Blog

सांगोला मध्ये 23 व 24 जुलैला आदिवासीं धनगर साहित्य संमेलनाचे आयोजन

मुंबई(प्रतिनिधी):-आदिवासीं धनगर समाजाचे चौथे साहित्य संमेलनाचे आयोजन दिनांक 23 व 24 जुलै 2022 रोजी सांगोला येथे करण्यात आले असल्याचे अध्यक्ष आर.एस.चोपडे यांनी कुपवाड येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक या ठिकाणीं पत्रकार परिषदेत जाहीर केले.या दोन दिवस चालणाऱ्या साहित्य संमेलनात ग्रंथदिंडी,उदघाटन, परिसंवाद,सांस्कृतिक कार्यक्रम,कवी संमेलन, चर्चासत्र,व्याख्याने,आदि भरगच्च कार्यक्रम होणार असल्याने महाराष्ट्रामधील धनगर समाज बांधवानी या संमेलनाचा लाभ घ्यावा. सोलापूर येथे 2017 साली पहिले आदिवासी धनगर समाज साहित्य संमेलन,लातूर येथे 2018 दुसरे आदिवासी धनगर समाज साहित्य संमेलन,तर म्हसवड येथे 2019 साली तिसरे आदिवासी धनगर समाज साहित्य संमेलन मोठ्या उत्साहात पार पडले.चौथे आदिवासी धनगर समाज साहित्य संमेलन आमदार गणपतराव देशमुख यांच्या इच्छानुसार सन 2020 मध्ये जाहिर केले होते,परंतु कोरोना प्रादुर्भाव काळामुळे रद्द करण्यात आले होते. ते आता माजी आमदार गणपतराव देशमुख स्मृतीप्रित्यर्थ चौथ्या साहित्य संमेलनाचे आयोजन सांगोला येथे करण्यात येत आहे.असे अध्यक्ष आर एस चोपडे यांनीं बैठकीत सांगितले. या बैठकीत साहित्य संमेलनाचे संस्थापक अभिमन्यू टकले, कार्याध्यक्ष विष्णु देशमुख,कुंडलिक आलदर,संजय शिंगाडे, माजी महापौर संगीता खोत,नगरसेवक विष्णु माने,उद्योजक पांडुरंग रुपनर व इतर मान्यवर उपस्थित होते.

READ MORE
Blog

दिनांक २३|२४ जुलै रोजी सांगोला येथे साहित्य पढंरी भरनार

संपादक दिलीप एडतकर
आमरावती, शुक्रवार दिनांक १|७|२०२२ .
रोजी येथे मा.ज्ञानेश्वर जी ढोमणे ऑडीटर वर्ग एक पदावरून निवृत्त झाले. त्या निमीत्त त्यांनी स्नेह मेळावा आयोजित केला होता.अकोला आमरावती, नागपूर, यवतमाळ येथून त्यांचे अनेक मित्र, नातेवाईक, अधिकारी, कर्मचारी या कार्यक्रमात सहभागी झाले होते. अध्यक्ष स्थानी दैनिक विदर्भ मतदार चे संपादक दिलीपभाऊ एडतकर हे होते.
डाॅ.अभिमन्यु टकले संस्थापक आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य.श्री प्रभाकर दिवनाले महाराज धर्मगुरू विदर्भ धनगर धर्मपीठ,श्री घोडस्कर महाराज आमरावती धनगरधर्मपीठ,उमेश घुरडे संचालक बाजार समिती यांची प्रमुख उपस्थिती होती.

श्री दिलीप एडतकर अध्यक्षीय भाषण करताना म्हणाले शासकीय सेवेतील अनेक अधिकारी सेवेत असतानाच खुर्चीत बसून रिटायर झाल्या सारखे वर्तन करत असतात. पण ज्ञानेश्वर जी ढोमने हे शासकीय सेवेतून रिटायर झाले आहेत.पण ते सामाजिक कार्यातून कधीही रिटायर होणार नाहीत. श्री ज्ञानेश्वर ढोमने यांच्या सारख्या अधिकार्याची शासनाला गरज होती आता त्यांच्या सारख्या माणसांची समाजाला गरज आहे. पुढे बोलताना ते म्हणाले या ठिकाणी आज डाॅ.अभिमन्यु टकले उपस्थित आहेत त्यांच्या माध्यमातून साहित्य संमेलन समाजाचा चांगला उपक्रम सुरू झाला आहे. समाजाचे लोक तो कार्यक्रम घेत आहेत. या वर्षी जा ठिकाणी राज्यातील सर्वात जास्त धनगर समाज आहे तो जिल्हा सोलापूर आणि सर्वात जास्त धनगर समाज असलेला तालुका सांगोला. या सांगोला तालुक्यातील लोक साहित्य संमेलन घेत आहेत.दिनांक २३|२४ जुलै २०२२ रोजी सांगोला धनगर नगरी साहित्य पंढरी होनार आहे.या साहित्य पंढरचे विदर्भ अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर ढोमने आहेत. या साहित्य पढंरी मध्ये राज्यातील ना. धो.महानोर सारख्या नामवंत साहित्यीकांनी हजेरी लावलेली आहे. राज्यातील समाजाचे सर्व क्षेत्रातील बौद्धिक लोक विचारांची देवाणघेवाण करत असतात. या साहित्य पंढरी मध्ये या वर्षी पासून खान्देश आणि विदर्भातील सर्व बौद्धिक मंडळीनी साहित्य संमेलनात सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. तसेच येथून पुढे साहित्य संमेलनाला सर्वतोपरी मदत केली जाईल व या साहित्य पढंरी सोबत आम्ही सदैव असू असे म्हणाले.

या ठिकाणी अनेक विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मत व्यक्त करताना सांगीतले की श्री ज्ञानेश्वर ढोमने समाजाशी नाळ जुळलेला कुशल संघटक असून त्यांनी सक्रिय समाकारण आणि राजकारण करावे .
श्री ज्ञानेश्वर ढोमने सत्काराला उत्तर देताना म्हणाले मी जा समाजात जनमाला आलो त्याचे ऋण फेडण्यासाठी मी समाजकारण करत आलो. अनेक अडचणींवर मात करत सेवा निव्रुत्त झालो आहे.माझी शासकीय सर्व बंधनातून मुक्त झालो असून फूल टाईम समाज सेवा करणार आहे याची सुरवात आज पासून आदिवासी धनगर साहित्य संमेलन सांगोलाची तयारी करणार आहे.

डाॅ.अभिमन्यू टकले मनोगत व्यक्त करताना म्हणाले नोकरी तर सर्वच करतात पैसा सर्वच कमवतात पण सर्वात मोठ धन समाज आहे. श्री ज्ञानेश्वर ढोमने सर निव्रुत्त होताहेत त्यांच्या साठी मी आलो नाही तर ज्या ज्ञानेश्वर ढोमणे नी नोकरी करत समाज सेवा केली त्या साठी मी आलो आहे.श्री ज्ञानेश्वर ढोमने सर यांची आयुष्यातील एक रोल पुरा झाला आहे दुसरा सुरू झाला आहे. त्यांनी महाराष्ट्र राज्यातील जनतेची सेवा करावी. सुखरूप निव्रुत्त बद्दल अभिनंदन तर पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.साहित्य संमेलन तळा गाळातील जनते पर्यंत पोहचवा असे अवाहन केले.
अनेक मान्यवरांनी आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य हा एक समाजा साठी अभिमानास्पद,सर्व समावेशक स्तुत्य उपक्रम असल्याचे मनोगत व्यक्त केले.
श्री ज्ञानेश्वर ढोमणे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला.

श्री राजू डांगे यांनी सुत्र संचालन केले.आभार व्यक्त करून तीन तासाचा कार्यक्रम संपला.

READ MORE
Blog

आदिवासी धनगर समाज साहित्य संमेलन, सांगोला येथे होत आहे, करीता आपल्या सर्व साहित्यकार्यकर्ता यांच अभिनंदन करतो

आयोजक श्री डाँ अभिमन्यू टकले सर,
आपण एक धनगर समाजाला दिशा आणि दिक्षा देत आहात, या संमेलनातुन जनजागृती अभियान लोकांन पर्यंत पोचवण्यासाठी जे काही कार्य आपण करत आहात
धनगर धर्म पीठाच्या माध्यमातून समाज प्रबोधन प्रबोधनकार वक्ते प्रवक्ते आहे ते या कार्यालासर्व साधूसंतांचे विचार प्रबोधनकार महाराज मंडळी कडुन देण्यात येत आहे, आपल संत हुर्दयी जिव्हाळ्याने भरलेल अतोनात प्रेम आहे करीता आपणास कोणत्या शब्दात
व्यक्किमत्वाबद्दल लिहितांना कसा व्यक्त होऊ हा प्रश्न पडतो,, आपण आपल्या कार्याच्या दृष्टीने दिलखुलास मित्र,, की सच्चा दिलाचा निर्मळ माणुस,,उपमा देऊ कशाची,,?
सर तुम्हाला चंद्राची दिली तर
चंद्रावर डाग आहे,
सुर्याची दिली तर सूर्यावर आग आहे,,
तुम्हाला उपमेची गरजच काय ,,
उपमेलाच तुमची गरज आहे,,
अशा विविधांगी छटांनी निखरलेल्या व्यक्तीमत्वास ह्रध्दस्त अंतःकरणातुन आपणास या संमेलनाच्या मी
माझ्या यवतमाळ जिल्ह्यातील सर्व धनगर समाजाच्या वतीने मनपूर्वक
हार्दिक हार्दिक
शुभेच्छा
देत आहे
जयगुरु जय मल्हार जय रामकृष्ण हरी जय माऊली

आपला नम्र सेवक
रमेश कचरे

READ MORE
Blog

आरविंदजी केजरीवाल आप प्रमुख, मुख्यमंत्री दिल्ली व श्री दिनेश मोहनिया आमदार आप व प्रभारी झारखंड चौथे आदिवासी धनगर साहित्य संमेलन सांगोला येथे समारोपाला येनार.

नवी दिल्ली, सोमवार दिनांक: २०|६|२०२२ रोजी रामकृष्ण पाल होळकर अध्यक्ष कामगार नेते नवी दिल्ली यांची दुपारी भेट झाली.

त्यांनी मा.आमदार दिनेशजी मोहनिया आप आमदार यांच्याशी भेट घालून दिली. मा आरवींदजी केजरीवाल मुख्य मंत्री नवी दिल्ली पजांब बाय इलेक्शन ला गेले होते. त्यांच्या मार्फत मा.आमदार दिनेश जी मोहनिया धनगर यांनी आदिवासी धनगर साहित्य संमेलन चे निमंत्रण स्विकारले.तसेच दोन तास आमदार महोदय यांनी चर्चा केली.मा.आरविंदजी
केजरीवाल मुख्य मंत्री आणि ते स्वतः चौथे आदिवासी धनगर साहित्य संमेलन सांगोला येथे येणार आहेत असे सांगीतले.

तसेच २३|६|२०२२ रोजी आरविंदजी केजरीवाल हे पजांब वरून परतनार आहेत आणि आदिवासी धनगर साहित्य संमेलनाच्या निमंत्रीता शी बैठक घेनार आहेत. श्री दिनेश जी मोहनिया यांच्याशी चर्चा करण्या साठी दिल्ली येथे श्री बाळासाहेब कर्णवर पाटील व्हा.चेरमन श्री श्री सदगुरू साखर कारखाना राजेवाडी, डाॅ.अभिमन्यु टकले संस्थापक धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य, श्री तुकाराम मासाळ, श्री अर्जुन हजारे पत्रकार नवमहाराष्ट्र हे उपस्थित होते. त्या मुळे आदिवासी धनगर साहित्य संमेलन अगदी ऐतिहासिक व आगळे वेगळे व भव्य दिव्य होणार.

आरविंदजी केजरीवाल रविवार दि .२3|७|२०२२ रोजी समारोपाच्या कार्यक्रमास येनार आहेत. तसेच त्यांची येण्याची प्रबळ इच्छा आहे त्यामुळे ते येनार च आहेत. तसेच आम्ही त्यांना हेलीकॉप्टर ने यावे अशी विनंती केली असता ते पुण्याहून बाय कार येनार अशीही माहीती दिली.

READ MORE
Blog

मा. नितीन जी गडकरी केंद्रीय मंत्री ४थे आदिवासी धनगर साहित्य संमेलन २३ जुलै २०२२ सांगोला येनार

नागपूर :रविवार: दिनांक :१९|६|२०२२.
आज ठिक सकाळी १०वाजता. सकाळी ११:१७ वाजता दोन वेळा आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य शिष्ट मंडळाची मा.नितीन जी गडकरी यांनी भेट घेतली.परंतु सकाळी११:१७ वाजता शिष्ट मंडाळास भेट देवून सविस्तर चर्चा केली. श्री रामराव वडकुते माजी आमदार व भाजप जिल्हाध्यक्ष हिंगोली यांनी घोंगडे घालून सत्कार केला. डाॅ.अभिमन्यु टकले संस्थापक अध्यक्ष धनगर साहित्य संमेलन व संस्थापक धनगर धर्म पीठ महाराष्ट्र राज्य यांनी निमंत्रण पत्र दिले.श्री संजय शिंगाडे सर -स्वागताध्यक्ष यांनी व श्री बाळासाहेब कर्णवर पाटील व्हा.चेरमन श्री श्री सदगुरू साखर कारखाना राजेवाडी यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. मा. आमदार नागो गानार सर शिक्षक मतदार संघ नागपूर, मा.ऐडव्होकेट ढेरे सर सांगोला. मा.सोमनाथ मोटे सचिव रासप सांगोला.मा.तुकाराम मासाळ कवठेमहंकाळ. श्री अर्जुन हजारे पत्रकार नवमहाराष्ट्र सांगली. श्री आवजे शिवकुमार, श्री धनराज खडसे सर कवी.श्री खुशाल तांबडे समाज सेवक नागपूर. श्री श्रीधर भांगे सर लातूर.

हे सर्व शिष्ट मंडळ सदस्य उपस्थित होते. डाॅ.अभिमन्यु टकले यांनी त्यांना निमंत्रण दिले. दिनांक २३|७|२०२२ रोजी आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य सांगोला उद्घाटनास यावे हीच लोकांची लोकभावना आहे असे सांगीतले. म्हणूनच तुम्ही माझ्याकडे निमंत्रण देण्यास आले आहेत असे मंत्री महोदय म्हणाले.तसेच मी नक्की येणार आहे आणखी काही कार्यक्रम लावता येतो का तेही पाहू असे मा.केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी साहेब म्हणाले. डाॅ.अभिमन्यु टकले यांनी व श्री रामराव वडकुते माजी आमदार व भाजप जिल्हाध्यक्ष हिंगोली यांनी सर्व शिष्टमंडळातील सदस्यांची ओळख करून दिली. अशा तर्हेने आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य यांची भेट यशस्वी झाली.

READ MORE
Blog

चौथे आदिवासी धनगर साहित्य संमेलन शनिवार व रविवार दिनाँक २३ /२४ जुलै २०२२ रोजी सांगोला जि सोलापुर येथे होणार आहे. साहित्य संमेलन संस्थापक डॉ अभिमन्यु टकले

चौथे आदिवासी धनगर साहित्य संमेलन शनिवार व रविवार दिनाँक २३ /२४ जुलै २०२२ रोजी सांगोला जि सोलापुर येथे होणार आहे. साहित्य संमेलन संस्थापक डॉ अभिमन्यु टकले आहेत , या संमेलनाचे अध्यक्ष श्री आर एस चोपड़े अहिल्या शिक्षण संस्था सांगलीचे अध्यक्ष आहेत. प्रा. संजय सिंगाड़े सर हे स्वागत अध्यक्ष आहेत

 

पाहिले साहित्य संमेलन २०१७ ला सोलापुर येथे झाले। दूसरे साहित्य सम्मेलन २०१८ ला लातूर येथे झाले। तीसरे साहित्य सम्मलेन म्हसवड जि सातारा येथे २०१९ला झाले। चौथे साहित्य सम्मलेन मा आमदार गणपतराव देशमुख यांच्या म्हणण्यानुसार संगोला येथे जाहीर झाले होते। पूर्ण तैयारी झाली होती। पण कोविड १९ मुळे स्थगित करण्यात आले होते ‘ हे सम्मलेन स्वर्गीय गाणपतराव देशमुख यांच्या स्मरणार्थ होणार आहे , सर्व साहित्य सम्मेलन तीन दिवसाची झाली आहेत. २५ ते ३० हजार विविध क्षेत्रातील मान्यवरांनी देशभरतुन हजेरी लावलेली आहे। या सम्मेलनास किमान ४० हजार विविध क्षेत्रातील मान्यवर हजेरी लावण्याची आपेक्षा आहे। या संमेलनात दोन दिवस भरगच्च असे कार्यक्रम आहेत शनिवार दिनांक २३/७/२०२२ रोजी साहित्य दिंडीचा कार्यक्रम सकाळी आठ तें साडे अकरा पर्यन्त असेल। मान्यवर हस्ते दिंडीचे उद्घाटन होईल दिंडी मधे ४० सजवलेले रथ असतील। रथात ऐतिहासिक वेश भूषा धारण केलेले विद्यार्थी शिक्षक कलाकार असतील. यात जमातीचा इतिहास , धर्म,संस्कृति , साहित्य ,रूढ़ि।,परंपरा , चाली ,रीती ,शैक्षणिक प्रबोधन रथ ,सजीव देखावे ,लेज़िम ,भजनी मंडल ,गाजे ढोल, शोभा यात्रा असतील , साहित्य नागरीचे नाव संत बालु मामा नगरी असे असेल तर ग्रन्थ दालनचे नाव संत कनकदास नगरी असे असेल , साहित्य पीठास कवी कालिदास पीठ असे नाव देण्यात येईल ,या सर्व नगरीचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात येईल,उद्घाटन सोहळा दुपारी बारा ते तीन वाजे पर्यन्त असेल, उद्घाटन सोहळा मान्यवर यांच्या हस्ते होईल, भंडारा उधळून गजेडोलचया गजरात येळकोट येळकोट जय मल्हारच्या घोषणा देत साहित्य संमेलनाचे उद्घाटन होईल ,फ़क्त उद्घाटन आणि समारोप सोहळ्यास राजकीय नेत्यांना परवानगी राहील ,उद्घाटन कार्यक्रम मधे संस्थापक सम्मलेन ,अध्यक्ष,सोलापुर जिल्हा पालकमंत्री ,लोकल आमदार ,खासदार ,साहित्यिक ,सामाजिक,शैक्षणिक ,उद्योग ,प्रशासन ,विभागातील मान्यवर असतील, तीन तास जमातीच्या विविध विषयायावर प्रकाश टाकतील ,नविन सहितिकांच्या साहित्याचे प्रकाशन होईल,शिक्षण साहित्य पत्रकारिता वैद्यकीय सामाजिक प्रशासन क्षेत्रातील १० आदर्श मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरव करण्यात येईल, स्वर्गीय आमदार गणपतराव देशमुख आदर्श आमदार पुरस्कार देण्यात येईल. तसेच भारत देशयातील एक आदर्श लोकसेवक मुख्यमंत्री यांची निवड करणार आहोत आणि रुख एक लक्ष रुपये शाल श्रीफळ काटी घोंगडी देऊन धनगरजमाती मार्फ़त पुरस्कार देऊन भव्य सत्कार करण्यात येईल. सम्मलेन अध्यक्ष यांचे भाषण झाल्यानंतर उद्घाटन सोहळा संपेल। गलांडे दुपारी तीन ते सायंकाळी सहा वाजे पर्यन्त स्पर्धात्मक सांस्कृतिक कार्यक्रम असेल , याचे उद्घाटन संगोला नगरीचे नगरधक्ष्य करतील, या मधे अहिल्या शिक्षण संस्था सांगली अणि विविध शाळा कॉलेजेस सहभाग घेतील , या मधे धनगरी गीते,, ओव्या, धनगरी नृत्य असतील, सायंकाळी ६ते ८ वाजता परिसवांद आहेत। विषय : धनगर साहित्याचा विविध क्षेत्रावर होणारा परिणाम वक्ते :मा राम लांडे लेखक ,नवनाथ गोरे लेखक ,प्रा मुकुंद वलेकर। विषय -धनगर सारा एक वक्ते :संजय सोनवानी ईतिहास संशोधक ,लेखक। रात्री ८ते ११ कवी संमेलन होणार आहे , कवी संमेलन अध्यक्ष शिवाजी बंडगर ग्रामीण साहित्यिक हे असतील. सूत्र संचालन भरत दौंडकर कवी हे करतील। ह भ प श्यामसुंदर महाराज कवी ही प्रमुख उपस्थिती असेल. कविसम्मेलनात ४० कवी भाग घेणार आहेत। रविवार दिनांक २४/७/२०२२ रोजी दिवसभर परिसवांद चर्चा सत्र अणि व्याख्याने होतील। विषय ; धनगरांचा राजकीय प्रवास वक्ते :एडवोकेट अण्णा राव patil ,प्रा डॉ किसन माने। विषय : धनगर साहित्याकांची जबाबदारी , वक्ते : चिंतामणी सहस्त्रबुद्धे संपादक दै तरुण भारत। डॉ मधुकर सलगरे लेखक लातुर। विषय : धनगर समाज्याच्या समस्या मिडिया लक्ष्य का वेधून घेत नाही। वक्ते :मा सुभाष बोंद्रे कार्यकारी संपादक दै, दिव्य मराठी , श्यामसुंदर सोन्नर महाराज वरिष्ठ पत्रकार ,विषय :होळकर श्याहीच्या इतिहासातून काय घ्यावें वक्ते : प्रा डॉ यशपाल भिंगे मा सुभाष माने मा संचालक सहकार पणन महामंडळ। विषय :धनगर आरक्षण वक्ते मा सुभाष पाटिल खेमनार मा कृषि संचालक मा गणेश दादा हाके बीजेपी प्रवक्ते विषय : महिलांची सामाजिक जबाबदारी डॉ ज्योति सुल समाजीक कार्यकर्ती ,डॉ स्नेहा सोन सोनकाटे , सौं रुक्मिणी गलांडे डीसीपी पुणे विषय: प्रस्यासकीय अधिकाऱ्यांच्या जबाबदार्या वक्ते तुषार ठोम्बरे अप्पर जिल्हाधिकारी ,दिलीप पालवे निवृत्त कार्यकारी अभिंयत समारोप सोहळा : सांयकाळी ५ते७या वेळेत घेण्याचे नियोजन केले आहे.प्रस्तावनेचे भाषण संस्थापक अध्यक्ष डॉ अभिमन्यु टकले हे करतील. ठराव ही मांडतील व त्याच्या प्रती उपस्थित लोक प्रतिनिधी यांना देतील. स्वागत अध्यक्ष संजय,शिंगाडे सर यांचे भाषण होईल. उपस्थित सर्व क्षेत्रातील मान्यवर सत्कार ,स्वागत सोहळा होईल. मनोगत व्यक्त करतील. पुरस्कार वितरण सोहळा होईल व साहित्य संमेलन अध्यक्ष समारोप भाषण होईल. समारोप सोहळा प्रमुख पाहुणे यांचे भाषण झाले की आभार प्रदर्शन होईल. कार्यक्रम सांगता होईल. प्रमुख उपस्थिती मध्ये. श्री संजय सोनवणी लेखक, इतिहास संशोधक, पटकथा लेखक पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर मालिका व अध्यक्ष पहिले धनगर साहित्यसंमेलन सोलापूर. अध्यक्ष. मा. मुरहरी केळे साहेब संत साहित्य लेखक, व संचालक विद्युत वितरण महाराष्ट्र शासन व तिसरे साहित्य संमेलन म्हसवड अध्यक्ष. डाॅ.अरूण गावडे,मा.आण्णासाहेब डांगे माजी मंत्री, मा.राम शिंदे माजी मंत्री व उपाध्यक्ष भाजप, मा.आमदार रामराव वडकुते, मा.आमदार हरिदास भदे, आमदार गोपीचंद पडळकर, मा.शरदश्चंद्र पवार साहेब अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस. श्री दत्तात्रय भरणे पालकमंत्री सोलापूर. प्रणिती ताई शिंदे आमदार सोलापूर. स्थानिक सर्व आमदार, खासदार. नगराध्यक्ष, महापौर सोलापूर, जिल्हा परिषद अध्यक्ष. साहित्य संमेलन तयारी जोरदार चालू आहे.हे व्यासपीठ सर्व क्षेत्रातील, जाती धर्मातील सन्माननीय मान्यवर यांच्या साठी सदैव खुले राहील. तरी राज्यातील सर्व क्षेत्रातील सन्माननीय मान्यवर यांनी उपस्थित रहाण्याचे आवाहन संयोजन समिती मार्फत करत आहोत.

संयोजन समिती.. आपले विनीत:प्रा.डॉ. अभिमन्यु टकले संस्थापक धनगर साहित्य संमेलन, धनगर धर्म पीठ महाराष्ट्र राज्य.
श्री ज्ञानेश्वर ढोमणे आमरावती. श्री धनराज खडसे नागपूर.
श्री खुशाल तांबडे नागपूर. श्री शिवकुमार आवाजे नागपूर.

READ MORE
Blog

आदरणीय श्री अभिमन्यू टकले सर, लाख बोलक्या हुनी थोर एकची असे कर्तबगार, धनगर धर्म पीठचे संस्थापक

दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती अशी, शांत मनोवृत्ती धनगर समाजाच्या हितासाठी कार्यरत असलेले, अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन, तिन्ही लोकी कर्तव्यशिलता निती नियमता,
अति शुध्द हो आचार से तन मन हमारा सर्वदा, अध्यात्मकी शक्ति हमे पलभी नही करदे जुदा, अशा महामानव संत वृतिचा जन्म दिन साजरा होत आहे करीता त्यांना उदंड आयुष्य मिळो निरोगी आरोग्य सुख समृध्दी आनंद सदैव मिळो त्यांनी घेतलेला वसा परिपूर्ण करण्या करीता त्यांना शक्ती युक्ती बुद्धी देवुन साह्य व्हाव अशी संपुर्ण देवी देवतांना प्रार्थना करतो 🙏🏽
आणि वाढदिवसाच्या मनपूर्वक यवतमाळ जिल्ह्यातील सर्व धनगर समाजाच्या वतीने व अखिल भारतीय श्रीगुरूदेव सेवा आश्रम गुरुकुंज मोझरी याच्या वतीने जिवन प्रचारक गुरुकुंज मोझरी याच्या वतीने त्यांना सहकुटुंब सहित

🌾हार्दिक 🌷हार्दिक 🌾
शुभेच्छा देत आहे।
शुभेच्छुक रमेश कचरे
फुबगांव।
धनगर धर्म पीठ यवतमाळ जिल्हा अध्यक्ष

READ MORE
Blog

स्वर्गीय मा.आमदार गणपतराव देशमुख स्मरणार्थ आदिवासी धनगर साहित्य संमेलन सांगोला

मा.नितीनजी गडकरी साहेब केंद्रीय वाहतूक व अवजड उद्योग मंत्री यांच्या कार्यालयास सकारात्मक भेट

नागपूर शुक्रवार दि.१४/५/२०२२

रविवार दिनांक १/५/२०२२ रोजी मा.अध्यक्ष व स्वागताध्यक्ष स्वर्गीय मा.आमदार गणपतराव देशमुख स्मरणार्थ चौथे आदिवासी धनगर साहित्य संमेलन सांगोला महाराष्ट्र राज्य श्री आर एस चोपडेसर व शिंगाडे सर यांनी श्री नितीन जी गडकरी साहेब यांनी साहित्य संमेलन उद्घाटनास आले पाहीजेत व समारोपास श्री शरद पवार साहेब यावेत अशी जमातीची इच्छा असल्याचे मत व्यक्त केले होते. त्या अनुषंगाने शुक्रवार दिनांक १४/०५/२०२२ रोजी मा.नितीन जी गडकरी यांच्या कार्यालयास भेट दिली.त्यांचे स्विय सहाय्यक श्री अतुलजी मंडलेकर यांच्याशी श्री प्रकाश मकासरे सर यांनी फोन वर समन्वय साधला.नतंर प्रत्यक्ष भेट घेतली व सकारात्मक चर्चा झाली. लवकरच मा. शिक्षक आमदार श्री नागो गाणार नागपूर, माजी आमदार मा.श्री रामराव वडकुते भाजप जिल्हाध्यक्ष हिंगोली वाशीम. मा.आर एस चोपडेसर अध्यक्ष सांगली, श्री संजय शिंगाडे सर स्वागताध्यक्ष सांगोला,श्री बाळासाहेब कर्णवर पाटील व्हा.चेरमन श्री श्री सदगुरू साखर कारखाना राजेवाडी.

श्री ज्ञानेश्वर ढोमणे सर आमरावती

श्री धनराज खडसे सर साहित्यिक व कवी. सर्व शिष्टमंडळ मा नितीनजी गडकरी साहेब केंद्रीय मंत्री यांची भेट घेऊन त्यांना आदिवासी धनगर साहित्य संमेलनाचे उद्घाटन साठी निमंत्रण देणार आहे. वेळ मिळाल्यानंतर लवकरच मजाहीर करण्यात येईल.

संस्थापक अध्यक्ष आदिवासीं धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य धनगर धर्म पीठ महाराष्ट्र राज्य

READ MORE