आयोजित केला आहे .सांयकाळी ४:३०ते६:३० या वेळेत सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.

सायंकाळी ६:३० ते रात्री ८:३० वाजता कवी संमेलनाचे उद्घाटन श्री राम माडुंरके कवी निव्रुत्त सहायक पोलीस आयुक्त पुणे हे करतील. संयोजन भारतकुमार मोरे करतील. श्री रविराज मेटकरी हे कवी संमेलनाध्यक्ष असतील. महाराष्ट्र राज्यातून ४० कवी सहभागी होणार आहेत.

दुसर्‍या दिवसी रविवार दिनांक २५|०४|२०२४ रोजी सकाळी ०९वाजता परिसंवादाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. दिवसभरात चार विविध विषयांवर चार परिसंवाद होणार आहेत. सांयकाळी ४ते ६ या वेळेत समरोप कार्यक्रम होईल. कार्यक्रमाचे उद्घाटक डाॅ.श्रीमंत कोकाटे इतिहास संशोधक पुणे हे आहेत. डाॅ.बाबासाहेब बंडगर माजी कुलगुरू पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर हे समारोपाचे अध्यक्ष आहेत. प्राचार्य आर एस चोपडे सर, विष्णु माने नगरसेवक सांगली,श्री रामराव वडकुते माजी आमदार व भाजप जिल्हाध्यक्ष हिंगोली, मा.आमदार हरिदास जी भदे आकोला,प्रा.सुषमा अंधारे, श्री आण्णासाहेब डांगे साहित्यीक व माजी मंत्री, उपस्थित राहणार आहेत.

श्री ज्ञानेश्वर ढोमणे आमरावती, श्री पवन थोटे यवतमाळ., तसेच श्री अजय दासरी शिवसेना जिल्हाप्रमुख उपस्थित राहणार आहेत. ऐडव्होकेट चिमन डांगे इस्लामपूर हे उपस्थित राहणार आहेत. सौ रुक्मीणी ताई गंलाडे,एसीपी पुणे,श्री बाळासाहेब कोपनर डीवायएसपी पिंपरी चिंचवड हेही उपस्थित राहणार आहेत. श्री रामदास कोकरे सहआयुक्त नगर रचना जिल्हाधिकारी कार्यालय लातूर.

समारोपात राज्यातील अधिकारी व मान्यवर उपस्थित सर्व साहित्यीकांचा सत्कार करण्यात येणार आहेत. समारोप मान्यवरांची मार्गदर्शन पर भाषणे होतील. ग्रंथ दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेतलेल्या. कलाकारांना प्रशस्ती पत्रक दिले जाणार आहेत. विविध विषयांवर ठराव पास केले जाणार आहेत. संमेलनाध्यक्ष समारोपाचे भाषण करतील. श्री सिध्दारूड बेडगनूर सर संयोजक आभार प्रदर्शन करतील व राष्ट्र गिताने कार्यक्रमाची सांगता होईल.

पत्रकार परिषदेत ऐडव्होकेट रामहरी रूपनवर यांचा साहित्य संमेलन अध्यक्ष निवड झाली म्हणून सत्कार करण्यात आला. पत्रकार परिषदेस खालील मान्यवर उपस्थित होते. ऐडव्होकेट रामहरी रूपनवर नियोजित साहित्य संमेलन अध्यक्ष. श्रीराम हणमंतराव पाटील बेलाटीकर स्वागताध्यक्ष, श्री संभाजीराव सुळ उपाध्यक्ष, डाॅ.अभिमन्यु टकले संस्थापक, श्री सिध्दारूड बेडगनूर सर संयोजक, श्री देवेंद्र मदने सर मार्गदर्शक,श्री रामचंद्र खांडेकर दाजी मोहळ,श्री विलास पाटील धनगर समाज अध्यक्ष, श्री बिसलसिद्ध काळे प्रसिद्धी प्रमुख, श्री चंद्रकांत हजारे इ.मान्यवर उपस्थित होते.

READ MORE
Blog

पाचवे आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य ची शनिवार दिनांक ३|२|२०२४ रोजी घोषणा.

ऐडव्होकेट श्री रामहरी रूपनवर
माजी आमदार,लेखक, वक्ते.

मंगळवार दिनांक 30|01|2024 रोजी शासकीय विश्राम ग्रह सोलापूर येथे पाचवे आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य च्या तयारीची आढावा बैठक ऐडव्होकेट रामहरी रूपनवर साहेब यांनी घेतली.साहित्य संमेलनाच्या विविध विषयांवर चर्चा केली. संमेलनात राज्यातील सर्व साहित्यीकांना निमंत्रण देण्यात यावे व संमेलनात कोणताच राजकीय, सामाजिक भेदभाव करू नये असे मार्ग दर्शन केले.संमेलन उद्घाटन, समारोपात सर्व पक्षातील मान्यवरांसह निमंत्रण देण्यात यावे असेही ते म्हणाले. मा.ऐडव्होकेट रामहरी रूपनवर साहेब हे एक चांगले लेखक, वक्ते आहेत. त्यांचे जीवन सुंगध,२०२१ला प्रकाशित करण्यात आले आहे.तसेच हरी पिराजी धायगुडे हे दुसरे संशोधीत पुस्तक लवकरच प्रकाशित होणार आहे. पाचवे आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य याची घोषणा दिनांक ०३|०२|२०२४ रोजी सकाळी साडे दहा वाजता करण्यात येणार आहे.कार्यक्रमास श्री श्रीराम हणमंतराव पाटील बेलाटीकर स्वागताध्यक्ष, श्री संभाजीराव सुळ उपाध्यक्ष लातूर,व श्री बाळासाहेब कर्णवर पाटील उपाध्यक्ष श्री श्री सदगुरू साखर कारखाना हे उपस्थित राहणार आहेत. तसेच अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

आढावा बैठकीस खालील मान्यवर उपस्थित होते. संस्थापक अध्यक्ष डॉ.अभिमन्यु टकले, संयोजक श्री सिद्धारूढ बेडगनूर सर, प्रा.देवेंद्र मदने सर कार्याध्यक्ष, श्री विलास पाटील समाजसेवक, कवी श्री गोविंद काळे, श्रीउज्ज्वलकुमार माने समन्वयक पत्रकारव लेखक, श्रीबिसलसिद्ध काळे पत्रकार इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

READ MORE
Blog

श्री श्रीराम हनुमंतराव पाटील बेलाटीकर पाचवे आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य चे स्वागताध्यक्ष

महाराष्ट्र राज्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन

लेखक:
प्राचार्य डाॅ.अभिमन्यु टकले,
संस्थापक आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य व धनगर धर्म पीठ महाराष्ट्र राज्य

दि.३१/१२/२०२३ रोजी सोलापूर येथे श्री संत सदगुरू बाळू मामा ट्रस्ट बेलाटी विजापूर बायपास हायवे उत्तर सोलापूर येथे प्राचार्य आर एस चोपडे सर अध्यक्ष चौथे साहित्य संमेलन यांच्या अध्यक्षते खाली व श्री बाळासाहेब कर्णवर पाटील यांच्या उपस्थितीत पहिली नियोजन बैठक झाली. दिनांक १३/१/२०२४ रोजी पुणे येथे श्री संजय सोनवनी यांच्या अध्यक्षते खाली श्री संभाजीराव सुळ उपाध्यक्ष साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य यांच्या उपस्थितीत दुसरी नियोजन बैठक झाली. श्री श्रीराम हनुमंतराव पाटील बेलाटीकर यांनी स्वागताध्यक्ष पद स्विकारले आहे.

श्रीराम पाटील बेलाटीकर यांचा परिचय:
वय ६७ वर्ष, शिक्षण ४थी.
छंद: कुस्ती,पैलवान, समाज सेवा.देवधर्म. पत्नी विजया १५वर्षे उत्तर सोलापूर तालुका पंचायत समिती सभापती होत्या. तसेच पत्नी उत्कृष्ट ग्रहिनी व कवीत्री आहेत. मुलगा दुबईत मेकॅनिकल ईजिंनियर आहे. दुसरा सदन शेतकरी आहे. सोलापूर शेजारी ८२ एकर बागायत शेती. दुध डेअरी, गुऱ्हाळ.सोलापूर येथे काॅटेज.

सर्वात महत्वाचा विषय त्यांनी खर्च करून पाच एकर जमीनीवर श्री संत सद्गुरू बाळु मामा मंदिर उभारले आहे. मी पाहीलेले पाटील एखदम साधेपणा, जमिनीवरील माणूस, या वयातही प्रचंड कष्ट करनारा..मी त्यांना वीस वर्षापासून ओळखतो.श्री शेखर बंगाळे यांनी मला मंदिरात नेवून त्यांच्याकडून पहिला सत्कार केला.२०१९ पासून ते माझ्या सतत संपर्कात आहेत.

मला खूप वर्षांपासून कार्यक्रम घेण्या साठी आग्रह करत आहेत. आम्ही धार्मिक कार्यक्रम घ्यायचा विचार केला होता. पण मग जत्रा नको म्हणून साहित्य संमेलन घ्यावे असे ठरले.श्रीराम हनुमंतराव पाटील बेलाटीकर यांनी मिटींग मध्येच जाहीर केले स्टेज, मंडप, रहाण्याची सोय, स्वागत, दोन दिवस जेवणाची सोय करनार.

मंदिर शहरा पासून ६ किमी विजापूर बायपास वर आहे पण शहरातून प्रवाशी दळवळण व्यवस्था नव्हती.मी महानगरपालिका बस सेवा सुचवली पाटलांनी मला दिनांक २०/१/२०२४ ला बस उदघाटन ला बोलावले . मंदिर बस सेवा सुरू झाली. परिवहन अधिकाऱ्यांशी बोलने झाले. साहित्य संमेलनाच्या दिवसी पाहीजे तेवढ्या बसेस देवू असे सांगितले.महानगर पालीका बसेस सुरू झाल्यामुळे मंदिर स्थळाचा कायापालट होईल. विशेष म्हणजे महानगर पालीका इमारत जागा श्रीराम पाटील यांच्या वडीलांनी सोलापूरकरांना दान केलेली आहे हे कसे विसरतील.

लवकरच दोन दिवसाचा भरगच्च साहित्य संमेलन कार्यक्रम , संमेलनाध्यक्ष,कवी संमेलन, पुरस्कार, मिडीयात जाहीर केले जातील.

श्री श्रीराम हनुमंतराव पाटील बेलाटीकर यांचे तमाम महाराष्ट्र राज्यातील जमाती कडून हार्दिक हार्दिक अभिनंदन.🌹खालील महाराष्ट्र राज्यातील मान्यवरांकडून विशेष अभिनंदन 🌹🌹
प्रा.आर एस चोपडे सर सांगली संमेलन अध्यक्ष.
श्री संजय सोनवणी लेखक संशोधक पुणे.
श्री संभाजीराव सुळ उपाध्यक्ष साहित्य संमेलन.
श्री बाळासाहेब कर्णवर पाटील.
डाॅ अभिमन्यु टकले संस्थापक.
श्री संजय शिंगाडे सर. सांगोला.
श्री सिध्दारूड बेडगनूर सर सोलापूर. प्रा.देवेंद्र मदने सर,सोलापूर,
श्री आण्णाप्पा सत्तूबर सर शिवसेना उपजिल्हाप्रमुख सोलापूर.
श्री ज्ञानेश्वर ढोमणे सर सचिव आमरावती.
श्री शिवकुमार आवजे नागपूर, श्री विनायक काळदाते नाशिक.
श्री हरिदास भदे मा.आमदार आकोला.
मा.आमदार रामहरी रूपनवर माळशिरस लेखक व वक्ते. मा.आमदार रामराव वडकुते,हिंगोली.
डाॅ.मुरहरी केळे संत साहित्य लेखक व मा.वाणिज्य संचालक विद्युत वितरण कंपनी महाराष्ट्र राज्य.
श्री छगन सेठ पाटील उद्योजक ठाणे.
श्री सोमनाथ कर्णवर पाटील ऐपीआय ठाणे.
श्री हणमंतराव चौरे शिवसेना जिल्हाप्रमुख सातारा.
प्रा.डाॅ.यशपाल भिंगे सर लेखक नांदेड.
सौ.रूक्मीणीताई गलांडे ऐसीपी पुणे.
श्री उज्ज्वलकुमार माने संपादक, लेखक, सोलापूर.
डाॅ.स्नेहा सोनकाटे मुंबई.
सौ.रेशमा ठोंबरे पुणे.
श्री रामभाऊ लांडे लेखक अंबड जालना.
मा.विष्णु माने नगरसेवक सांगली.
श्री क्रुष्णा बुरूंगुले संचालक. ऐडव्होकेट अभिमान हाके पाटील मुंबई.
मा.पाडुंरग रूपनवर सांगली.मा.बळवंराव खोत सांगली. मा.प्रवीण वाघमोडे जत.प्रा.शिवाजीराव बंडगर सर मा.सभापती करमाळा.
श्री रामचंद्र (दाजी) खांडेकर समाज सेवक मोहळ.ईजिंनियर अकुंश शिंदे सरपंच पोथरे करमाळा.
श्री शेखर बंगाळे सोलापूर.
श्री बाळासाहेब टकले करमाळा, श्री अगंद देवकते रासप. करमाळा.
श्री गणेश पुजारी पत्रकार पुणे.आमोल पांढरे पत्रकार कोल्हापूर, श्री विठ्ठल सजगणे सर म्हसवड सातारा.
श्री पकंज देवकते रासप मंगळवेढा.
श्री आण्णा कोळेकर सोलापूर.
श्री जगदेव बंडगर सोलापूर.
श्री अजिनाथ कोळेकर करमाळा.
श्री सदाशिव व्हनमाने सर दक्षिण सोलापूर. ऐडव्होकेट संतोष बाराचारे सोलापू
श्री कुंडलिक आलदर सर सांगोला.
श्री जे एन टकले सांगोला.
श्री बिलन सिद्ध काळे

9921018221
पत्रकार दैनिक संचार व प्रसिद्ध प्रमुख पाचवे आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य.
श्री श्रीराम पाटील बेलाटीकर फोन:9921922848.

READ MORE
Blog

नियोजन बैठक – महाराष्ट्र राज्यातील तमाम सामाजिक, साहित्य, संस्कृती, धर्म

नियोजन बैठक

महाराष्ट्र राज्यातील तमाम सामाजिक, साहित्य, संस्कृती,धर्म या क्षेत्रातील आवड असलेल्या सर्व मान्यवरांना कळवण्यात येते की रविवार दिनांक ३१/१२/२०२३ रोजी सकाळी ११ ते दुपारी ०२ या वेळेत .
स्थळ: श्री. संत सद्गुरु बाळू मामा ट्रस्ट मंदिर विजापूर रोड बेलाटी ता .उत्तर सोलापूर, जि.सोलापूर येथे ”पाचवे आदिवासी धनगर साहित्य संमेलन” महाराष्ट्र राज्य ची नियोजन बैठक आयोजित केली आहे .तरी मोठ्या प्रमाणावर मान्यवरांनी सहभागी व्हावे असे आवाहन श्रीराम पाटील बेलाटीकर अध्यक्ष श्री संत सदगुरू बाळूमामा मंदिर ट्रस्ट विजापूर रोड बेलाटी यांनी केले आहे.

नियोजनाचे विषय
१) स्थळ ठरवने,२) संमेलन दिनांक ठरवणे, ३) संमेलन अध्यक्ष ठरवणे, ४)स्वागताध्यक्ष ठरवणे,५)कार्यक्रम रूपरेषा ठरवणे, ६) साहित्य संमेलन जबाबदार समिती ठरवणे. अध्यक्ष च्या परवानगीने आलेल्या विषयावर चर्चा करणे.
धन्यवाद 🌹🙏🏻🌹

श्री बिस्लासिध्द काळे
प्रसिद्धीप्रमुख
पत्रकार सोलापूर.
9921018221

READ MORE
Blog

श्री बाळासाहेब कर्णवर पाटील यांचे गोरडवाडी येथे अधिकारी आणि समाज सेवकांचे तालुकास्तरीय स्नेह संमेलन.

दिनांक १४/११/२०२३ रोजी दिवाळी पाडवा होता. साडेतीन मुहूर्ता पैकी एक मुहूर्त . या निमित्त बाळासाहेब कर्णवर पाटील उपाध्यक्ष श्री श्री सदगुरू साखर कारखाना राजेवाडी यांनी स्वत: च्या घरी अधिकारी स्नेह संमेलन ठेवले होते. त्यांचे बंधु येपीआय सोमनाथ कर्णवर यांनी समन्वय केला होता. तीनसे वर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.अनेक अधिकारी कर्मचारी यांच्या बरोबर चर्चा करण्यात आली. डाॅ प्रकाश महानवर कुलगुरू पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विद्यापीठ सोलापूर, श्री बाळासाहेब पाटील पोलीस कमिशनर जि.पालघर, प्राचार्य आर एस चोपडे सर अध्यक्ष अहिल्या शिक्षण संस्था सांगली, डाॅ.अभिमन्यु टकले संस्थापक धनगर धर्म पीठ महाराष्ट्र राज्य व धनगर धर्म पीठ महाराष्ट्र राज्य, श्री बाळासाहेब वाघमोडे उप जिल्हाधिकारी कोल्हापूर, डॉ स्वप्निल चोपडे संचालक अहिल्या शिक्षण संस्था, लुनेश विरकर पत्रकार व अनेक कर्मचारी, अधिकारी उपस्थित होते.

READ MORE
Blog

देवी अहिल्याबाई होळकर शिक्षण संस्थेचा शानदार हिरक महोत्सव समारोप सांगली येथे संपन्न.

प्राचार्य डाॅ अभिमन्यु टकले.
संस्थापक:आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य.
संस्थापक:धनगर धर्म पीठ महाराष्ट्र राज्य.
————————-‐—

मा.आमदार बॅरिस्टर टि.के.शेंडगे एक दुष्काळी भागातील नेतृत्व. साठ वर्षांपूवी पेड येथे देवी अहिल्याबाई होळकर शिक्षण संस्था स्थापन केली. प्राचार्य आर एस चोपडे सर यांनी अध्यक्ष पदाची धुरा खांद्यावर घेतली आणि बॅरिस्टर टिके शेंडगे यांनी लावलेल्या रोपट्याचे रुपांतर वटवृक्षात केले. जमिनी दानपत्र घेऊन, वर्गंन्या गोळा करून २८ शासकीय अनुदानीत शाळा काॅलेज,वस्ती ग्रह उभा केली, खाजगी युनीटसही उभा केली. या साठी साठ वर्षांचे अथक परिश्रम,अथक अर्थिक खर्च, अथक कष्ट करून कमावलेल्या जमिनी शेतकऱ्यांनी दान दिल्या. या मुळे दुष्काळी भागातील अनेक विद्यार्थी अनेक क्षेत्रात कार्यरत आहेत. हे या संस्थेचे यश आहे. सांगली, सातारा, सोलापूर हे या संस्थेचे कार्य क्षेत्र. या संस्थेमार्फत विविध कार्यक्रम राबवून वर्षे भर हिरक महोत्सवी कार्यक्रम आयोजित करण्यात आले. प्राचार्य आर एस चोपडे सर एक शिक्षण, साहित्य,सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात काम करणारे प्रमाणीक व्यक्तीमत्व. प्राचार्य आर एस चोपडे सर यांची आपण ४थे आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य पदी २०१९ ला निवड केली. आजही ते आपल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून ही त्यांनी उत्कृष्ट कार्य केले आहे.

या संस्थेला महाराष्ट्र शासनाने उत्कृष्ट संस्था म्हणून गौरवले आहे.

या संस्थेच्या हिरक महोत्सवी समारोपास मला निमंत्रित केले होते. या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री येणार होते. पण सरकार चे प्रतिनिधी म्हणून श्री सुरेश खाडे कामगार मंत्री व सांगलीचे पालक मंत्री कार्यक्रमास उपस्थित होते.

तसेच श्रीमती सुमनताई पाटील आमदार तासगाव या उपस्थित होत्या. आमदार श्री गोपीचंद पडळकर विधान परिषद सदस्य उपस्थित होते.

कार्यक्रमाचे अध्यक्ष वैभव नाईकवडी हे हुतात्मा किसन आहिर साखर कारखान्याचे अध्यक्ष होते. सातारा अप्पर जिल्हाधीकारी लेंगरे साहेब उपस्थित होते. प्रसिद्ध नेत्र तज्ञ डाॅ.दिलीप पटवर्धन उपस्थित होते.

मा. नगरसेवक विठ्ठल खोत उपस्थित होते. श्री बाळासाहेब कर्णवर पाटील उपाध्यक्ष श्री श्री सदगुरु साखर कारखाना हे उपस्थित होते. संस्थेचे सर्व पदाधिकारी, कर्मचारी, शिक्षक वृदं उपस्थित होते.संस्थे तर्फे आमचा मान्यवरांचे स्वागत व सत्कार करण्यात आला. आम्हाला आमचे थोडक्यात मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली.काही मान्यवरांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. सोहळा अगदी देखणा आणि शिस्त बध्द होता.

संस्थेचे धन्यवाद व संस्थेला हार्दिक हार्दिक शुभेच्छां.

READ MORE
Blog

संजय सोनवणी प्राख्यात लेखक व ईतिहास संशोधक यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा

संजय सोनवणी ईतिहास संशोधक. प्राख्यात लेखक, महाराष्ट्र राज्यातील एक विचारवंत. ७/८जानेवारी २०१७ रोजी पहिले आदिवासी धनगर साहित्य संमेलन सोलापूर महाराष्ट्र राज्य या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व मार्गदर्शक. सर्व जाती धर्माच्या भिंती बाजूला
सारून सोनवनी यांनी महाराष्ट्र राज्य आणि भारतातील सांस्कृतिक चळवळीचे मार्गदर्शन सुरु ठेवले आहे.

महाराष्ट्र, जळगाव जिल्ह्यात संजय सोनवणींचा जन्म श्री. देविदास सोनवणी आणि सौ. इंदुमती सोनवणी या दांपत्याच्या घरी झाला. वडील श्री देविदास सोनवणी हे प्राथमिक शिक्षक होते. त्यांनी राजगुरुगर येथील हुतात्मा राजगुरू महाविद्यालयातून बी. कॉम ही पदवी मिळवली. पुढील शिक्षणासाठी ते पुण्यात आले. येथे त्यांनी एम.कॉम ही पदवी प्राप्त केली. गडचिरोलीसारख्या आदिवासी आणि नक्षलवादाने ग्रस्त भागात त्यांनी काही काळ धातु-भुकटी कारखाना चालविला. अवघ्या पाच हजार रुपयांच्या भांडवलावर त्यांनी सुरुवात केली होती. त्यांनी लेह (लडाख) येथेही फळप्रक्रिया उद्योग उभारण्याचा प्रयत्नव केला. पुष्प प्रकाशन लि. या संस्थेमार्फत त्यांनी ८५०पेक्षा अधिक पुस्तके प्रसिद्ध केली.
साहित्य प्रवास

सोनवणींनी ११ वर्षांचे असताना “फितुरी” हे नाटक लिहिले. वयाच्या १६ व्या वर्षी त्यांनी लिहिलेली पहिली बालकादंबरी (नरभक्षकांच्या बेटावर) मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केली. महाराष्ट्र राज्य शासनाच्या अनुदानाने त्यांचा पहिला कवितासंग्रह “प्रवासी” प्रसिद्ध झाला. सव्यसाची, मृत्युरेखा, रक्त हिटलरचे, बीजिंगच्या वाटेवर, क्लिओपात्रा इ. त्यांच्या कादंबर्याफ इंग्रजीत अनुवादित झाल्या. भारतातील स्वतंत्र प्रज्ञेचे ते पहिला थरार कादंबरीकार मानले जातात. त्यांने एकून २८ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय थरार कादंब-या लिहिलेल्या असून “On the Brink of the Death” ही इंग्रजीतील थरार कादंबरी जगभर गाजलेली आहे. कल्की, शून्य महाभारत, कुशाण, ओडीसी आणि यशोवर्मन या त्यांच्या तत्त्वचिंतनात्मक कादंबर्याी आहेत. कुशाणचा अनुवाद इंग्रजीत “Last of the wanderers” या नावाने आणि यशोवर्मनचा “The Jungle” या नावाने प्रसिद्ध झाला. त्यांची राणी शीबाला केंद्रीभूत धरून लिहिलेली “The Awakening” ही इंग्रजी कादंबरी प्रसिद्ध आहे. या कादंबरीचा मराठी अनुवादही आहे. त्यांच्या “पर्जन्य सूक्त” या काव्याचा इंग्रजीत अनुवाद झाला आणि त्यातील निवडक ८ कवितांना संगीतबद्ध करून त्याची ध्वनिफीतही प्रसिद्ध झाली. त्यांची “असुरवेद” ही गाजलेली सांस्कृतिक थरारकथाही आहे. त्यांची “…आणि पानिपत” ही कादंबरी सर्वावधिक गाजली. ही मराठीतील पहिली subaltern कादंबरी आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनातून लिहिलेला त्यांचा नीतिशास्त्र हा नैतिक समस्यांबद्दलचा चिंतनपर ग्रंथ प्रसिद्ध आहे. त्यांनी अनेक नाटकेही लिहिली. त्यातील काहींचे प्रयोगही झाले. अलीकडेच त्यांची “तृतीय नेत्र” ही कादंबरीही प्रकाशित झाली असून “भाषेचं मूळ” या पुस्तकातून त्यांनी भाषनिर्मितीचा प्रश्न सोडवत प्राकृत भाषाच मूळ कशा आहेत हे सिद्ध करून दाखवले आहे. महाराजा यशवंतराव होळकर यांचे मराठी व इंग्रजी भाषेतील चरित्र ही त्यांची महत्वाचे निर्मिती मानली जाते.
संजय सोनवणी यांनी विश्वनिर्मितीबाबतचा स्वतंत्र सिद्धान्त “अवकाशताण सिद्धान्त आणि विश्वनिर्मिती” नामक पुस्तकात मांडला आहे.

सोनवणी यांनी धर्मेतिहासावर “हिंदू धर्माचे शैव रहस्य” आणि “विठ्ठलाचा नवा शोध” हे ग्रंथ सिद्ध केले.

संशोधन
सोनवणी यांनी धर्मेतिहासावर “हिंदू धर्माचे शैव रहस्य” आणि “विठ्ठलाचा नवा शोध” हे ग्रंथ सिद्ध केले. त्यांचा “महार कोण होते?” हा महार समाजाचा पुरातन इतिहास उलगडून दाखवणारा महत्त्वाचा ग्रंथ प्रकाशित झाला आहे.
धनगरांचा गौरवशाली इतिहास हा त्यांचा एक महत्वाचा ग्रंथ असून महाराजा यशवंतराव होळकर यांच्या क्रांतीकारी जीवनावर प्रकाश टाकणारा “भारतीय स्वातंत्र्याचे आद्य प्रणेते महाराजा यशवंतराव होळकर” हा ग्रंथ सर्वाधिक लोकप्रिय आहे. त्यांनी इंग्रजीतही “Unsung Hero of India- Maharaja Yashavantrao Holkar” हा ग्रंथ लिहिला आहे. जगभरच्या अभ्यासकांने त्याचे स्वागत केले आहे.

वाघ्याचे सत्य हे रायगडावरील वाघ्याची सत्यस्थिती मांडणारी पुस्तिकाही प्रसिद्ध असून जेंव्हा वाघ्याबद्दल विवाद निर्माण करण्यात येऊन तो पुतळा उखडून फेकण्यात आला तेंव्हा सोनवणी यांनी उपोषणाचे हत्यार उपसले होते. त्यांना महाराष्ट्रातील आम जनतेने पाठींबा दिल्याने वाघ्याची पुनर्स्थापना झाली.

धनगर आरक्षण, त्यांचे आदिवासी असण्याचे वास्तव यावर महत्वाच्या वृत्तपत्रे-मासिके यात असंख्य लेख लिहिले तर वाहिन्यांवरून धनगर आरक्षणाबाबत झालेल्या चर्चांमध्ये सहभाग घेऊन धनगर समाजाची बाजू मांडली. धनगर आरक्षणासाठी पुणे येथे भर पावसात उपोशनही केले.

२०११ साली महाराजा यशवंतराव होळकर यांचे वाफगाव येथील जन्मस्थळ शोधून तेथे त्यांची जयंती साजरी करण्याची प्रथा सुरु केली तसेच वाफगाव येथील हे जन्मस्थान राष्ट्राय संरक्षित स्मारक व्य्हावे अशी मागणीही २०१२ सालापासून सुरु केली.थोरले सुभेदार मल्हारराव होळकर यांचे अत्रे यांनी १८९३ साली प्रसिद्ध केलेल्या चरित्राचे संपादनही त्यांनी केले.

ते पहिल्या आदिवासी धनगर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले होते.

धनगर समाजाच्या आराध्यांविषयी जेंव्हाही कोणा लेखकाने, राजकीय नेत्याने चुकीचे आरोप केले त्यावेळीस त्यांनी त्यांचा समाचार घेतला आहे.

सध्या सोनी वाहिनीवर रोज प्रसिद्ध होणा-या “पुण्यश्लोक अहिल्या” या मालिकेचे इतिहास संशोधक म्हणून ते काम पाहत आहेत. ही मालिका त्यांच्या प्रयत्नांमुळेच सुरु होऊ शकली व ती मालिका आज देशभर लोकप्रिय आहे.

वैदिक धर्म-संस्कृतीचे उगमस्था्न या विषयावरचे Origins of the Vedic Religion and Indus-Ghuggar Civilisation हा सोनावणी यांचा ग्रंथ २०१५ साली प्रकाशित झाला. सोनवणी यांनी लोहभुकटी निर्मितीचा, संगणकप्रणाली व सेंट्रीफ्युगल पंखे निर्मितीचेही उद्योग उभारले होते व ते लोहभुकटी तंत्रज्ञानातील देशातील नामवंत तज्ञ मानले जातात.

सोनवणी यांची आजवर मराठी व इंग्रजी अशी एकुण ११७ पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. ते संगीतकार, अभिनेते व चित्रपट दिग्दर्शकही आहेत.

स्वर्गीय हरी नरकेजी यांच्या सारखा विचारवंत सहकारी तारा निखळला याचे दुख त्यांना व आपल्या सर्वांनाच आहे.

संजय जी सोनवणी यांना शतकी दीर्घायुष्य लाभो हीच वाढदिवसानिमित्त हार्दिक, हार्दिक शुभेच्छा.
संजय सोनवणी फोन नंबर 9860991205
लेखक:
प्राचार्य डाॅ.अभिमन्यु टकले .
संस्थापक अध्यक्ष
आदिवीसी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य .

READ MORE