Blog

यशवंतराव होळकर : भारताचे तळपते स्वातंत्र्यतेज!

१८०३ सालापासून इंग्रजांशी अथक युद्धे करत त्यांना भारतातून बाहेर हाकलण्यासाठी अविरत युद्धे करत राहिलेले भारतीय स्वातंत्र्याचे आद्य प्रणेते महाराजा यशवंतराव होळकर यांचे नाव सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले आहे. त्यांनी मुकंदरा येथून आग्र्यापर्यंत पाठलाग करत मॉन्सनसारख्या कसलेल्या सैनानीची जी दुर्गती केली त्यामुळे इंग्लंडची पार्लमेंट हादरली. भारताबाबतची सर्व धोरणे त्यांना बदलावी तर लागलीच पण गव्हर्नर जनरल वेलस्लीसारख्या त्या काळात मुत्सद्दी मानल्या जाणा-या धुरंधराचीही हकालपट्टी करावी लागली. भरतपुरच्या युद्धाने तर इंग्रजांचे कंबरडे मोडले. हा सर्व लढा एकाकी राहिला कारण ब्रिटीशांचे मांडलिकत्व पत्करून ऐषारामाची सवय लागलेले भारतीय रजवाडे यशवंतरावांनी वारंवार आपल्या स्वातंत्र्य युद्धात सहभागी व्हा अशी आवाहने करूनही त्यापासून दूर राहिले. त्यामुळे हा लढा एकहाती झाला. पण यशवंतराव जिद्दी होते. भारतीय स्वातंत्र्य हा त्यांचा १८११मध्ये शेवटचा श्वास घेईपर्यंत त्यांचा ध्यास राहिला.

३ डिसेंबर १७७६ रोजी पुणे जिल्ह्यातील वाफगाव येथील किल्ल्यात त्यांचा जन्म झाला. युवावस्थेत ते प्रवेशले तेंव्हापासून त्यांच्यावर संकटांची वादळे कोसळू लागली. महायोद्धे सुभेदार तुकोजीराजे होळकर यांचे ते कनिष्ठ पुत्र. अहिल्यादेवींच्या वत्सल आणि धोरणी सहवासात त्यांची वाढ झाली. पण १७९५मध्ये दुर्दैवाने अहिल्यादेवी गेल्या. पिता तुकोजीराजे होळकर यांचे त्यानंतर अवघ्या दोनच वर्षात म्हणजे 1797 मध्ये देहावसान झाले. याचा लाभ घेऊन दुस-या बाजीरावाने आपल्या बलाढ्य सरदारांची मदत घेत होळकर संस्थान हडप करण्याचा चंग बांधला. थोरले बंधू काशीराव बाजीरावाच्या कह्यात गेले. होळकर गादीचा लायक वारस मल्हारराव (द्वितीय) पेशव्यांची भेट घेऊन गादीचा मसला सोडवावा या विचाराने पुण्यात आपल्या बंधुंसह आले असताना मध्यरात्री अचानक हल्ला करुन खुन करण्यात आला. या हल्ल्यातुन वाचलेल्या यशवंतराव आणि त्यांचे बंधु विठोजी यांना जीव वाचवण्यासाठी पळून जावे लागले. नागपूरकर भोसलेंनी त्यांना आश्रय देण्याच्या नावाखाली कैदेत टाकले आणि त्यांना पेशव्यांच्या हवाली करण्याचा चंग बांधला. यशवंतरावांनी कडेकोट पहा-यातून, अकरा फुट उंचीच्या भिंतीवरून उडी मारून तेथून पलायन केले. खिशात दमडी नाही, फक्त अन्यायी पेशवाई संपवायची ही आकांक्षा. अशा अवस्थेत त्यांनी खिशात दमडी नसता, शिंदे-पेशव्यांचे सैन्य त्यांना पकडण्यासाठी मागे लागले असता, त्यांनी हिमतीने खानदेशातील भिल्लांची सेना उभारत केवळ आपल्या पराक्रमाच्या जीवावर कसलेल्या सेनानींशी युद्धे करत माळवा व महेश्वर जिंकून घेतले. होळकर संस्थान पेशव्यांच्या घशातून काढून घेतले. पेशवाईशी पूर्ण संबंध तोडण्यासाठी त्यांनी स्वत:चे स्वातंत्र्य घोषित केले. ६ जानेवारी १७९९ रोजी राज्याभिषेक करून घेत त्यांनी स्वत:ची राजमुद्रा घोषित केली. शिवरायांनंतर करून घेतलेला हा दुसरा आगळा राज्याभिषेक.

पेशवा गप्प बसला नाही. विठोजी होळकर यांनीही महाराष्ट्रात पेशवाईविरुद्ध उठाव केला. ब्रिटीश सैन्याची मदत घेऊन विठोजी होळकर यांचा पराभव करुन कैद करण्यात आले. शनिवार वाड्यासमोर हत्तीच्या पायाखाली चिरडून त्यांची निघृण हत्या केली गेली. यशवंतराव पुण्यावर चालून आले. हडपसर येथे महायुद्ध झाले. पेशवे व दौलतराव यांच्या सेनेचा समूळ विनाश केला. बाजीराव पेशवा घाबरून पळत सुटला तो सरळ इंग्रजांना शरण गेला. ३१ डिसेंबर १८०२ रोजी यशवंतराव त्यांना विनवण्या करत असतानाही वसईला त्यांच्याशी तह करून पेशवाईचा अस्त करून घेतला.

या क्षणापासून यशवंतराव इंग्रजांबाबत सावध झाले. इंग्रजांचा धोका विस्तारत चालला आहे हे त्यांच्या एव्हाना लक्षात आल्याने त्यांनी आपसांतील वैरभावाला मुठमाती देत, अगदी दौलतराव शिंद्यांशी व नागपुरकर भोसलेंशीही मेळ घालण्याचा प्रयत्न केला. देशभरच्या संस्थानिकांना पत्रे पाठवत, भेटत त्यांना भारत इंग्रजांपासुन स्वतंत्र करण्याचा चंग बांधला. पण यश मिळत नव्हते. सारे राजे-रजवाडे आपले मांडलिकत्व पत्करत असताना यशवंतराव का आपल्या बाजूने येत नाही या प्रश्नाने इंग्रजही चकित झाले. त्यांनी यशवंतरावाशी तह करण्याचा प्रयत्न केला तर यशवंतरावांनी त्यांना वाटाण्याच्या अक्षता दाखवल्या. शेवटी इंग्रजांनी १६ एप्रिल १८०४ रोजी युद्ध घोषित केले तर त्या युद्धाची सुरुवात यशवंतरावांनी केली. २२ मे १८०४ रोजी त्यांच्यावर चाल करून यायच्या तयारीत असलेल्या कर्नल फॉसेटच्या कुछ येथील तळावर अचानक हल्ला करून तेथील दोन बटालियन कापून काढल्या. इंग्रजांविरुद्ध सुरु केलेया स्वातंत्र्ययुद्धाची ही सलामी होती.

त्यानंतर एका पाठोपाठ एक अशा इंग्रजांशी कडव्या लढाया देत अशक्यप्राय वाटणारे विजय मिळवले. मुकुंद-याच्या युद्धात त्यांनी अभिनव युद्धतंत्र वापरत इंग्रजांची समुळ फौज कापुन काढली. याचे पडसाद इंग्लंडमधेही पडले आणि भारताबद्दलचे संपुर्ण धोरण बदलणे इंग्रजांना भाग पडले. “काय वाट्टेल त्या अटींवर यशवंतराव होळकरांशी शांततेचा तह करा…” असा आदेश घेऊन नवा गव्हर्नर जनरल भारतात आला. इकडे भरतपुरच्या युद्धात यशवंतरावांनी अजुन नव्या तंत्राने इंग्रजांना धुळ चारली. याच युद्धात सहभागी असणारे इंग्रज सेनानी नंतरच्या (१८१५ च्या) नेपोलियनच्या प्रसिद्ध वाटर्लू युद्धातही सामील होते आणि त्यांनी नोंदवुन ठेवलेय की ‘भरतपुरचे युद्ध वाटर्लुपेक्षा अवघड होते’. तेथपासुनच यशवंतराव व नेपोलियनची तुलना सुरु झाली.

“आधी देशाचे स्वातंत्र्य…” हा यशवंतरावांचा नारा १८०३ पासुन घुमला होता. पण या लढ्यात दुर्दैवाने कोणीही रजवाड्यांनी साथ न दिल्याने हा लढा एकाकीच राहिला. तरीही त्यांची विजयाची उमेद मिटली नाही. शीख तरी आपल्या युद्धात सामील होतील या आशेने जनरल लेक पाठीशी असतानाही पार लाहोर गाठले. पण त्यांनीही इंग्रजांच्या नीतीला बळी पडून यशवंतरावांना साथ देण्यास नकार दिला. पारतंत्र्याची मोहिनीच एवढी पडली होती कि स्वातंत्र्याचा अर्थच भारतीय रजवाडे विसरून गेले होते.

पण यशवंतराव नाउमेद झाले नाहीत. त्यांनी तात्पुरता इंग्रजांशी आपल्या अटींवर मैत्रीचा तह केला तो पुन्हा एकट्याच्या बळावर उभारी घेण्यासाठी. सारा देश सूप्त असतांना एक मनुष्य एकाकीपणे झुंजत होता, त्याला इंग्रज या भुमीवर नको होते. माळव्यात परत येताच त्यांनी सर्वप्रथम आपली राजधानी भानपुरा या आताच्या मंदसोर जिल्ह्यातील शहरात हलवली. आता कोणी आपल्याला तोफा देणार नाहीत याची खात्री पटल्याने तेथे त्यांनी तोफा ओतण्याचा मोठा कारखाना काढला. एक लक्ष प्रशिक्षित सैन्य उभारण्याच्या दिशेने त्यांनी वेगाने वाटचाल सुरु केली. कारखान्यात रात्रंदिवस तोफा ओतायचे काम सुरु होते. मेजर माल्कम हा यशवंतरावांचा कडवा विरोधक, पण तो म्हणतो, स्वत: यशवंतराव अनेकदा फाउंड्रीत तोफा ओतायचे काम करत असत. ध्येयाशी एवढी निष्ठा कोणातही आढळुन येणार नाही. आपल्या राज्यात आल्या आल्या, खरे तर एवढी दोन-अडिच वर्षांची दौड, सततची जीवघॆणी युद्धे, जीवावरची संकटे यातुन निघालेल्या कोणत्याही माणसाने शांततेचा उपयोग काही काळ तरी विश्रांतीसाठी केला असता…पण यशवंतराव खरच अजब रसायन होते. या मागे त्यांचे कारण होते…योजना होती.

हे लाखाचे सैन्य आणि दोनशे मोठ्या तोफा त्यांना हव्या होत्या…

कारण त्यांनी स्वत:च सरळ इंग्रजांची तत्कालीन राजधानी कलकत्त्यावर आक्रमणाची योजना आखली होती. देशाचे स्वातंत्र्य सर्वोपरी होते…स्वत:ची विश्रांती नाही! पण हे अथक कष्ट शरीराला किती मानवणार? १८११ मध्ये त्यांचा अकाल झाला. भारताच्या क्षितीजावर उगवलेल्या पहिल्या स्वातंत्र्यसूर्याचा अस्त झाला. कलकत्यावरील स्वारी राहूनच गेली. स्वतंत्र भारताने नेहमीच त्यांचे कृतज्ञतापूर्ण स्मरण केले पाहिजे.

-संजय सोनवणी

READ MORE
Blog

ऐतिहासिक पहिली विदर्भ स्तरीय वारकरी संत परिषद दि.२५.१२.२०२२. शिंदखेड ता.जि.आकोला.

धनगर धर्म पीठ महाराष्ट्र राज्य.

कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन l मा कर्मफलहेतुरभूर्मा ते संङ्गोस्त्वकर्मणी ll

धनगर धर्म पीठ महाराष्ट्र राज्य स्थापना २०१८ ला झाली.

समाजकारण, राजकारण, धर्मकारण, आर्थिककारण, औद्योगिकरण,साहित्य सर्व क्षेत्रात प्रस्थापित लोकांनी कब्जा केलेला आहे. आपण अज्ञानी असल्याने असंघटित आहोत. आपण स्वार्थ, मोह, माया, काम, क्रोध ,अहंकार यांनी ग्रस्त आहोत. म्हणूनच आपण नेते गिरी करत असताना एकत्र येत नाहीत. पण आपली जमात वेळ आली की एकत्र येते आणि राज्याचे चित्र बदलून टाकते हा अनुभव आहे.

अशा जमातीचा इतिहास, साहित्य, संस्कृती, राजकीय पटलावर यावा म्हणून आदिवासी धनगर साहित्य संमेलन साहित्य व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. जमाती मध्ये काही परमेश्वरा सारखी निस्वार्थी,शूर,दानशूर, लोक आहेत म्हणून आपण साहित्य संमेलन घेवू शकलो.

दर वर्षी दिवाळी झाल्यानंतर दुसरी दिवाळी पर्यंत धनगर जमातीच्या लाखो लोकांच्या जत्रा यात्रा भरत असतात. दररोज सूर्योदयापासून ते सुर्यास्त पर्यंत कन्याकुमारी ते काश्मीर पर्यंत भारत भूमीवर घंटानाद ऐकावयास मिळतो.म्हणून भारत भूमी ही दैवतांची भूमी आहे. देशात जरी घटनेचे प्रशासकीय राज्य असले तरी भारत देशातील लोकांच्या ह्रदयावर धर्माचे राज्य आहे. परंतु कलयुगीन अज्ञान आणि स्वार्थ यामुळे आपल्या ह.भ.प. मंडळी ना व्यक्त होण्यासाठी धार्मिक व्यासपीठ नव्हते या साठी आपण धनगर धर्म पीठ तथा लोक धर्म पीठ स्थापन केले आहे.या धर्म पीठ मार्फत कोरोना काळात ऑनलाईन आठवडा सत्संग सुरु केले. दि. २५|१२| २०२२ रोजी १००वा सत्संग आहे. या निमित्त एक दिवसीय स्वर्गीय द्रौपदीबाई काळदाते यांच्या स्मरणार्थ ऐतिहासिक पहिली विदर्भ स्तरीय संत वारकरी परिषद शिंदखेड ता.जि.आकोला येथे रविवार दिनांक २५|१२|२०२२ रोजी आयोजित करण्यात आली आहे. आगदी साध्या पध्दतीने हा कार्यक्रम पार पडणार आहे.वारकरी संत परिषद जत्रा किंवा यात्रा नाही. विदर्भातील ९५ सत्संग मथ्ये योगदान दिलेल्या सहभागी साठी हा कार्यक्रम आहे. राज्यभरातील वारकरी आणि संत मंडळी साठी राज्यस्तरीय महापरीषद आयोजित केली जाणार आहे. त्यामुळे कोणी नाराज होऊ नये किंवा गर्दी करु नये.आम्हाला सर्व समाज घटक देवा प्रमाणे आहेत. आम्ही आपल्या समाजाचे,देशाचे , सेवक नाहीत तर भक्त आहोत.
पुढच्या लेखात संत व वारकरी परिषदे विषयी थोडक्यात माहिती दिली जाणार आहे.

आपले समाज भक्त.
प्रा.डाॅ. अभिमन्यु टकले. संस्थापक धनगर धर्म पीठ महाराष्ट्र राज्य.
हभप श्री प्रभाकर दिवनाले महाराज. धर्म गुरू विदर्भ. धनगर धर्म पीठ तथा लोक धर्म पीठ महाराष्ट्र राज्य.

READ MORE
Blog

स्वर्गीय मा.आमदार गणपतराव देशमुख स्मरणार्थ ४थे आदिवासी धनगर साहित्य संमेलन सांगोला यशस्वी केल्याबद्दल जाहीर आभार

दि.२३|२४ जुलै २०२२रोजी धनगर साहित्य संमेलन उत्साहात, धूमधडाक्यात,यशस्वी रित्या प्राचार्य आर एस चोपडे सर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून सर्व क्षेत्रातील मंडळी हजर होती. आडीच महिने नियोजनासाठी मिळाले होते. पावसाळ्याचे दिवस होते तरी कर्म, हेतू शुध्द असेल तर दैव आणि निसर्ग ही नतमस्तक होत असतात. मा.सुशीलकुमार शिंदे साहेब माजी ग्रहमंत्री यांनी शुभेच्छा संदेश पाठवला होता. मा. आरविंदजी केजरीवाल मुख्यमंत्री दिल्ली यांनी दूत पाठवला होता. देशभरातील अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांनी शुभेच्छां दिल्या. बरेच आधिकारी हजर होते बरेच आधिकारी भेट देऊन गेले. महाराष्ट्र राज्यातील बरेच राजकीय पार्टीला धनगर जमात फक्त मतदार म्हणून चालते त्यांचा उत्कर्ष, विकास चालत नाही. महाराष्ट्र राज्यात काही लोक असे आहेत त्यांना सर्व जातीचे मतदान चालते पण जातीचे कार्यक्रम चालत नाहीत.

साहित्य संमेलनात अध्यक्ष श्री आर एस चोपडे सर संस्थेतील सर्व शिक्षक ,विद्यार्थी यांनी दिंडीच्या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले होते. चौदा देखावेचे रथ, पालखी, चौदा सांस्कृतिक सामूहिक न्रुत्य प्रकार असे अठ्ठावीस उत्कृष्ट असे कार्यक्रम बसवले होते. सांगोला वासीयांची प्रतीक्रीया होती साहेब आमच्या आयुष्यात आम्ही असा कार्यक्रमच पाहिला नाही.
उदघाटन मा.श्रीमती रतन गणपतराव देशमुख व श्री चंद्रकांत दादा देशमुख यांच्या हस्ते प्रतीमा पुजन, व भंडारा उदळून येळकोट येळकोट जय मल्हार,चांगभले च्या गजरात झाले. अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त केली, अनेक पुस्तकांचे प्रकाशन झाले.पुरस्कार वितरण सोहळाही पार पडला.

नंतर अहिल्या शिक्षण संस्थे ने आयोजित केलेला नियोजन बध्द असा सांस्कृतिक कार्यक्रम झाला या मध्ये विद्यार्थ्यांच्या कला गुणाला वाव देऊन त्यांना अनेक मान्यवरांनी बक्षीसांचा वर्षाव केला.
त्यानंतर सांयकाळचे सात वाजले होते. लोक दिवस भर खूप थकले होते.धनगरांचा गौरव शाली ईतिहासावर परिसंवाद झाला. रात्री नऊ ते अकरा दरम्यान उत्क्रुष्ट असे कवी शिवाजी बंडगर यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन पार पडले .राज्यभरातून कवी, कवयत्री यांनी हजेरी लावली. प्रबोधनात्मक कवीता, लावन्या, भारूड सादर करण्यात आले.

दुसर्या दिवशी विविध विषयांवरील परिसंवाद झाले. रविवार ची सुट्टी असल्याने सभागृह तुडुंब भरले होते. सर्व क्षेत्रातील अधिकाऱ्यांनी आवर्जून हजेरी लावली होती. सर्वात महत्वाची बाब रविवारी सर्वात जास्त विक्रमी पुस्तक विक्री झाली. अहमदनगर वरून आलेले स्टाॅलवर एकही पुस्तक शिल्लक राहीले नाही.

होळकर शाही पुस्तकाची एकही प्रत शिल्लक राहीली नाही. सर्व परिसंवाद अभ्यास पुर्ण होते. नवोदित वक्त्यांनी विषय मांडणी चांगलीच केली. जमातीच्या हिताचे ठराव मांडण्यात आले.
समारोप समारंभास प्रमुख वक्ते म्हणून दिल्लीचे आमदार दिनेश जी मोहनिया आम आदमी पार्टी व तिस अधिकारी उपस्थित होते. मा.आमदार दिनेश मोहनिया दिल्ली पाउण तास व आमदार रामहरी रूपनवर आप्पा यांचे दोन तास तडाखेबंद मार्गदर्शन झाले. रहाण्याची सोय उत्तमच होती. जेवणाची सोय बरी होती. अनेक साहित्यीक मान्यवर सतत दोन दिवस सभागृहात बसून होते.पहिल्या दिवशी सोळा तास कार्यक्रम चालला, तर दुसर्या दिवसी तेरा तास कार्यक्रम चालला. दोन दिवस प्रिंट आणि सोसेल मिडीयाचे पत्रकार बांधव संपादन आणि प्रकाशन करत होते. सोसेल मिडीयात तुफान बातम्या आल्या. तर प्रिंट मिडीयात सर्व लिडींग दैनिकात आडीचशे भर बातम्या छापल्या गेल्या. धनगर जमात देशभर समुद्रा सारखी विखूरलेली आहे. प्रचंड पाऊस चालू होता.राज्याचे राजकारण हवेत होते. वेळ कमी होता त्यामुळे संयोजन टिम व आम्ही आपणा पर्यंत पोहचू शकलो नसेल, अनेकांच्या आपेक्षा, पुर्ण करू शकलो नसेल, जानते, अजानते चुका ही झाल्या असतील, कार्यक्रम राज्यातील जमातीचा होता. वैयक्तिक नव्हता.जमातीच्या प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी होती तरीही आम्ही काही चुकले असेल तर माफ करावे व जमातीच्या प्रमाणीक कार्यात सहभागी व्हाल अशी अशा व्यक्त करतो. तसेच सर्व कार्यकर्ते, सर्व क्षेत्रातील मान्यवर ,विद्यार्थी, पत्रकार, साहित्यीक, सर्व कळत नकळत सहकारी या सर्वांचे जाहीर आभार . स्वर्गीय मा.आमदार गणपतराव देशमुख स्मरणार्थ चौथे आदिवासी धनगर साहित्य संमेलन सांगोला महाराष्ट्र राज्य टिमचे साहित्य संमेलन यशस्वी केल्याबद्दल जाहीर अभिनंदन.

https://dhangarsahityasammelan.org/ या वेबसाईटवर साहित्य संमेलन फोटो बातम्या व्हीडीओ पाहू शकता.

तसेच Adivasi Dhangar Sahitya Sammelan या यू टूबवर सर्व व्हीडीओ पाहू शकता.

डाॅ अभिमन्यु टकले
संस्थापक धनगर साहित्य संमेलन.
धनगर धर्म पीठ महाराष्ट्र राज्य.

READ MORE
Blog

डाॅ अभिमन्यू टकले यांचा जमातीच्या वतीने नागपूर येथे सत्कार

स्वर्गीय मा.आमदार गणपतराव देशमुख स्मरणार्थ चौथे आदिवासी धनगर साहित्य संमेलन सांगोला २३|२४जुलै२०२२ प्रचंड यशस्वी झाले.याची दखल महाराष्ट्र राज्यातील बौद्धिक जनतेने व काही प्रिंट मिडीयाने,सोसेल मिडीयानेही घेतली गेली आहे.भरगच्च प्रतीसादात,प्रचंड अशा उत्साही वातावरणात, हे संमेलन पार पडले.हा कार्यक्रम राज्यातील सर्व क्षेत्रातील जमातीने अगदी स्वत च्या खांद्यावर घेतला आहे.सर्व राज्यातून कौतुकाचा वर्षांव होत आहे. अनेक लेखक या ऐतिहासिक कार्याचे लीखान करू ईछीत आहेत.खरोखरच हे विचार पीठ लोकांचे झाले आहे. सर्वानाच आपले वाटू लागले आहे.या प्रेमाच्या भावनेतूनच आज डाॅ अभिमन्यु टकले संस्थापक अध्यक्ष धनगर साहित्य संमेलन व धनगर धर्म पीठ यांचा नागपूर येथील गणगोता कडून सत्कार करण्यात आला. श्री शिवकुमार आवझे व सौ कांचन आवझे यांनी हे आयोजन केले पहिला सत्कार ही केला. श्री धनराज खडसे सर कवी, सौ विद्या खडसे यांनीही सत्कार केला .श्री दुर्गेश महाजन व डाॅ सौ रक्षा महाजन लेखीका.यांनीही सत्कार केला. श्री खुशाल तांबडे,श्री उत्तम सुरनर यांनीही सत्कार केला. सर्वानी मनोगत व्यक्त केले. शुभेच्छा. दिल्या. जमातीने एकत्र येऊन आरक्षण घेतले पाहिजे व सर्वानी प्रयत्न केले पाहिजेत ही भूमीका मांडली. श्री धनराज खडसे सर यांनी डाॅ अभिमन्यु टकले यांच्यावर एक स्वरचित काव्य सादर केले.मा. डॉ. अभिमन्यु टकले सर…
यांना समर्पित…
————————————-
असतात काही माणसं ध्येय-वेडी,
आजपावेतो होते केवळ ऐकिवात…

आता घेतलाय अनुभव प्रत्यक्षात,
टकले सर साक्षात तुमच्या रुपात…

जीवनाच्या त्या प्रत्येक वळणावर,
माणूस माणसाशी जोडत गेलात…

जोडलीत माणसं जिंकलीत मनं,
नैराश्यात जागृत केलं आत्मभान…

निद्रावस्थेतील सुस्त समाजात,
जागवलात आशेचा नवं-किरण…

अहःर्निश मनी तो एकचि ध्यास,
कार्यसिद्धीचा उत्स्फूःर्त उल्हास…

अभिमन्यु म्हणावं की एकलव्य,
स्वप्न मनी बाळगलं भव्य-दिव्य…

अज्ञानावर सोकावला होता काळ,
शालीनतेनं सांधली भंगलेली नाळ…

सारस्वतांचा नित्य भरवूनी मेळा,
निर्मिलात अमृतमंथनी गोतावळा…

संमेलनी होऊ लागले चिंतन-मनन,
तृष्णातूरां मुखी जणूच ते अमृत-पान…
————————————-
शब्दांकनः धनराज खडसे, नागपूर.
डाॅ अभिमन्यु टकले सत्काराला उत्तर देताना म्हणाले गणगोताने केलेला सत्काराचा आनंद हा वेगळाच आसतो. आपण एकत्र येत आहोत. आपण एकत्र आलो तर आपण आपल्या सर्व समस्या सोडवू शकतो.

सौ विद्या खडशे यांनी आभार प्रदर्शन केले.

READ MORE
Blog

सांगोला येथे ४थे स्व.भाई गणपतरावजी देशमुख आदिवसी धनगर साहित्य संमेलन मोठ्या जल्लोषात

सांगोला येथे ४थे स्व.भाई गणपत रावजी देशमुख आदिवसी धनगर साहित्य संमेलन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृती भवन मध्ये मोठ्या जल्लोषात पार पडले.दोन दिवसीय या संमेलनात पहिल्या दिवशी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर व डाक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास संमेलन अध्यक्ष आर. एस.चोपडे व कार्यकारणीनी पुष्प हार अर्पण करुन ग्रंथ दिंडीने संमेलनाची अत्यंत उत्साहात,जल्लोषात सुरुवात झाली.

ग्रंथदिंडी मध्ये अनेक शालेय मुलामुलींनी लेझीम,धनगरी गजनृत्य,पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची वेशभूषा,बापू वाटेगावकर वेशभूषा, वाघ्या मुरली वेशभूषा, खंडोबा बानू वेशभूषा, वारकरी वेशभूषा, अशा प्रकारच्या लक्षवेधक रैली ने संपूर्ण सांगोला शहराचे लक्ष वेधले .उदघाटनाच्या वेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुतळ्यास व स्व.भाई गणपतरावजी देशमुख यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलीत केले.कोरोनाने मरण पावलेल्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली.प्रा.संजय शिंगाडे सरांनी मार्मिक वेधक प्रास्ताविक केले.संमेलन अध्यक्ष आर. एस चोपडे यांनीं आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की,” आजच्या तरुणानी येळकोट, येळकोट जय मल्हार चा आवाज वाढवावा,आतापर्यंत ७५ वर्षाच्या कालावधीत आपले २ खासदार व २०आमदार झाले याचा विचार करणे गरजेचे आहे. विधानसभेत व लोकसभेत आपले लोक कमी असल्यामुळें आपल्या समाजाचे प्रश्न सुटत नाहीत. धनगर समाजाची निरपक्षीय संघटना व्हायला पाहिजे.”या वेळी धनगर समाजाच्या साहित्यिकांची काही पुस्तके मान्यवरांचे हस्ते प्रकाशित करण्यात आली. तर काही मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले. नंतरच्या सत्रात शालेय मुलामुलींच्या सांस्कृतीक कार्यक्रमाने भरपूर मनोरंजन केले.कविसंमेलनात अनेक कवी वकवयित्रीनी सकस,दर्जेदार कवीता सादर केल्या,एकंदरींत या संमेलनात मनोरंजना बरोबरच वैचारीक माहिती ही मिळाल्याने धनगर समाज बांधव तृप्त झाला.उदघाटनाच्या वेळी श्रीमती रतन गणपतराव देशमुख, चंद्रकांत देशमुख, बाबासाहेब देशमुख तहसिलदार अभिजीत पाटील,संस्थापक अभिमन्यु टकले सर,मुख्याधिकारी कैलास केंद्रे,बाळासाहेब करनवर,राणीताई माने,संमेलन अध्यक्ष आर. एस.चोपडे, स्वागताध्यक्ष प्रा.संजय शिंगाडे,प्रा.यशपाल भिंगे सर अमोल पांढरे आदि मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्रातून विविध भागातून साहित्यिक पत्रकार व समाज बांधव उपस्थित होते.

READ MORE