Blog

देवी अहिल्याबाई होळकर शिक्षण संस्थेचा शानदार हिरक महोत्सव समारोप सांगली येथे संपन्न.

प्राचार्य डाॅ अभिमन्यु टकले.
संस्थापक:आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य.
संस्थापक:धनगर धर्म पीठ महाराष्ट्र राज्य.
————————-‐—

मा.आमदार बॅरिस्टर टि.के.शेंडगे एक दुष्काळी भागातील नेतृत्व. साठ वर्षांपूवी पेड येथे देवी अहिल्याबाई होळकर शिक्षण संस्था स्थापन केली. प्राचार्य आर एस चोपडे सर यांनी अध्यक्ष पदाची धुरा खांद्यावर घेतली आणि बॅरिस्टर टिके शेंडगे यांनी लावलेल्या रोपट्याचे रुपांतर वटवृक्षात केले. जमिनी दानपत्र घेऊन, वर्गंन्या गोळा करून २८ शासकीय अनुदानीत शाळा काॅलेज,वस्ती ग्रह उभा केली, खाजगी युनीटसही उभा केली. या साठी साठ वर्षांचे अथक परिश्रम,अथक अर्थिक खर्च, अथक कष्ट करून कमावलेल्या जमिनी शेतकऱ्यांनी दान दिल्या. या मुळे दुष्काळी भागातील अनेक विद्यार्थी अनेक क्षेत्रात कार्यरत आहेत. हे या संस्थेचे यश आहे. सांगली, सातारा, सोलापूर हे या संस्थेचे कार्य क्षेत्र. या संस्थेमार्फत विविध कार्यक्रम राबवून वर्षे भर हिरक महोत्सवी कार्यक्रम आयोजित करण्यात आले. प्राचार्य आर एस चोपडे सर एक शिक्षण, साहित्य,सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात काम करणारे प्रमाणीक व्यक्तीमत्व. प्राचार्य आर एस चोपडे सर यांची आपण ४थे आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य पदी २०१९ ला निवड केली. आजही ते आपल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून ही त्यांनी उत्कृष्ट कार्य केले आहे.

या संस्थेला महाराष्ट्र शासनाने उत्कृष्ट संस्था म्हणून गौरवले आहे.

या संस्थेच्या हिरक महोत्सवी समारोपास मला निमंत्रित केले होते. या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री येणार होते. पण सरकार चे प्रतिनिधी म्हणून श्री सुरेश खाडे कामगार मंत्री व सांगलीचे पालक मंत्री कार्यक्रमास उपस्थित होते.

तसेच श्रीमती सुमनताई पाटील आमदार तासगाव या उपस्थित होत्या. आमदार श्री गोपीचंद पडळकर विधान परिषद सदस्य उपस्थित होते.

कार्यक्रमाचे अध्यक्ष वैभव नाईकवडी हे हुतात्मा किसन आहिर साखर कारखान्याचे अध्यक्ष होते. सातारा अप्पर जिल्हाधीकारी लेंगरे साहेब उपस्थित होते. प्रसिद्ध नेत्र तज्ञ डाॅ.दिलीप पटवर्धन उपस्थित होते.

मा. नगरसेवक विठ्ठल खोत उपस्थित होते. श्री बाळासाहेब कर्णवर पाटील उपाध्यक्ष श्री श्री सदगुरु साखर कारखाना हे उपस्थित होते. संस्थेचे सर्व पदाधिकारी, कर्मचारी, शिक्षक वृदं उपस्थित होते.संस्थे तर्फे आमचा मान्यवरांचे स्वागत व सत्कार करण्यात आला. आम्हाला आमचे थोडक्यात मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली.काही मान्यवरांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. सोहळा अगदी देखणा आणि शिस्त बध्द होता.

संस्थेचे धन्यवाद व संस्थेला हार्दिक हार्दिक शुभेच्छां.

READ MORE
Blog

संजय सोनवणी प्राख्यात लेखक व ईतिहास संशोधक यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा

संजय सोनवणी ईतिहास संशोधक. प्राख्यात लेखक, महाराष्ट्र राज्यातील एक विचारवंत. ७/८जानेवारी २०१७ रोजी पहिले आदिवासी धनगर साहित्य संमेलन सोलापूर महाराष्ट्र राज्य या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व मार्गदर्शक. सर्व जाती धर्माच्या भिंती बाजूला
सारून सोनवनी यांनी महाराष्ट्र राज्य आणि भारतातील सांस्कृतिक चळवळीचे मार्गदर्शन सुरु ठेवले आहे.

महाराष्ट्र, जळगाव जिल्ह्यात संजय सोनवणींचा जन्म श्री. देविदास सोनवणी आणि सौ. इंदुमती सोनवणी या दांपत्याच्या घरी झाला. वडील श्री देविदास सोनवणी हे प्राथमिक शिक्षक होते. त्यांनी राजगुरुगर येथील हुतात्मा राजगुरू महाविद्यालयातून बी. कॉम ही पदवी मिळवली. पुढील शिक्षणासाठी ते पुण्यात आले. येथे त्यांनी एम.कॉम ही पदवी प्राप्त केली. गडचिरोलीसारख्या आदिवासी आणि नक्षलवादाने ग्रस्त भागात त्यांनी काही काळ धातु-भुकटी कारखाना चालविला. अवघ्या पाच हजार रुपयांच्या भांडवलावर त्यांनी सुरुवात केली होती. त्यांनी लेह (लडाख) येथेही फळप्रक्रिया उद्योग उभारण्याचा प्रयत्नव केला. पुष्प प्रकाशन लि. या संस्थेमार्फत त्यांनी ८५०पेक्षा अधिक पुस्तके प्रसिद्ध केली.
साहित्य प्रवास

सोनवणींनी ११ वर्षांचे असताना “फितुरी” हे नाटक लिहिले. वयाच्या १६ व्या वर्षी त्यांनी लिहिलेली पहिली बालकादंबरी (नरभक्षकांच्या बेटावर) मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केली. महाराष्ट्र राज्य शासनाच्या अनुदानाने त्यांचा पहिला कवितासंग्रह “प्रवासी” प्रसिद्ध झाला. सव्यसाची, मृत्युरेखा, रक्त हिटलरचे, बीजिंगच्या वाटेवर, क्लिओपात्रा इ. त्यांच्या कादंबर्याफ इंग्रजीत अनुवादित झाल्या. भारतातील स्वतंत्र प्रज्ञेचे ते पहिला थरार कादंबरीकार मानले जातात. त्यांने एकून २८ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय थरार कादंब-या लिहिलेल्या असून “On the Brink of the Death” ही इंग्रजीतील थरार कादंबरी जगभर गाजलेली आहे. कल्की, शून्य महाभारत, कुशाण, ओडीसी आणि यशोवर्मन या त्यांच्या तत्त्वचिंतनात्मक कादंबर्याी आहेत. कुशाणचा अनुवाद इंग्रजीत “Last of the wanderers” या नावाने आणि यशोवर्मनचा “The Jungle” या नावाने प्रसिद्ध झाला. त्यांची राणी शीबाला केंद्रीभूत धरून लिहिलेली “The Awakening” ही इंग्रजी कादंबरी प्रसिद्ध आहे. या कादंबरीचा मराठी अनुवादही आहे. त्यांच्या “पर्जन्य सूक्त” या काव्याचा इंग्रजीत अनुवाद झाला आणि त्यातील निवडक ८ कवितांना संगीतबद्ध करून त्याची ध्वनिफीतही प्रसिद्ध झाली. त्यांची “असुरवेद” ही गाजलेली सांस्कृतिक थरारकथाही आहे. त्यांची “…आणि पानिपत” ही कादंबरी सर्वावधिक गाजली. ही मराठीतील पहिली subaltern कादंबरी आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनातून लिहिलेला त्यांचा नीतिशास्त्र हा नैतिक समस्यांबद्दलचा चिंतनपर ग्रंथ प्रसिद्ध आहे. त्यांनी अनेक नाटकेही लिहिली. त्यातील काहींचे प्रयोगही झाले. अलीकडेच त्यांची “तृतीय नेत्र” ही कादंबरीही प्रकाशित झाली असून “भाषेचं मूळ” या पुस्तकातून त्यांनी भाषनिर्मितीचा प्रश्न सोडवत प्राकृत भाषाच मूळ कशा आहेत हे सिद्ध करून दाखवले आहे. महाराजा यशवंतराव होळकर यांचे मराठी व इंग्रजी भाषेतील चरित्र ही त्यांची महत्वाचे निर्मिती मानली जाते.
संजय सोनवणी यांनी विश्वनिर्मितीबाबतचा स्वतंत्र सिद्धान्त “अवकाशताण सिद्धान्त आणि विश्वनिर्मिती” नामक पुस्तकात मांडला आहे.

सोनवणी यांनी धर्मेतिहासावर “हिंदू धर्माचे शैव रहस्य” आणि “विठ्ठलाचा नवा शोध” हे ग्रंथ सिद्ध केले.

संशोधन
सोनवणी यांनी धर्मेतिहासावर “हिंदू धर्माचे शैव रहस्य” आणि “विठ्ठलाचा नवा शोध” हे ग्रंथ सिद्ध केले. त्यांचा “महार कोण होते?” हा महार समाजाचा पुरातन इतिहास उलगडून दाखवणारा महत्त्वाचा ग्रंथ प्रकाशित झाला आहे.
धनगरांचा गौरवशाली इतिहास हा त्यांचा एक महत्वाचा ग्रंथ असून महाराजा यशवंतराव होळकर यांच्या क्रांतीकारी जीवनावर प्रकाश टाकणारा “भारतीय स्वातंत्र्याचे आद्य प्रणेते महाराजा यशवंतराव होळकर” हा ग्रंथ सर्वाधिक लोकप्रिय आहे. त्यांनी इंग्रजीतही “Unsung Hero of India- Maharaja Yashavantrao Holkar” हा ग्रंथ लिहिला आहे. जगभरच्या अभ्यासकांने त्याचे स्वागत केले आहे.

वाघ्याचे सत्य हे रायगडावरील वाघ्याची सत्यस्थिती मांडणारी पुस्तिकाही प्रसिद्ध असून जेंव्हा वाघ्याबद्दल विवाद निर्माण करण्यात येऊन तो पुतळा उखडून फेकण्यात आला तेंव्हा सोनवणी यांनी उपोषणाचे हत्यार उपसले होते. त्यांना महाराष्ट्रातील आम जनतेने पाठींबा दिल्याने वाघ्याची पुनर्स्थापना झाली.

धनगर आरक्षण, त्यांचे आदिवासी असण्याचे वास्तव यावर महत्वाच्या वृत्तपत्रे-मासिके यात असंख्य लेख लिहिले तर वाहिन्यांवरून धनगर आरक्षणाबाबत झालेल्या चर्चांमध्ये सहभाग घेऊन धनगर समाजाची बाजू मांडली. धनगर आरक्षणासाठी पुणे येथे भर पावसात उपोशनही केले.

२०११ साली महाराजा यशवंतराव होळकर यांचे वाफगाव येथील जन्मस्थळ शोधून तेथे त्यांची जयंती साजरी करण्याची प्रथा सुरु केली तसेच वाफगाव येथील हे जन्मस्थान राष्ट्राय संरक्षित स्मारक व्य्हावे अशी मागणीही २०१२ सालापासून सुरु केली.थोरले सुभेदार मल्हारराव होळकर यांचे अत्रे यांनी १८९३ साली प्रसिद्ध केलेल्या चरित्राचे संपादनही त्यांनी केले.

ते पहिल्या आदिवासी धनगर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले होते.

धनगर समाजाच्या आराध्यांविषयी जेंव्हाही कोणा लेखकाने, राजकीय नेत्याने चुकीचे आरोप केले त्यावेळीस त्यांनी त्यांचा समाचार घेतला आहे.

सध्या सोनी वाहिनीवर रोज प्रसिद्ध होणा-या “पुण्यश्लोक अहिल्या” या मालिकेचे इतिहास संशोधक म्हणून ते काम पाहत आहेत. ही मालिका त्यांच्या प्रयत्नांमुळेच सुरु होऊ शकली व ती मालिका आज देशभर लोकप्रिय आहे.

वैदिक धर्म-संस्कृतीचे उगमस्था्न या विषयावरचे Origins of the Vedic Religion and Indus-Ghuggar Civilisation हा सोनावणी यांचा ग्रंथ २०१५ साली प्रकाशित झाला. सोनवणी यांनी लोहभुकटी निर्मितीचा, संगणकप्रणाली व सेंट्रीफ्युगल पंखे निर्मितीचेही उद्योग उभारले होते व ते लोहभुकटी तंत्रज्ञानातील देशातील नामवंत तज्ञ मानले जातात.

सोनवणी यांची आजवर मराठी व इंग्रजी अशी एकुण ११७ पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. ते संगीतकार, अभिनेते व चित्रपट दिग्दर्शकही आहेत.

स्वर्गीय हरी नरकेजी यांच्या सारखा विचारवंत सहकारी तारा निखळला याचे दुख त्यांना व आपल्या सर्वांनाच आहे.

संजय जी सोनवणी यांना शतकी दीर्घायुष्य लाभो हीच वाढदिवसानिमित्त हार्दिक, हार्दिक शुभेच्छा.
संजय सोनवणी फोन नंबर 9860991205
लेखक:
प्राचार्य डाॅ.अभिमन्यु टकले .
संस्थापक अध्यक्ष
आदिवीसी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य .

READ MORE
Blog

के चंद्रशेखर राव मुख्यमंत्री तेलंगणा अध्यक्ष बि आर एस यांची हैद्राबाद येथे भेट आणि चर्चा.

हैद्राबाद शनिवार दिनांक 29/7/2023 रोजी सायंकाळी मा.मुख्यमंत्री तेलंगणा यांची नियोजित भेट घेतली.समाजाला योग्य प्रतिनिधित्व मिळावे व यशस्वी मुख्यमंत्र्यांकडून यशाचे गमक जानूंन घेण्यासाठी भेट घेतली.एप्रील ,मे मध्ये बि आर एस चे इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मिडियात बरेच वारे सुटले होते. मे महिन्यात अनेक बिआर एस च्या नेत्यांना मुख्यमंत्री के सी आर यांची भेट घेण्यासाठी विचारणा केली होती परंतु आमचे म्हणणे हैदराबाद पर्यंत कोणीही पोहोचवले नाही. बाळासाहेब कर्णवर पाटील यांनी मुख्यमंत्र्यांची वेळ घेतली आणि आम्हाला माननीय मुख्यमंत्री यांनी चर्चेसाठी तीन तासाची वेळ दिली. यामध्ये त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणावर प्रकाश टाकत तीन तास विविध विषयावरती चर्चा केली. महाराष्ट्र राज्यामध्ये संभ्रमाचे राजकारण असल्यामुळे सर्व पक्षातील नेते व महाराष्ट्र राज्यातील जनता राजकीय संभ्रमात असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी चर्चा केलेले विषय खालील प्रमाणे आहेत.

१) पहिली चर्चा महाराष्ट्र राज्यातील शेतकरी आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या यावरती चर्चा केली.

२) महाराष्ट्र राज्य आजही 75 वर्षानंतर जनतेला पिण्यासाठी पाणी देऊ शकलेले नाही आणि शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी वीज देऊ शकले नाही याबद्दल खंत व्यक्त केली.

३) त्यांनी महाराष्ट्र राज्यात खूप मोठ्या प्रमाणात जवळजवळ दीड दोन कोटी धनगर समाज असून त्यांना कोणीही राजकीय न्याय दिला नसल्याबद्दल बोलले.

धनगर समाज राजकीय दृष्ट्या आर्थिक दृष्ट्या शैक्षणिक दृष्ट्या मागास असून त्यांचे प्रबोधन होणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

मी त्यांना सांगितले की आम्ही दरवर्षी साहित्य संमेलना मार्फत महाराष्ट्र राज्यातील बौद्धिक धनगर समाजाकडून आणि इतर सर्व जाती धर्माच्या समाजाकडून धनगर समाजाचे दोन-तीन दिवस प्रबोधन करत असतो. आणि महाराष्ट्र राज्यात त्याला चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळत असल्याचेही सांगितले. आदिवासी धनगर साहित्य संमेलनामुळे महाराष्ट्र राज्यातील धनगर समाजामध्ये सामाजिक, राजकीय इतिहास याबद्दल चांगली जनजागृती झालेली आहे व होत आहे असे आम्ही सांगितले. पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले महाराष्ट्रातील धनगर समाजाने इतर समाजाला बरोबर घेऊन एकत्रितपणे निवडणूक लढल्यास महाराष्ट्र राज्याचे राजकीय समीकरण बदलल्याशिवाय राहणार नाही.
बी आर एस पार्टीमध्ये धनगर समाजाला चांगल्या प्रकारे प्रतिनिधित्व देण्यात यावे अशा प्रकारची भूमिका आम्ही मुख्यमंत्र्यांकडे मांडली. धनगर समाजाच्या महाराष्ट्र राज्यातील वेगवेगळ्या समस्या वरती अर्धा तास चर्चा करण्यात आली त्यामध्ये धनगर समाजाच्या आरक्षणाची झालेली फसवणूक तसेच धनगर समाजाला आतापर्यंत निवडणूक अजिंडा मध्ये आश्वासने देऊन केलेली फसवणूक यावरती ही चर्चा झाली. तसेच महाराष्ट्र राज्यातील मेंढी पालन व मेंढपाळांचे प्रश्न यावरती ही चर्चा झाली.
महाराष्ट्र राज्यातील धनगर समाजाने भाजप व राष्ट्रवादी ला मोठ्या प्रमाणात मदत केल्याचं सांगितलं.

४) तसेच महाराष्ट्र राज्यातील प्राथमिक शिक्षण, महाराष्ट्र राज्यातील आरोग्य सेवा, महाराष्ट्र राज्यातील शैक्षणिक धोरण, महाराष्ट्र राज्यातील भ्रष्टाचार, महाराष्ट्र राज्यातील गौण खनिज वाटप, महाराष्ट्र राज्यातील मागासवर्गीय घटकांना नसलेला प्रतिनिधित्व,
महाराष्ट्र राज्यातील युवकांची बेकारी.महाराष्ट्र राज्यातील राजकारण्यांना जनतेचा काहीही देणे घेणे नाही. महाराष्ट्र राज्यातील सर्व पक्षांचे राजकारण हे फक्त सत्तेसाठी चालले आहे. सत्ताधारी कोण आणि विरोधक कोण हे महाराष्ट्रातील जनतेला समजायला तयार नसून महाराष्ट्रातील जनता पूर्णपणे संभ्रमात आहे. महाराष्ट्र राज्याची राजकीय नाचक्की पूर्ण देशात झालेली आहे असे ते म्हणाले.

तीन तासांची चर्चा झाली.
महाराष्ट्र राज्यातील विविध भागातील ४२ प्रतिनिधी उपस्थित होते.गुलाबी पट्टी घालून सर्वांचाच सत्कार करण्यात आला.

आम्ही कोणत्याही प्रकारचे बिआर एस पार्टीचे सदस्यत्व स्वीकारलेले नाही.योग्य प्रतिनिधित्व मिळाल्या स नक्कीच समाज विचार करेल.या ठिकाणी श्री बाळासाहेब कर्णवर पाटील,श्री अर्जुन दादा सलगर, श्री सुजित कोकरे,श्री क्रुष्णा बुरुंगुले,सौरभ टकले,आदी बेचाळीस मान्यवर उपस्थित होते.

मी कोणत्याही राजकीय लाभासाठी उत्सुक नसून जो राजकीय पक्ष सर्व समाजाला योग्य भागीदारी देतील त्या पार्टीच्या मागे भक्कम उभा रहावू हाच उद्देश.
समाजातील अनेक मान्यवरांनी विचार लेल्या प्रश्नाचे उत्तर दिले आहे.

डॉ अभिमन्यू टकले.
संस्थांपक आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य.

READ MORE
Blog

श्री गुलाबराव बागल सर माजी मुख्याध्यापक व सचिव कर्मवीर आण्णासाहेब हायस्कूल ता. करमाळा जि. सोलापूर यांचा आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य मार्फत सत्कार.

रविवार:दिनांक:२३|०७| २०२३ रोजी साहित्य संमेलना निमित्त मा. गुलाबराव बागल सर माजी मुख्याध्यापक व कर्मवीर आण्णासाहेब जगताप हायस्कूल, शिक्षण संस्थेचे सचिव यांची त्यांच्या घरी जाऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
या वेळी श्री किसन कांबळे मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे अध्यक्ष, श्री अंगद देवकते रासप तालुकाध्यक्ष, बाळासाहेब टकले आदि मान्यवर उपस्थित होते.

श्री गुलाबराव बागल सर हे मांगी या गावचे एक बौद्धीक व्यक्तीमत्व व शेतकरी सुपुत्र. ते १९७५ साली मुख्याध्यापक झाले होते. करमाळा तालुक्यात त्या वेळेस फक्त दोन हायस्कूल व आर्ट काॅमर्स चे एक काॅलेज होते. त्यावेळेस हा तालुका दुष्काळग्रस्त व अशिक्षित होता. अशा परिस्थितीत गुलाबराव बागल सरांनी शिक्षण व क्रिडा क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करून हायस्कूल चे नाव जिल्हा स्तरावर व राज्यात उंचावन्याचे काम केले होते.

महाराष्ट्र राज्यात अनेक शासकीय अधिकारी कर्मचारी झाले त्याचां पाया मजबूत करण्याचे काम बागल सर यांनी केले. माजी मंत्री स्वर्गीय दिगंबररावजी बागल यांना शून्यातून राजकीय द्रुष्टया उभे करन्याचे काम, श्री विलासराव घुमरे सर व श्री गुलाबराव बागल सर यांचे खूप मोठे योगदान आहेत.

स्वर्गीय दिगंबरजी बागल मामा हे जनसामान्यांचे प्रतिनिधी होते.मी आजपर्यंत करमाळा तालुक्यातील आमदार म्हणून फक्त मामांनाच भेटलेलो. बागल सरांनी अनेक क्षेत्रातील नेतृत्व निर्माण केले आहेत.म्हणून आम्ही त्यांचा घरी जाऊन सत्कार केला.

———————
प्राचार्य डाॅ अभिमन्यु टकले.
संस्थापक आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य.
———————

या नंतर आम्ही ईजिंनियर प्रकाश कोळेकर यांना भेटलो करमाळा, कर्जत, जामखेड, या तालुक्यात कोळेकर यांचा खूप मोठा जनसंपर्क आहे. शासकीय सेवे बरोबर त्यांचे सामाजिक कार्य खूप मोठे आहे.
बागल सर आणि कोळेकर साहेब यांच्याबरोबर शैक्षणिक, सामाजिक, साहित्य, सांस्कृतिक क्षेत्रात झालेले बदल व जुन्या आठवणींना उजाळा दिला. ऐतिहासिक पाचवे आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य हे करमाळा येथे घ्यावे या साठी शिवाजी बंडगर सर सभापती बाजार समिती करमाळा,ईजिंनियर प्रकाश कोळेकर सर, अंगद देवकते, बाळासाहेब टकले, शंकर सुळ,जगन्नाथ सलगर यांनी मागणी केली होती. या साठी श्री गुलाबराव बागल सर व प्रकाश कोळेकर सर यांच्या बरोबर प्रथम चर्चा करण्यात आली. या वयातही

त्यांनी योग्य ते सहकार्य करन्याचे अश्वासन दिले. करमाळा तालुका ही माझी जन्म व गुरू भुमी. या भूमीचे आपण ॠण फेडू शकत नाही पण राज्यातील मान्यवरांसह यांचा सन्मान करून साहित्य संमेलनात यांचा सन्मान करू शकतो. या संमेलनाचे नाव आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य हे असले तरी या संमेलनात कधीही राजकारण, जात,धर्म, प्रांत, असा भेद करण्यात येत नाही. राज्य ,राष्ट्रीय स्तरावरील सर्व उपेक्षित घटकाला स्टेज दिले जाते.करमाळा पासून पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे जन्मगाव चौंडी हे पंधरा वीस किलोमीटर अंतरावर आहे तेथे मा.श्री आण्णासाहेब डांगे माजी मंत्री,संत साहित्याचे अभ्यासक यांची भेट झाली.मागील सर्व साहित्य संमेलनाची चर्चा केली.पाचवे साहित्य संमेलन चौंडी येथून जाहीर करावे असे ठरले. लवकरच मा.अध्यक्ष प्राचार्य आर एस चोपडे सर सांगली,, सचिव ज्ञानेश्वर ढोमणे सर आमरावती, उपाध्यक्ष श्री संभाजीराव सुळ लातूर ,श्री बाळासाहेब कर्णवर पाटील उपाध्यक्ष श्री सदगुरू साखर कारखाना राजेवाडी,श्री संजय शिंगाडे सर सांगोला टीम, श्री सजगणे विठ्ठल सर सातारा,श्री छगनशेठ पाटील ठाणे.उद्योजक, श्री बाळासाहेब पाटील पोलीस अधीक्षक पालघर, श्री सोमनाथ कर्णवर पाटील एपीआय ठाणे.श्री अर्जुन सलगर सोलापूर, डाॅ. यशपाल भिंगे नांदेड, संजय सोनवणी लेखक संशोधक पुणे, श्री चंद्रकांत हजारे प्रवकते अंबाजोगाई बीड व राज्यातील सर्व मान्यवरांसमवेत चर्चा करून साहित्य संमेलनाचे स्थळ व वेळ जाहीर केली जाईल. संमेलन चौंडी येथून जाहीर करण्यात येईल.

READ MORE
Blog

धनगर धर्म पीठ आयोजित विदर्भ स्तरीय संत वारकरी परिषद सिंदखेड जि आकोला. दि.२५|१२|२०२२

धनगर धर्मपीठ आयोजित, द्रौपदाबाई काळदाते.
विदर्भस्तरीय संत वारकरी परिषद उत्साहात यशस्वी.
सिंदखेड जि.आकोला.
रविवार दिनांक:२५|०५|२०२२ .

ऐतिहासिक पहिली विदर्भस्तरीय संत वारकरी परिषद धनगर धर्मपीठ मार्फत आयोजित करण्यात आली होती. पण राज्य भरातून अनेक हभप मान्यवरांसह सर्व क्षेत्रातील मंडळी उपस्थित होती. कार्यक्रम साध्या पध्दतीने करायचा ठरवला होता पण कार्यक्रम राज्यस्तरीय स्वरूपाचा झाला. उत्साहात यशस्वी झाला.सिंदखेड गावालगत मोर्ना नदिच्या काठावर निसर्ग रम्य टेकडीवर मोठा महादेव मंदिर आहे.. रविवार दिनांक २५|५|२०२२ ला सकाळी मंडप स्टेज साउंड सिस्टीम सकाळी दहापर्यंत अगदी साधारण पणे उभा केली. डाॅ अभिमन्यू टकले संस्थापक अध्यक्ष धनगर धर्मपीठ संस्था महाराष्ट्र राज्य व विनायकराव काळदाते कार्याध्यक्ष लक्ष ठेवून होते.मा.आमदार हरिदास भदे साहेब बसून होते. श्री संत बाळूमामा नगरी हे स्थळाला नाव दिले. जगदगुरू श्री संत तुकाराम महाराज हे विचार पीठाला नाव देण्यात आले. नवलकर महाराज यांनी सिंदखेड गावातील हभप मंडळ व टाळकरी जथा घेऊन आले. लोकांची आवक सुरू झाली .सर्व संताच्या प्रतीमेचे पुजन मा.आमदार हरिदास भदे,श्री विनायकराव काळदाते. डाॅ अभिमन्यु टकले संस्थापकअध्यक्ष धनगर धर्म पीठ संस्था महाराष्ट्र राज्य, श्री व्यंकटेश चामनर सर आंबेजोगाई, श्री संभाजीराव सुळ लातूर, यांनी प्रतीमा पुजन केले श्री प्रभाकर दिवनाले अध्यक्ष, श्री ज्ञानेश्वर ढोमणे संयोजक, सौ शारदाताई ढोमणे धर्मपीठ महिला अध्यक्ष, उपस्थित होते. स्व.द्रौपदाबाई काळदाते यांना सर्व उपस्थितांनी विनम्र अभिवादन केले. मान्यवरांनी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे रितसर उदघाटन केले.
सिंदखेड येथिल हरिपाठ करणारे लहान मुले यांनी संताच्या भूमिकेत अभंग सादर केले. स्वागताध्यक्ष हभप श्री नंदकिशोर कोल्हे महाराज व हभप श्री प्रल्हाद महाराज कळंब यांची विविध विषयांवर प्रवचन व प्रबोधन केले.

सर्व क्षेत्रातील मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. संत आणि देव यांना जात धर्म नसतो त्यामुळे धनगर धर्मपीठ मार्फत विदर्भस्तरीय सर्व हभप संत महाराज प्रवचनकार व प्रबोधनकार यांना महाराष्ट्र राज्यातील विविध संताच्या स्मरणार्थ पुरस्कार देण्यात आले.– हभप श्री प्रभाकर महाराज दिवनाले यांना श्री संत गाडगे महाराज पुरस्कार प्रदान करण्यात आला.
-हभप श्री प्रल्हाद महाराज कळंब यांना श्री संत एकनाथ महाराज पुरस्कार देण्यात आला.
-हभप नंदकिशोर महाराज कोल्हे श्री संत नामदेव महाराज पुरस्कार.
-ह.भ.प. मनोहर महाराज डुकरे यांना श्री संत सेना महाराज पुरस्कार.
-ह.भ.प. सुभाष महाराज काळे श्री संत गोरोबा महाराज कुभांर पुरस्कार.
-ह.भ.प. डॉ.कल्याणीताई पदमने यांना श्री संत जनाबाई पुरस्कार देण्यात आला.
-ह.भ.प. संगीताताई जोध यांना संत बहिणाबाई पुरस्कार देण्यात आला.
-ह.भ.प. अमोल महाराज बांगर संत भगवान महाराज पुरस्कार देण्यात आला.
-ह.भ.प. संदीप महाराज गि-हे श्री संत भक्त पुंडलीक पुरस्कार देण्यात आला.
-ह.भ.प. अशोक महाराज जायले संत सेवालाल महाराज पुरस्कार देण्यात आला.
-ह भ प श्री दिलीप महाराज भोरे.यानां श्री संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार प्रदान करण्यात आला.
श्री रामराव महाराज घोडसकर यांना संत तुकडोजी महाराज पुरस्कार.
ह.भ.प. संतोष महाराज घोंगे संत चोखामेळा महाराज पुरस्कार देण्यात आला.
सौ.रेषमाताई ठोबंरे यांना संत मुक्ताबाई पुरस्कार देण्यात आला.धनगर धर्मपीठ आयोजित विदर्भस्तरीय संत वारकरी परिषदेत खालील ठराव पारित करण्यात आले.

१) संत ज्ञानेश्वर महाराज अध्यात्मिक विद्यापीठाची पंढरपूर येथे स्थापना करण्यात यावी.
२) बिगर तांत्रिक विद्यापीठात जगदगुरू संत तुकाराम महाराज अध्यात्मिक अध्यासन सुरू करण्यात यावीत.
३) राज्यतील गोशाळांचे सर्वेक्षण करून चारा व वैद्यकीय अनुदान देण्यात यावे.
४)पुरातत्व विभागाच्या जाचक अटी रद्द करून देवस्थानांचा विकास करावा .
५) २० वर्षा पेक्षा जास्त सेवा दिलेल्या प्रबोधनकार,संत, वारकरी यांना पेन्शन द्या.आयुष्यात एखदा चारधाम साठी यात्रा अनुदान द्यावे.मोफत दुर्धर आजार उपचार मिळावेत. प्रबोधन साहित्य मोफत मिळावे.
६) व्यवस्थापन खर्चा पेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या देवस्थान संस्थानाना सरकारी जमीन देउन जनते साठी सुपरस्पेशालीटी रूग्णालये सुरू करावीत.
७) राज्य व राष्ट्रीय स्तरावर सर्व धर्मा साठी कॅबिनेट दर्जाची एकच परिषद असावी.
८) धार्मिक संत ,प्रवचनकार, प्रबोधन कार यांना कार्यक्रमासाठी अल्पदरात शासकीय संकुल किंवा सभागृह मिळावे.
९)उन्हाळ्यातील सुट्टीत प्राथमिक शाळेत बाल संस्कार शाळा चालवन्याची परवानगी मिळावी.
ठरावा नंतर पुढील राज्य स्तरीय संत वारकरी परिषद घेण्यासाठी, हभप श्री दिलीप महाराज भोरे पुसद यांनी व श्री छगन सेठ पाटील उद्योजक ठाणे यांनी घेण्यास प्रस्ताव दिले आहेत. अशा प्रकारे उत्साहात आणि यशस्वी रित्या पहिली विदर्भ स्तरीय संत वारकरी परिषद झाली.
हभप श्री प्रभाकर महाराज दिवनाले आकोला.
अध्यक्ष. विदर्भ धनगर धर्म पीठ महाराष्ट्र राज्य

READ MORE
Blog

ऐतिहासिक पहिली स्व.द्रौपदाबाई काळदाते विदर्भ स्तरीय वारकरी संत परिषद. रविवार दि.२५|१२|२०२२. सिंदखेड जि.आकोला.

धनगर धर्म पीठ महाराष्ट्र राज्य.
🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️
कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन l मा कर्मफलहेतुरभूर्मा ते संङ्गोस्त्वकर्मणी ll🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯या परिषदेची कार्यकारणी पुढील प्रमाणे असेल.
– हभप श्री प्रभाकर महाराज दिवनाले कार्यक्रम अध्यक्ष.
-हभप श्री प्रल्हाद महाराज कळंब कार्याध्यक्ष.
-हभप नंदकिशोर महाराज कोल्हे स्वागताध्यक्ष.
– श्री ज्ञानेश्वरजी ढोमणे संयोजक.
–श्रीमती शारदाताई ढोमणे महिला आघाडी संयोजक.
श्री विनायकराव काळदाते महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष व यजमान.
🌹खालील मान्यवरांचा
महाराष्ट्र राज्यातील महान संताच्या नावाने प्रमाण पत्र व ट्राफी देऊन धनगर धर्म पीठ मार्फत सन्मान केला जाईल.
-ह.भ.प. मनोहर महाराज डुकरे
-ह.भ.प. सुभाष महाराज काळे.
-ह.भ.प. डॉ.कल्याणीताई पदमने
-ह.भ.प. संगीताताई जोध
-ह.भ.प. अमोल महाराज बांगर
-ह.भ.प. संदीप महाराज गि-हे
-ह.भ.प. अशोक महाराज जायले
-ह भ प श्री दिलीप महाराज भोरे.
-श्री विठ्ठल सजगणे सर.

धनगर धर्मपीठाचे महाराष्ट्र राज्याचे १०० सत्संग घेण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केलेत त्या सर्वांचा व संत वारकरी परीषदे साठी प्रयत्न केलेल्या सहभागी सर्वांचा प्रमाण पत्र देऊन यथोचित सन्मानित केला जाईल.
श्रीमती रेषमाताई ठोंबरे
श्री रामराव महाराज घोडसकर
ह.भ.प. संतोष महाराज घोंगे
प्रमुख अतिथी:
श्री. संभाजीराव सुळ. उपाध्यक्ष धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य.नेते काँग्रेस नेते लातूर.
मा.आमदार हरिदास भदे.
मा.आमदार रामराव वडकुते.
श्री बाळासाहेब कर्णवर पाटील उपाध्यक्ष श्री सद्गुरु साखर कारखाना राजेवाडी.
श्री संजयजी शिंगाडे स्वागताध्यक्ष ४थे धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य.
डाॅ आकुंश नवले. अध्यक्ष भारत जनसंग्राम पक्ष.आमरावती.
श्री बबनराव बरकडे धनगर धर्म पीठ अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र.
श्री पाडुंरगजी रूपनवर सांगली.समाज सेवक,उद्योजक, धनगर साहित्य संमेलन आधार स्तंभ
श्री व्यंकटेश चामनर आंबेजोगाई.
श्री सोमनाथ कर्णवर पाटील एपीआय ठाणे.मुंबई विभागीय अध्यक्ष.
श्री छगन सेठ पाटील उद्योजक ठाणे.
श्री चंद्रकांत हजारे प्रवक्ते धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य.
🌹कार्यक्रम पत्रिका
सकाळी ९ते११.
उदघाटन- स्व.द्रौपदाबाई काळदाते व संताच्या प्रतीमा पुजन.
श्री हरिदासजी भदे व श्री बबनराव बरकडे व सर्व प्रमुख अतिथी.
दिवंगताना आदरांजली.
स्वागत गीत, स्वागत संमारभ. संत पुरस्कार प्रदान कार्यक्रम.
जगदगुरू तुकोबाराय यांचे नाव व्यासपीठास दिले जाईल. संत बाळूमामा हे नगरीला नाव दिले जाईल.
संत ज्ञानेश्वर माऊली
संत मुक्ताबाई ,
श्री संत कनक दास, संत जनाबाई,संत नामदेव महाराज, शांती ब्रम्ह संत एकनाथ महाराज ,संत गोरोबा काका ,संत कान्होपात्रा,संत सेना महाराज,संत चोखामेळा,संत बहिणाबाई,
भक्त पुंडलीक, संत गाडगे महाराज,संत तुकडोजी महाराज ,संत सेवालाल महाराज, संत भगवान महाराज.
यांच्या सन्मानार्थ हभप मान्यवरांना प्रमाण पत्र पुरस्कार दिले जातील.या व्दारे संताच्या कार्याचे स्मरण केले जाईल.
प्रमुखांचे थोडक्यात मनोगत .
-सकाळी ११ते दुपारी ४ विविध विषयांवर संत आणि वारकरी यांचे नेमून दिलेल्या विषयावर
प्रवचन / प्रबोधन.
प्रबोधन व प्रवचन या मध्ये अध्यात्म,धर्म संत परिवार काल, आज आणि उद्या. हे विषय असतील .तसेच गो शाळेचे प्रश्न, धर्म, धर्म शिक्षण, संत वारकरी यांच्या समस्या, या वरती ठराव घेऊन ते शासना कडे पाठपुरावा साठी पाठवले जातील.
दुपारी ४ते४:३० ठराव वाचन आणि समारोप होईल.

READ MORE
Blog

विदर्भस्तरीय वारकरी संत परिषद , सिंदखेड जि. आकोला.रविवार दिनांक २५|१२|२०२२

धनगर धर्मपीठ महाराष्ट्र राज्य .
🌹🌹🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️
काय सांगो आता संतांचे उपकार ।
मज निरंतर जागविती ॥
काय द्यावे त्यांसी व्हावे उतराई ।
ठेविता हा पायी जीव थोड़ा ॥
सहज बोलणे हित उपदेश ।
करुनि सायास शिकविती ॥
तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ती ।तैसे मज येती सांभाळीत ॥
महाराष्ट्र ही संतांची भूमि . येथिल लोकांवर संतांनी आईच्या मायेने प्रेम केले . वेळप्रसंगी त्यांनी स्वतःची अथवा स्वतःच्या कुटुंबाची पर्वा केली नाही . स्वतःवर कितीही अन्याय, अत्याचार झालेत, पदरी दुःरव पडले तरी त्यांनी आपले कार्य अविरतपणे सुरुच ठेवले .
” बुडतां हे जन न देखवे डोळा ।येतो कळवळा म्हणूनिया ॥”
कालबाहय झालेल्या अथवा अनावश्यक जून्या चालीरीती ,प्रथा, अंधश्रध्दा, कर्मकांड या विरुद्ध आपल्या संत साहित्यातून अथवा प्रत्यक्ष मार्गदर्शनातुन जनजागृती केली. संतांना सर्वसामान्याचे दुःरव सहन झालेच नाही. दु:खी पिडीतांचे उद्धाराचाच त्यांनी नेहमी विचार केला.
” जगाच्या कल्याणा संतांच्या विभूति ।देह कष्टविती परउपकारे ॥ ”
संतांचा जन्मच मूळी उपकारासाठी झालेला असतो . सर्वांचे उपकार सांगता येतील परंतु संतांचे उपकार , कृतज्ञता शब्दबध्द करणे शक्यच नाही. त्यांच्या उपकारातून उतराई होणे शक्यच नाही. त्यांच्या पायी जीव ठेवला तरी त्याची किंमत अल्पच आहे. संत हे जीवात्म्याला अविद्येतून , अज्ञानातून , व्यावहारिक झोपेतून जागे करत असतात . अतिजलद गतीने अधोगतीला जाणाऱ्या जीवाच कस होईल याचीच त्यांना नेहमी चिंता असते .
जीवन जगत असतांना प्रत्येक जीवालाआधिभौतिक,आधिदैविक व अध्यात्मिक या त्रिविध तापांना सामोरे जावेच लागते .मनुष्य कोणत्याही जातीधर्माचा, पंथाचा असो त्याचे सांसारिक दुःख हे सारख्याच प्रतिचे असते . आज घरोघरी संत उपलब्ध होत नसले तरी संत साहीत्याच्या माध्यमातून आपल्याला संत नेहमीच मार्गदर्शक ठरत असतात . अपकार करणाऱ्यावर सुध्दा संत उपकारच करत असतात .गाईच्या चित्तामध्ये वासराविषयी जो जिव्हाळा असतो त्या भावनेने संत कष्ट सोसून जीवाचे हीत जोपासतात . देव म्हणजे संत किंवा संत म्हणजे देवच असतात . आपल्याला प्रत्यक्षपणे देव भेटत नसले तरी संतांच्या रुपाने देव या भूतलावर अवतरित होत असतात .
संत साहित्य , संतांचे विचार घराघरात पोचविण्याचे काम वारकरी संप्रदाय अविरतपणे वर्षानुवर्षापासून करित आहे .
डॉ.अभिमन्यु टकले संस्थापक अध्यक्ष यांनी स्थापन केलेल्या धनगर धर्मपीठाला याचा सार्थ अभिमान आहे .उपेक्षितांचा सन्मान व्हावा , नवोदितांना हक्काच व्यासपीठ मिळाव तसेच सर्वसामान्यांना भक्तीचे खरे मर्म कळावे . भगवंत विन्मुखांना भगवंत सन्मुख करणे,त्यांची अध्यात्मिक प्रगती करणे या उद्देशाने स्थापन केलेल्या धनगर धर्मपीठाला राजकारणापासून नेहमीच अलिप्त ठेवण्याचा प्रयत्न केल्या जात आहे .
अल्पप्रमाणात कां होईना संतांच्या उपकारातून उतराई होण्याकरिता तसेच राजकारणापासून नेहमीच अलिप्त असलेल्या वारकरी संप्रदायातील काही सज्जन संतमंडळींना प्रोत्साहित करण्याकरिता या वारकरी संत परिषदेचे रविवार दि. २५ डिसेंबर रोजी स्व. द्रौपदाबाई काळदाते यांचे प्रथम पुण्यस्मरणार्थ सिंदखेड जि. अकोला येथे आयोजन करण्यात येत आहे. या कार्यक्रमात कीर्तनातून प्रबोधन, संताच्या स्मरणार्थ उपस्थित हभप मंडळीचा गौरव करण्यात येणार आहे. सद्यस्थितीत धार्मिक, अध्यात्मिक,संस्कृतीचे,धर्म संस्थाचे ,मठांचे प्रश्न,धर्म शिक्षणाचे प्रश्न, यात्रा जत्रांचे प्रश्न,धर्म साहित्याचे प्रश्न,गोशाळांचे प्रश्न भेडसावत आहेत. यावरती या संत वारकरी परिषदेत ठराव घेऊन राज्य, केंद्र सरकार कडे पाठपूरावा धनगर धर्मपीठ महाराष्ट्र राज्य मार्फत केला जाईल. खरंतर श्री विनायकराव काळदाते यांनी धनगर धर्मपीठ मार्फत दि.१९|१२|२०२२ पर्यंत अखंड आठवडी ९९ ऑनलाईन सत्संग घेत आहेत. दि. २५|०१२| २०२२चा सत्संग हा अखंड १००वा सत्संग आहे. आणि तो त्यांच्या शिवभक्त मातोश्री स्व. द्रौपदाबाई काळदाते यांच्या स्मरणार्थ होत आहे.
सदर कार्यक्रम भव्यदिव्य स्वरूपाचा नसला,मर्यादित स्वरूपाचा असला तरी या मागील भावना व या वारकरी संत परिषदेचा उद्देश महत्वाचा आहे असे मला वाटते .
” तुका म्हणे आता । उरलो उपकारा पुरता ॥
🎻🎻🎻🎻🎻लेखक:
हभप श्री प्रभाकर महाराज दिवनाले. अध्यक्ष
विदर्भस्तरीय वारकरी संत परिषद , धनगर धर्मपीठ महाराष्ट्र राज्य.
धन्यवाद.

READ MORE