Blog

मा. नितीन जी गडकरी केंद्रीय मंत्री ४थे आदिवासी धनगर साहित्य संमेलन २३ जुलै २०२२ सांगोला येनार

नागपूर :रविवार: दिनांक :१९|६|२०२२.
आज ठिक सकाळी १०वाजता. सकाळी ११:१७ वाजता दोन वेळा आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य शिष्ट मंडळाची मा.नितीन जी गडकरी यांनी भेट घेतली.परंतु सकाळी११:१७ वाजता शिष्ट मंडाळास भेट देवून सविस्तर चर्चा केली. श्री रामराव वडकुते माजी आमदार व भाजप जिल्हाध्यक्ष हिंगोली यांनी घोंगडे घालून सत्कार केला. डाॅ.अभिमन्यु टकले संस्थापक अध्यक्ष धनगर साहित्य संमेलन व संस्थापक धनगर धर्म पीठ महाराष्ट्र राज्य यांनी निमंत्रण पत्र दिले.श्री संजय शिंगाडे सर -स्वागताध्यक्ष यांनी व श्री बाळासाहेब कर्णवर पाटील व्हा.चेरमन श्री श्री सदगुरू साखर कारखाना राजेवाडी यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. मा. आमदार नागो गानार सर शिक्षक मतदार संघ नागपूर, मा.ऐडव्होकेट ढेरे सर सांगोला. मा.सोमनाथ मोटे सचिव रासप सांगोला.मा.तुकाराम मासाळ कवठेमहंकाळ. श्री अर्जुन हजारे पत्रकार नवमहाराष्ट्र सांगली. श्री आवजे शिवकुमार, श्री धनराज खडसे सर कवी.श्री खुशाल तांबडे समाज सेवक नागपूर. श्री श्रीधर भांगे सर लातूर.

हे सर्व शिष्ट मंडळ सदस्य उपस्थित होते. डाॅ.अभिमन्यु टकले यांनी त्यांना निमंत्रण दिले. दिनांक २३|७|२०२२ रोजी आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य सांगोला उद्घाटनास यावे हीच लोकांची लोकभावना आहे असे सांगीतले. म्हणूनच तुम्ही माझ्याकडे निमंत्रण देण्यास आले आहेत असे मंत्री महोदय म्हणाले.तसेच मी नक्की येणार आहे आणखी काही कार्यक्रम लावता येतो का तेही पाहू असे मा.केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी साहेब म्हणाले. डाॅ.अभिमन्यु टकले यांनी व श्री रामराव वडकुते माजी आमदार व भाजप जिल्हाध्यक्ष हिंगोली यांनी सर्व शिष्टमंडळातील सदस्यांची ओळख करून दिली. अशा तर्हेने आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य यांची भेट यशस्वी झाली.

READ MORE
Blog

चौथे आदिवासी धनगर साहित्य संमेलन शनिवार व रविवार दिनाँक २३ /२४ जुलै २०२२ रोजी सांगोला जि सोलापुर येथे होणार आहे. साहित्य संमेलन संस्थापक डॉ अभिमन्यु टकले

चौथे आदिवासी धनगर साहित्य संमेलन शनिवार व रविवार दिनाँक २३ /२४ जुलै २०२२ रोजी सांगोला जि सोलापुर येथे होणार आहे. साहित्य संमेलन संस्थापक डॉ अभिमन्यु टकले आहेत , या संमेलनाचे अध्यक्ष श्री आर एस चोपड़े अहिल्या शिक्षण संस्था सांगलीचे अध्यक्ष आहेत. प्रा. संजय सिंगाड़े सर हे स्वागत अध्यक्ष आहेत

 

पाहिले साहित्य संमेलन २०१७ ला सोलापुर येथे झाले। दूसरे साहित्य सम्मेलन २०१८ ला लातूर येथे झाले। तीसरे साहित्य सम्मलेन म्हसवड जि सातारा येथे २०१९ला झाले। चौथे साहित्य सम्मलेन मा आमदार गणपतराव देशमुख यांच्या म्हणण्यानुसार संगोला येथे जाहीर झाले होते। पूर्ण तैयारी झाली होती। पण कोविड १९ मुळे स्थगित करण्यात आले होते ‘ हे सम्मलेन स्वर्गीय गाणपतराव देशमुख यांच्या स्मरणार्थ होणार आहे , सर्व साहित्य सम्मेलन तीन दिवसाची झाली आहेत. २५ ते ३० हजार विविध क्षेत्रातील मान्यवरांनी देशभरतुन हजेरी लावलेली आहे। या सम्मेलनास किमान ४० हजार विविध क्षेत्रातील मान्यवर हजेरी लावण्याची आपेक्षा आहे। या संमेलनात दोन दिवस भरगच्च असे कार्यक्रम आहेत शनिवार दिनांक २३/७/२०२२ रोजी साहित्य दिंडीचा कार्यक्रम सकाळी आठ तें साडे अकरा पर्यन्त असेल। मान्यवर हस्ते दिंडीचे उद्घाटन होईल दिंडी मधे ४० सजवलेले रथ असतील। रथात ऐतिहासिक वेश भूषा धारण केलेले विद्यार्थी शिक्षक कलाकार असतील. यात जमातीचा इतिहास , धर्म,संस्कृति , साहित्य ,रूढ़ि।,परंपरा , चाली ,रीती ,शैक्षणिक प्रबोधन रथ ,सजीव देखावे ,लेज़िम ,भजनी मंडल ,गाजे ढोल, शोभा यात्रा असतील , साहित्य नागरीचे नाव संत बालु मामा नगरी असे असेल तर ग्रन्थ दालनचे नाव संत कनकदास नगरी असे असेल , साहित्य पीठास कवी कालिदास पीठ असे नाव देण्यात येईल ,या सर्व नगरीचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात येईल,उद्घाटन सोहळा दुपारी बारा ते तीन वाजे पर्यन्त असेल, उद्घाटन सोहळा मान्यवर यांच्या हस्ते होईल, भंडारा उधळून गजेडोलचया गजरात येळकोट येळकोट जय मल्हारच्या घोषणा देत साहित्य संमेलनाचे उद्घाटन होईल ,फ़क्त उद्घाटन आणि समारोप सोहळ्यास राजकीय नेत्यांना परवानगी राहील ,उद्घाटन कार्यक्रम मधे संस्थापक सम्मलेन ,अध्यक्ष,सोलापुर जिल्हा पालकमंत्री ,लोकल आमदार ,खासदार ,साहित्यिक ,सामाजिक,शैक्षणिक ,उद्योग ,प्रशासन ,विभागातील मान्यवर असतील, तीन तास जमातीच्या विविध विषयायावर प्रकाश टाकतील ,नविन सहितिकांच्या साहित्याचे प्रकाशन होईल,शिक्षण साहित्य पत्रकारिता वैद्यकीय सामाजिक प्रशासन क्षेत्रातील १० आदर्श मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरव करण्यात येईल, स्वर्गीय आमदार गणपतराव देशमुख आदर्श आमदार पुरस्कार देण्यात येईल. तसेच भारत देशयातील एक आदर्श लोकसेवक मुख्यमंत्री यांची निवड करणार आहोत आणि रुख एक लक्ष रुपये शाल श्रीफळ काटी घोंगडी देऊन धनगरजमाती मार्फ़त पुरस्कार देऊन भव्य सत्कार करण्यात येईल. सम्मलेन अध्यक्ष यांचे भाषण झाल्यानंतर उद्घाटन सोहळा संपेल। गलांडे दुपारी तीन ते सायंकाळी सहा वाजे पर्यन्त स्पर्धात्मक सांस्कृतिक कार्यक्रम असेल , याचे उद्घाटन संगोला नगरीचे नगरधक्ष्य करतील, या मधे अहिल्या शिक्षण संस्था सांगली अणि विविध शाळा कॉलेजेस सहभाग घेतील , या मधे धनगरी गीते,, ओव्या, धनगरी नृत्य असतील, सायंकाळी ६ते ८ वाजता परिसवांद आहेत। विषय : धनगर साहित्याचा विविध क्षेत्रावर होणारा परिणाम वक्ते :मा राम लांडे लेखक ,नवनाथ गोरे लेखक ,प्रा मुकुंद वलेकर। विषय -धनगर सारा एक वक्ते :संजय सोनवानी ईतिहास संशोधक ,लेखक। रात्री ८ते ११ कवी संमेलन होणार आहे , कवी संमेलन अध्यक्ष शिवाजी बंडगर ग्रामीण साहित्यिक हे असतील. सूत्र संचालन भरत दौंडकर कवी हे करतील। ह भ प श्यामसुंदर महाराज कवी ही प्रमुख उपस्थिती असेल. कविसम्मेलनात ४० कवी भाग घेणार आहेत। रविवार दिनांक २४/७/२०२२ रोजी दिवसभर परिसवांद चर्चा सत्र अणि व्याख्याने होतील। विषय ; धनगरांचा राजकीय प्रवास वक्ते :एडवोकेट अण्णा राव patil ,प्रा डॉ किसन माने। विषय : धनगर साहित्याकांची जबाबदारी , वक्ते : चिंतामणी सहस्त्रबुद्धे संपादक दै तरुण भारत। डॉ मधुकर सलगरे लेखक लातुर। विषय : धनगर समाज्याच्या समस्या मिडिया लक्ष्य का वेधून घेत नाही। वक्ते :मा सुभाष बोंद्रे कार्यकारी संपादक दै, दिव्य मराठी , श्यामसुंदर सोन्नर महाराज वरिष्ठ पत्रकार ,विषय :होळकर श्याहीच्या इतिहासातून काय घ्यावें वक्ते : प्रा डॉ यशपाल भिंगे मा सुभाष माने मा संचालक सहकार पणन महामंडळ। विषय :धनगर आरक्षण वक्ते मा सुभाष पाटिल खेमनार मा कृषि संचालक मा गणेश दादा हाके बीजेपी प्रवक्ते विषय : महिलांची सामाजिक जबाबदारी डॉ ज्योति सुल समाजीक कार्यकर्ती ,डॉ स्नेहा सोन सोनकाटे , सौं रुक्मिणी गलांडे डीसीपी पुणे विषय: प्रस्यासकीय अधिकाऱ्यांच्या जबाबदार्या वक्ते तुषार ठोम्बरे अप्पर जिल्हाधिकारी ,दिलीप पालवे निवृत्त कार्यकारी अभिंयत समारोप सोहळा : सांयकाळी ५ते७या वेळेत घेण्याचे नियोजन केले आहे.प्रस्तावनेचे भाषण संस्थापक अध्यक्ष डॉ अभिमन्यु टकले हे करतील. ठराव ही मांडतील व त्याच्या प्रती उपस्थित लोक प्रतिनिधी यांना देतील. स्वागत अध्यक्ष संजय,शिंगाडे सर यांचे भाषण होईल. उपस्थित सर्व क्षेत्रातील मान्यवर सत्कार ,स्वागत सोहळा होईल. मनोगत व्यक्त करतील. पुरस्कार वितरण सोहळा होईल व साहित्य संमेलन अध्यक्ष समारोप भाषण होईल. समारोप सोहळा प्रमुख पाहुणे यांचे भाषण झाले की आभार प्रदर्शन होईल. कार्यक्रम सांगता होईल. प्रमुख उपस्थिती मध्ये. श्री संजय सोनवणी लेखक, इतिहास संशोधक, पटकथा लेखक पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर मालिका व अध्यक्ष पहिले धनगर साहित्यसंमेलन सोलापूर. अध्यक्ष. मा. मुरहरी केळे साहेब संत साहित्य लेखक, व संचालक विद्युत वितरण महाराष्ट्र शासन व तिसरे साहित्य संमेलन म्हसवड अध्यक्ष. डाॅ.अरूण गावडे,मा.आण्णासाहेब डांगे माजी मंत्री, मा.राम शिंदे माजी मंत्री व उपाध्यक्ष भाजप, मा.आमदार रामराव वडकुते, मा.आमदार हरिदास भदे, आमदार गोपीचंद पडळकर, मा.शरदश्चंद्र पवार साहेब अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस. श्री दत्तात्रय भरणे पालकमंत्री सोलापूर. प्रणिती ताई शिंदे आमदार सोलापूर. स्थानिक सर्व आमदार, खासदार. नगराध्यक्ष, महापौर सोलापूर, जिल्हा परिषद अध्यक्ष. साहित्य संमेलन तयारी जोरदार चालू आहे.हे व्यासपीठ सर्व क्षेत्रातील, जाती धर्मातील सन्माननीय मान्यवर यांच्या साठी सदैव खुले राहील. तरी राज्यातील सर्व क्षेत्रातील सन्माननीय मान्यवर यांनी उपस्थित रहाण्याचे आवाहन संयोजन समिती मार्फत करत आहोत.

संयोजन समिती.. आपले विनीत:प्रा.डॉ. अभिमन्यु टकले संस्थापक धनगर साहित्य संमेलन, धनगर धर्म पीठ महाराष्ट्र राज्य.
श्री ज्ञानेश्वर ढोमणे आमरावती. श्री धनराज खडसे नागपूर.
श्री खुशाल तांबडे नागपूर. श्री शिवकुमार आवाजे नागपूर.

READ MORE
Blog

आदरणीय श्री अभिमन्यू टकले सर, लाख बोलक्या हुनी थोर एकची असे कर्तबगार, धनगर धर्म पीठचे संस्थापक

दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती अशी, शांत मनोवृत्ती धनगर समाजाच्या हितासाठी कार्यरत असलेले, अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन, तिन्ही लोकी कर्तव्यशिलता निती नियमता,
अति शुध्द हो आचार से तन मन हमारा सर्वदा, अध्यात्मकी शक्ति हमे पलभी नही करदे जुदा, अशा महामानव संत वृतिचा जन्म दिन साजरा होत आहे करीता त्यांना उदंड आयुष्य मिळो निरोगी आरोग्य सुख समृध्दी आनंद सदैव मिळो त्यांनी घेतलेला वसा परिपूर्ण करण्या करीता त्यांना शक्ती युक्ती बुद्धी देवुन साह्य व्हाव अशी संपुर्ण देवी देवतांना प्रार्थना करतो 🙏🏽
आणि वाढदिवसाच्या मनपूर्वक यवतमाळ जिल्ह्यातील सर्व धनगर समाजाच्या वतीने व अखिल भारतीय श्रीगुरूदेव सेवा आश्रम गुरुकुंज मोझरी याच्या वतीने जिवन प्रचारक गुरुकुंज मोझरी याच्या वतीने त्यांना सहकुटुंब सहित

🌾हार्दिक 🌷हार्दिक 🌾
शुभेच्छा देत आहे।
शुभेच्छुक रमेश कचरे
फुबगांव।
धनगर धर्म पीठ यवतमाळ जिल्हा अध्यक्ष

READ MORE
Blog

स्वर्गीय मा.आमदार गणपतराव देशमुख स्मरणार्थ आदिवासी धनगर साहित्य संमेलन सांगोला

मा.नितीनजी गडकरी साहेब केंद्रीय वाहतूक व अवजड उद्योग मंत्री यांच्या कार्यालयास सकारात्मक भेट

नागपूर शुक्रवार दि.१४/५/२०२२

रविवार दिनांक १/५/२०२२ रोजी मा.अध्यक्ष व स्वागताध्यक्ष स्वर्गीय मा.आमदार गणपतराव देशमुख स्मरणार्थ चौथे आदिवासी धनगर साहित्य संमेलन सांगोला महाराष्ट्र राज्य श्री आर एस चोपडेसर व शिंगाडे सर यांनी श्री नितीन जी गडकरी साहेब यांनी साहित्य संमेलन उद्घाटनास आले पाहीजेत व समारोपास श्री शरद पवार साहेब यावेत अशी जमातीची इच्छा असल्याचे मत व्यक्त केले होते. त्या अनुषंगाने शुक्रवार दिनांक १४/०५/२०२२ रोजी मा.नितीन जी गडकरी यांच्या कार्यालयास भेट दिली.त्यांचे स्विय सहाय्यक श्री अतुलजी मंडलेकर यांच्याशी श्री प्रकाश मकासरे सर यांनी फोन वर समन्वय साधला.नतंर प्रत्यक्ष भेट घेतली व सकारात्मक चर्चा झाली. लवकरच मा. शिक्षक आमदार श्री नागो गाणार नागपूर, माजी आमदार मा.श्री रामराव वडकुते भाजप जिल्हाध्यक्ष हिंगोली वाशीम. मा.आर एस चोपडेसर अध्यक्ष सांगली, श्री संजय शिंगाडे सर स्वागताध्यक्ष सांगोला,श्री बाळासाहेब कर्णवर पाटील व्हा.चेरमन श्री श्री सदगुरू साखर कारखाना राजेवाडी.

श्री ज्ञानेश्वर ढोमणे सर आमरावती

श्री धनराज खडसे सर साहित्यिक व कवी. सर्व शिष्टमंडळ मा नितीनजी गडकरी साहेब केंद्रीय मंत्री यांची भेट घेऊन त्यांना आदिवासी धनगर साहित्य संमेलनाचे उद्घाटन साठी निमंत्रण देणार आहे. वेळ मिळाल्यानंतर लवकरच मजाहीर करण्यात येईल.

संस्थापक अध्यक्ष आदिवासीं धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य धनगर धर्म पीठ महाराष्ट्र राज्य

READ MORE
Blog

स्व. मा.आमदार गणपतराव देशमुख आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य हे शनिवार दि.23/7/2022 व रविवार दिनांक 24/7/2022 रोजी सांगोला येथे होणार

सांगोला जि. सोलापुर: रविवार दिनांक १/५/२०२२ रोजी स्वर्गीय आमदार भाई गणपतराव देशमुख आदिवासी धनगर साहित्य सम्मलेन सांगोला राज्यस्तरीय बैठक आयोजित केली होती. राज्यभरातील निवडक साहित्य प्रेमी बौद्धिक मंडळी उपस्थित होती.अध्यक्ष स्थानी सम्मेलन आध्यक्ष प्राचार्य आर एस चोपड़े सर होते तर प्रमुख उपस्थीती संस्थापक डॉ अभिमन्यु टकले, श्री ज्ञानेश्वर ढोमणे अमरावती, श्री अशोक हटकर बुलढाणा हे होते. कामगार दिनानिमित्त MPSC पास झालेले अधिकारी व मान्यवरचा सत्कार सोहळा पार पडला.कु भाग्यश्री ढोन राजपत्रित गट अ जलसंधारण विभाग निवड. राजपत्रित गट ब मधे कु पल्लवी नीलगुडे, कु सायली हाके, डॉ योगेश्वरी आलदर, श्री नितीन आलदार, डॉ अविनाश उत्तम खांडेकर यांना गौरवण्यात आले. प्राचार्य विजयकुमार वाघमोडे, शेंडगे सर यांचा आदर्श प्राचार्य म्हणून सत्कार करण्यात आला. भाग्यवंत नायकूड़े आदर्श पत्रकार व आबासाहेब मोटे आर एस पी पार्टीचे राज्य सचिव झाले म्हणून अभिनन्दन सत्कार करण्यात आला. तसेच सर्व मान्यवरचा सत्कार करण्यात आला. साहित्य सम्मलेन रूप रेषा कशी असावी यावर मान्यवरांनी मार्गदर्शन केले.मार्गदर्शन करताना डॉ अभिमन्यु टकले संस्थापक अध्यक्ष म्हणाले सयोजन समितीला जी योग्य तारीख वाटेल ती ठरवावी .तसेच जो पर्यन्त धनगर समाज्यातील बौद्धिक लोक निस्वार्थ पणे जमाती साठी काम करणार नाहीत तो पर्यत कोणालाही काहिही मिळणार नाही. अडीच कोटी मतदार असलेला समाज्याचे नेते जो पर्यन्त एक व्यासपीठावर येणार नाहीत तो पर्यन्त त्यांचा वापरच होणार आहे. धनगर जमात एक होण्यासाठी तयार आहे. लीडरशिप साठी तयार आहे. पोटभरु वैयक्तिक घरभरु नेते समाज्याचे कधीही भले करू शकत नाहीत. भविष्यात राज्यस्तरीय जमात एक होत आहे.आदिवासी धनगर साहित्यातील मान्यवरांनी सामाजिक राजकीय बदल घडून आणले आहेत.जमात बोलू लिहू लागली आहे. हे साहित्य सम्मलेन झाल्या नंतर राज्यात मोठे सामाजिक बदल होतील हे सांगण्याची गरज नाही. २०१४ पासून आपण निर्णायक भूमीकेत आहोत. साहित्य सम्मेलन सयोंजन समितीला नियोजनाचे पूर्ण अधिकार आहेत . योग्य तारीख निश्चित करावी. कोणत्याही आघाडीवर एकटे लढू नक़ा लवकर सम्पून जाल. हे साहित्य सम्मलेन राज्य आणि देश्यात बदल घडवणारे भव्य दिव्य होणार हे नक्कीच.

श्री बाळासाहेब कर्णवर पाटील यांनी अनेक सुझाव दिले ते सयोंजन समितीने मान्य केले.बाळासाहेब कर्णवर पाटील म्हणाले आदर्श मुख्यमंत्री पुरस्कार सुरु करा. जे समाज्याचे नेते पत्रिकेत नाव टाकून येत नाहीत त्यांची नावे टाकू नयेत. जे नावे टाकायला लावतात त्यांनीच त्यांना आण्यासाठी जावे. जेथे कमी तेथे आम्ही. जी जबाबदारी देणार ती घेऊ असेही ते म्हणाले. मा नितिन गडकरीजी निंमत्रण देण्याची जबाबदारी व मुख्यमंत्री पुरस्कार याची जबाबदारी घेणार असल्याचेही ते म्हणाले.

श्री आर एस चोपड़े नियोजित संमेलन अध्यक्ष म्हणाले व्यासपीठ असल्या शिवाय व्यक़्त होता येत नाही. तसेच कोणाचे कौतुक करता येत नाही.यासाठीच डॉ अभिमन्यु टकले सर यांनी हे व्यासपीठ तयार केले आहे आणि बदल घडत आहेत. आज आपण या सर्व अधिकारी तरुणांचे

सत्कार अभिनन्दन या व्यासपीठावर केले. या सम्मेलना मुळे आज मलाही व्यासपीठ मिळाले आहे. आज मला ही या मुळेच व्यासपीठ मिळाले आहे.या व्यासपीठाचे परिणाम आम्ही २०१७ पासून पाहत आहोत आणि येणाऱ्या काही वर्ष्यात याचे परिणाम समज्यात पाहिला मिळणार आहेत.तसेच सर्व अधिकारी कर्मचारी बौद्धिक वर्ग सम्मेलनात एकवटला अणि टकले सर सारखे निस्वार्थ पने समाज सेवा केली तर समाज्याची प्रगति झाल्या शिवाय राहणार नाहीं. तसेच या सम्मेलनला काहिही कमी पडू देणार नाही.आमच्या संस्थे मधे दहा हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत .तिनसे चारसे स्टाफ आहे ,.रथ यात्रा ,दिंडी , सांस्कृतिक कार्यक्रम जबाबदारी आमची आहे . काहीही कमतरता भासु दिली जाणार नाही. तसेच साहित्य सम्मेलंनात पुढारी लुडबुड नको. निस्पक्ष्य काम करणारे साहित्याची आवड असणारे नितिनजी गडकरी साहेब, सुशीलकुमार शिंदे साहेब असे मान्यवर बोलवावेत. या सम्मेलनात अहिल्या शिक्षण संस्था पूर्ण क्षमतेने उतरनार आहे. सम्मलेन तारीख २३/२४ जुलै २०२२ ठेवण्यात यावी असी सूचनाही चोपड़े सर यांनी केली.

 

श्री अशोक हटकर सभापती बाजार समिति बुलढाणा हे म्हणाले पहिले आदिवासी धनगर साहित्य सम्मलेन जाहिर झाल्यानंतर आम्हाला खुप आनंद झाला होता. सम्मलेन झाले आणि खुप चांगला उपक्रम सुरु झाला आहे. आपल्या समाज्यात जात्यावरची गाणी,धनगरी ओवी , असे अनेक साहित्याचे अनेक प्रकार आहेत ते जतन केले जावेत.

श्री ज्ञानेश्वर ढोमणे सर धनगर धर्मपीठ प्रमुख अमरावती व वधूवर सूचक प्रमुख म्हणाले त्यांनी अमरावती येथे समाज्याची अनेक विकास कामे संस्था स्थापन करून , समाज्याचा विकास करत आहेत. त्यानी विविध विकास कामे केली त्याची माहिती सांगितली. पुढे बोलताना ते म्हणाले आदिवासी धनगर साहित्य सम्मलेन हे महाराष्ट्र राज्यात चर्चेत आहेच, परन्तु हे सम्मलेन देशातील अनेक राज्यात फिरत असतना या सम्मेलन बदल चर्चा केली ज़ाते. त्यामुळे राज्यबाहेरील लोक ही सम्मेलनाला येण्यास उत्सुक आहेत आसेही ते म्हणाले. विदर्भ विभागात जी जबाबदारी दिली जाईल ती स्वीकारली जाईल असे ते म्हणाले.

सम्मलेन स्वागत अध्यक्ष्य संजय सिंगाड़े सर समारोप करताना म्हणाले साहित्य सम्मेलनात सिस्त असेल. सम्मलेन स्थळ लवकरच जाहिर केले जाईल.साहित्य सम्मलेन २३/७/२०२२ व २४/७/२०२२ लाच होणार आहे. केंद्रीय राज्य मंत्री कवी रामदास आठवले हे उपस्थित राहणार असल्याचेही ते म्हणाले. तसेच ते श्री जयंतराव पाटील शेकाप यांनाही निमंत्रण देण्यात येणार असल्याचे सांगीतले.लवकरच सर्व साहित्यिक यांच्या सहकार्यानी पत्रिका तयार करनार आहेात . सांगोलकर आहोत स्वर्गीय आमदार गाणपतराव देशमुख यांच्या नावाच्या उंची सारखेच सम्मलेन घेवू. तसेच लवकरच पुरस्कार समिती नेमली जाईल. पुरस्कार आदर्श शेतकरी,पालक,पत्रकार , अधिकारी ,लोकप्रतिनीधी साहित्यिक यांना दिला जाईल. दिनांक २३/७ /२०२२ व २४ /७ २०२२ या साहित्यसम्मेलन कार्यक्रम तारखा एकमताने जाहीर करून राज्यस्तरीय बैठक संपली. लवकरच सोलापूर येथे पत्रकार परिषद घेऊन संमेलन जाहिर केले जाईल. बंडोपंत येडगे सर यांनी आभार व्यक्त केले.खालील मान्यवर उपस्थित होते

प्रा.डॉ. अभिमन्यु टकले संस्थापक धनगर साहित्य संमेलन, धनगर धर्म पीठ महाराष्ट्र राज्य.
श्री बाळासाहेब कर्णवर पाटील.व्हा. चेरमन श्री. श्री सदगुरू साखर कारखाना राजेवाडी मार्गदर्शक.
श्री प्राचार्य आर एस चोपडे सर अध्यक्ष अहिल्यि शिक्षण संस्था सांगली व अध्यक्ष ४थे आदिवासी धनगर साहित्य संमेलन .
श्री उज्ज्वलकुमार माने संपादक दैनिक तरूण भारत सोलापूर.

सदस्य.
संयोजन समिती धनगर साहित्य संमेलन सांगोला
.श्री संजय शिंगाडे सर
स्वागताध्यक्ष तथा प्रमुख संयोजन समिती ४थे आदिवासी धनगर साहित्य संमेलन सांगोला महाराष्ट्र राज्य.
श्री शिवाजी बंडगर कवी सम्मेलन अध्यक्ष.
श्री कुङंलीक आलदर संयोजक.
डाॅ.उषा देशमुख. श्री राजेंद्र देशमुख.
श्री विष्णु देशमुख कार्याध्यक्ष. प्राचार्य रामचंद्र जानकर खजिनदार.
श्री कृष्णा बुरूंगुले संचालक सदस्य.

सन्माननीय सदस्य
डाॅ.रमेश सिद, .श्री भीवा कांबळे,श्री सुबराव बंडगर, श्री आबासाहेब मोटे,. प्रा.बाळक्रुष्ण कोकरे,, श्री बंडोपंत येडगे,श्री दत्तात्रय जानकर, श्री विजयकुमार वाघमोडे,श्री दिगंबर बंटी लवटे.श्री अमोल खरात,श्री उल्हास धायगुडे,,श्री प्रवीण वाघमोडे,श्री मोहन मस्के पत्रकार, प्रा.बापूराया शिंदे
श्री ज्ञानेश्वर ढोमणे धनगर धर्म पीठ जिल्हाध्यक्ष आमरावती.
श्री अशोक हटकर सभापती
बाजार समिती खामगाव बुलढाणा.
भाग्यवंत नायकुडे पत्रकार आकलुज.
बाळासाहेब टकले जि.संघटक धनगर धर्म पीठ करमाळा .
श्री विठ्ठल सजगने सर जिल्हाप्रमुख धनगर धर्म पीठ सातारा.
श्री गणेश पुजारी सर पत्रकार पुणे .
श्री अशोक माने पत्रकार पुणे.असे अनेक जमातीचे मान्यवर उपस्थित होते.

READ MORE
Blog

चलो सांगोला. स्व.आ. गणपतराव देशमुख स्मरणार्थ आदिवासी धनगर साहित्य सम्मलेन संगोला महाराष्ट्र राज्य

महाराष्ट्र राज्यातील तमाम जमातीला व जमातीतील जबाबदार मान्यवर साहित्यिक कवी ,लेखक ,
पत्रकार समाजसेवक,
प्राध्यापक ,
अधिकारी ,
कर्मचारी, हितचिंतक यांना कळवण्यात येते की आपले बहुचर्चित आदिवासी धनगर साहित्य सम्मलेनाची तारीख वार स्थळ निश्चित करण्यासाठी राज्य स्तरीय बैठक आयोजीत करण्यातआलीआहे. आतापर्यंत आपली तीन न भूतो न भविष्य ते अशी सम्मलेन झाली आहेत. सर्व देशभरातील साहित्यकानि हजेरी लावलेली आहे. या दृष्टिने आपण रविवार दिनांक ०१/०५/२०२२ रोजी बचत भवन पंचायत समिती संगोला येथे राज्य व्यापी बैठकीचे आयोजन केले आहे, या ठिकाणी खलील विषयावर चर्चा करण्यात येणार आहे. साहित्य सम्मलेन दिनांक ,स्थळ, तसेच जमातीचे, राज्यस्तरीय सामाजिक, आर्थिक,शैक्षणिक,
औद्योगिक, राजकीय, प्रश्न,मेंढपाळाचे समस्या व उपाय ,तसेच साहित्य दिंडी कसी असावी, उद्घाटन ,समारोप, पाहुने कोण असावेत? सांस्कृतिक कार्यक्रम कसा असावा? कवी सम्मेलन कसे असावे?तसेच पत्रिका कसी असावी? साहित्य सम्मलेन पुरस्कार समिती, परिसवांद विषय कोणते असावेत ? सम्मेलनात येणारे प्रश्न कैसे सोडवावेत?
असे अनेक सुझाव आपण देवू शकता. नुसतेच सल्ले महत्त्वाचे नसतत. आपले योगदान काय हे ही महत्वाचे असते? सम्मलेन घेणे हे आसामान्य काम आहे?अनेक सोशल मीडिया लेखक जमातीची एकी, जमितीचा इतिहास यावर लेख लिहतात. हे घरात बसून होत नसते . केल्यानंतर होत असते. तसेच सम्मलेन होउन गेल्यानंतर सुझाव देतात’.तरी कृपया आपले म्हणणे प्रा, आर एस चोपड़े सर अध्यक्ष, किंवा प्रा. संजय शिंगाडे सर यांना भेटून किंवा फ़ोन वर कळवावे. किँवा dhangarsahityasammelan.org या सम्मेलनाच्या संकेत स्थळावर भेट दया मेल करा.धनगर जमातीवर योगदान दिलेले साहित्यिक यांचा प्राधान्यानी विचार केला जातो .त्यामुळे हे खुले व्यासपीठ आहे. सर्व जाती धर्मातील वंचित समज्यासाठी हे व्यासपीठ आहे. धनगर साहित्य सम्मलेन तारीख आणि कार्यक्रम नियोजन झाले की प्रेस कांफ्रेंस मधे साहित्य सम्मलेन टीम सर्व जाहिर करेल. तरी क्रुपया राज्यातील, शिक्षण,समाज, साहित्य, सांस्कृतिक, धर्म, सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून सुजाव, मार्गदर्शन, योगदान द्यावे.तसेच राग, लोभ, काम, क्रोध, संशय,जात, धर्म, सर्व भेद विसरून राजकीय पक्षाचे जोडे बाहेर काढून जमातीच्या व्यासपीठावर सर्वांचे स्वागत आहे. आपले विनीत:प्रा.डॉ. अभिमन्यु टकले (संस्थापक धनगर साहित्य संमेलन, धनगर धर्म पीठ महाराष्ट्र राज्य.)श्री संभाजीराव सुळ उपाध्यक्ष धनगर साहित्य संमेलन.श्री बाळासाहेब कर्णवर पाटील. मार्गदर्शक.श्री प्राचार्य आर एस चोपडे सर अध्यक्ष ४थे आदिवासी धनगर साहित्य संमेलन सांगोला.श्री बबन बरकडे उपाध्यक्ष धनगर धर्म पीठ.श्री सोमनाथ कर्णवर पाटील एपिआय, सदस्य.श्री चंद्रकांत हजारे प्रवक्ते धनगर साहित्य संमेलन.संयोजन समिती धनगर साहित्य संमेलन सांगोलाश्री संजय शिंगाडे सरस्वागताध्यक्ष तथा प्रमुख संयोजन समिती ४थे आदिवासी धनगर साहित्य संमेलन सांगोला महाराष्ट्र राज्य.श्री कुङंलीक आलदर संयोजक.श्री विष्णु देशमुख कार्याध्यक्ष. प्राचार्य रामचंद्र जानकर खजिनदार. श्री कृष्णा बुरूंगुले संचालक सदस्य. सन्माननीय सदस्यडाॅ.रमेश सिद, श्री कुङंलीक एरंडे,श्री बाळासाहेब एरंडे. श्री भीवा कांबळे, श्री सुबराव बंडगर, श्री आबासाहेब मोटे, श्री उल्हास धायगुडे, डाॅ.विजय बंडगर,प्रा.बाळक्रुष्ण कोकरे,श्री राजेंद्र देशमुख, वकिल टी डी ढेरे, श्री बंडोपंत येडगे,श्री दत्तात्रय जानकर, श्री विजयकुमार वाघमोडे, श्री दिगंबर बंटी लवटे, डाॅ. महेश राऊत, श्री अमोल खरात, ॲड. धनंजय मेटकरी, श्री परमेश्वर कोळेकर, श्री प्रवीण वाघमोडे,श्री मोहन मस्के पत्रकार, प्रा.बापूराया शिंदेनिमंत्रीत:डाॅ.बाबाहेब देशमुख नेते शेकाप महाराष्ट्र राज्य.डाॅ.अनिकेत देशमुख. श्री रामराव वडकुते माजी आमदार व भाजप जिल्हाध्यक्ष हिंगोली वाशीम.श्री ज्ञानेश्वर ढोमणे धनगर धर्म पीठ जिल्हाध्यक्ष आमरावती. श्री अशोक हटकर सभापती बाजार समिती खामगाव बुलढाणा. श्री सुरेश भूमरे भाजप युवक जिल्हाध्यक्ष परभणी. भाग्यवंत नायकुडे पत्रकार आकलुज. बाळासाहेब टकले जि.संघटक धनगर धर्म पीठ करमाळा. श्री विठ्ठल सजगने सर जिल्हाप्रमुख धनगर धर्म पीठ सातारा.विजय हुबाले धनगर धर्म पीठ अध्यक्ष सांगली.

READ MORE
Blog

स्वर्गीय मा.आमदार गणपतराव देशमुख स्मरणार्थ चौथे आदिवासी धनगर साहित्य संमेलन सांगोला महाराष्ट्र राज्य घोषणा

रविवार दि.०१|०५|२०२२.
स्थळ: बचत भवन पंचायत समिती सांगोला .
वेळ: सकाळी ११वाजता.

————————-
नागपूर
पहिले आदिवासी धनगर साहित्य संमेलन दि.७|८|जानेवारी २०१७ रोजी सोलापुरात झाले.अध्यक्ष प्राख्यात लेखक व ईतिहास संशोधक संजय सोनवणी हे होते. स्वागताध्यक्ष समाज सेवक मा.जयसिंग तात्या शेंडगे होते.न भुत्तो न भविष्यते असे भरगच्च राष्ट्रीय पातळीवरील दोन दिवस साहित्य संमेलन झाले.दुसरे संमेलन लातूर येथे तीन दिवस झाले. अध्यक्षा प्रशासकीय अधिकारी संगिता धायगुडे या होत्या .स्वागताध्यक्ष ऐडव्होकेट आण्णाराव पाटील हे होते.उद्घाटक प्राख्यात रान कवी नां.धो. महानोर होते.

तिसरे साहित्य संमेलन म्हसवड येथे तिन दिवस धुम धडाक्यात झाले संयोजक, स्वागताध्यक्ष मा.बाळासाहेब कर्णवर पाटील.तडफदार कर्तुत्वान, दात्रुतवान,चेरमन श्री श्री सद्गुरू साखर कारखाना हे होते.खरोखरच बाळासाहेब कर्णवर पाटील यांनी एक हाती संमेलन घेतले. उद्घघाटक मा.सुशिलकुमार शिंदे साहेब मा.मुख्यमंत्री, मा .केंद्रीय गृह मंत्री हे होते.अध्यक्ष डॉ मुरहरी केळे संत साहित्य अभ्यासक व त्रिपुरा राज्य महावितरण चे कार्य कारी संचालक हे होते.

चौथे साहित्य संमेलन ही जाहीर झाले होते. स्वर्गीय मा.आमदार गणपतराव देशमुख साहेब यांच्या हयातीत त्यांच्या साठी हे संमेलन आयोजित करण्यात आले होते. सर्व तयारी पूर्ण झाली होती.आमचा खर्च ही खूप झाला होता.ऐन वेळेस संमेलन रद्द करावे लागले. संमेलनावर दुसराही आघात झाला स्वर्गीय मा.आमदार गणपतराव देशमुख साहेब अचानक सोडून गेले.ते आम्हास म्हणाले होते कसे करा संमेलन घ्या पण माझ्या पर्यंत काहीही येवू देवू नका? स्वर्गीय मा.आमदार गणपतराव देशमुख यांनीही खूप वर्षांपूर्वी सांगोला येथे साहित्य संमेलन घेतले होते त्याची आठवण ही त्यांनी सांगितली.सूतगिरणी कार्यालयातील जुने फोटोही दाखवले.

या साहित्य संमेलनाचे बरेच सोपस्कार पूर्ण झाले आहेत. संमेलन अध्यक्ष म्हणून प्राचार्य आर एस चोपडेसर यांची निवड केली आहे. संमेलन स्वागताध्यक्ष शिंगाडे सर आहेत. सांगोल्यातील अनेक मान्यवर सक्रिय सहभागी आहेत.

फेर पत्रीका फेर नियोजन करावे लागणार आहे.खरतरं हे साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्यातील तमाम धनगर जमातीचे अनेक समाज सेवक, अनेक अधिकारी कर्म चारी, शिक्षक, साहित्यीक,पत्रकार, उद्योजक, यांनी स्वत:च्या खांद्यावर घेतलेले आहे. हे लोक समाजाचे खरे आधार स्तंभ आहेत.

या साहित्य संमेलना मुळे अनेक प्रतिभावतांना व्यासपीठ मिळाले आहे.धनगर जमात प्रवाहात नाही पण मिडीयात आली आहे. होळकर शाहीचे लेखक संशोधक राम लांडे यांच्या म्हणण्यानुसार या साहित्य संमेलनामुळे धनगर जमातीचा ईतिहास राजकीय पटलावर आला आहे. मी म्हणेल साहित्य संमेलनामुळे धनगर जमात प्रवाहा मध्ये येत आहे.

मी कालच आपले पहिले अध्यक्ष संजय सोनवणी सर यांच्याशी चर्चा केली. दुसर्या साहित्य संमेलनात संजय सोनवनी सरांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्यावर दोनशे भागाची मालीका काढायचे ठरले होते.काढली. देशात एकच नंबर मालीका चालू आहे. कर्नाटक राज्यात मालीकेचा टीआरपी एक नबंर आहे. मी काल आणखी आग्रहाची विनंती केली भारतीयांचा नेपोलियन यशवंतराव होळकर यांच्यावर लवकरात लवकर मालीका काढा किंवा सिनेमा काढा. चाचपणी चालू आहे.संतोष कोल्हे हे या साठी चाचपणी करत आहेत. लवकरच यश मिळेल अशी अशा करूया.

अशा तर्हेने हे साहित्य संमेलन समाजाचे अनेक पैलू उघडत आहेत.

अनेक लोक म्हणतात धनगर जमात एक होत नाही.मी म्हणतो ९९.९९% धनगर जमात वेळ आली की एक होते. विविध पक्षात सक्रिय असलेले नेते व सामाजिक संघटनांचे स्वयंघोषित नेते एकत्र नाहीत. ते समाजा साठी काम करत नाहीत ते बिचारे पोटभरू आहेत.किंवा राजकीय पक्षाने दिलेल्या पदाच्या बदल्यात समाजा मध्ये फुट पाडत असतात. ते त्यांनी करायला पाहिजे नाहीतर पक्ष त्यांना काढून टाकेल.

साहित्य संमेलना मुळे लोक जागृत झाले आहेत होत आहेत. माझे मत आहे सांगोला तालुक्यातील धनगर जमातीचा आदर्श संपूर्ण महाराष्ट्र राज्याने घेतला पाहिजे.कारण सांगोला तालुक्यातील धनगर जमात कोणतिही अपेक्षा न करता जमातीचे राजकीय शक्ती फक्त जमातीलाच मिळाली पाहिजे या हेतुने काम करत आहेत. सांगोल्याचा आदर्श संपूर्ण महाराष्ट्र राज्याने घ्यावा या हेतूनेच आपण हे संमेलन घेऊया.स्वर्गीय मा.आमदार गणपतराव देशमुख यांचा आदर्श संपूर्ण महाराष्ट्र राज्याने घ्यायला हवा.या हेतूनेच हे संमेलन सांगोला येथे आयोजित करण्यात गरज आले आहे.साहित्य संमेलन आणि धनगर धर्म पीठ या दोन्हीही संस्थाच्या दोन वेबसाईट निर्माण केलेल्या आहेत.यां वेबसाईट चे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दि.१|५|२०२२ रोजी करण्यात येणार आहे.या मुळे जगभरातील संबधित सर्व क्षेत्रातील लोकांना धनगर साहित्य आणि धनगर धर्माची माहिती उपलब्ध होणार आहे.तसेच साहित्य आणि धर्म या साठी योगदान दिलेल्या सर्व कार्यकर्ते व मान्यवर यांची माहितीही या वेबसाईट वर टाकली जाईल.
तरी क्रुपया राज्यातील, शिक्षण,समाज, साहित्य, सांस्कृतिक, धर्म, सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून सुजाव, मार्गदर्शन, योगदान द्यावे.तसेच राग, लोभ, काम, क्रोध, संशय,जात, धर्म, सर्व भेद विसरून राजकीय पक्षाचे जोडे बाहेर काढून जमातीच्या व्यासपीठावर सर्वांचे स्वागत आहे.

आपले विनीत:
प्रा.डॉ. अभिमन्यु टकले (संस्थापक धनगर साहित्य संमेलन, धनगर धर्म पीठ महाराष्ट्र राज्य.)
श्री संभाजीराव सुळ उपाध्यक्ष धनगर साहित्य संमेलन.
श्री बाळासाहेब कर्णवर पाटील. मार्गदर्शक.
श्री प्राचार्य आर एस चोपडे सर अध्यक्ष ४थे आदिवासी धनगर साहित्य संमेलन सांगोला.
श्री बबन बरकडे उपाध्यक्ष धनगर धर्म पीठ.
श्री सोमनाथ कर्णवर पाटील एपिआय, सदस्य.
श्री चंद्रकांत हजारे प्रवक्ते धनगर साहित्य संमेलन.
संयोजन समिती धनगर साहित्य संमेलन सांगोला
श्री संजय शिंगाडे सर
स्वागताध्यक्ष तथा प्रमुख संयोजन समिती ४थे आदिवासी धनगर साहित्य संमेलन सांगोला महाराष्ट्र राज्य.
श्री कुङंलीक आलदर संयोजक.
श्री विष्णु देशमुख कार्याध्यक्ष. प्राचार्य रामचंद्र जानकर खजिनदार.
श्री कृष्णा बुरूंगुले संचालक सदस्य.

सन्माननीय सदस्य
डाॅ.रमेश सिद, श्री कुङंलीक एरंडे,श्री बाळासाहेब एरंडे.श्री भीवा कांबळे,श्री सुबराव बंडगर, श्री आबासाहेब मोटे,श्री उल्हास धायगुडे, डाॅ.विजय बंडगर,प्रा.बाळक्रुष्ण कोकरे,श्री राजेंद्र देशमुख, वकिल टी डी ढेरे, श्री बंडोपंत येडगे,श्री दत्तात्रय जानकर, श्री विजयकुमार वाघमोडे,श्री दिगंबर बंटी लवटे,डाॅ.महेश राऊत,श्री अमोल खरात, ॲड. धनंजय मेटकरी,श्री परमेश्वर कोळेकर, श्री प्रवीण वाघमोडे,श्री मोहन मस्के पत्रकार, प्रा.बापूराया शिंदे

निमंत्रीत:
श्री रामराव वडकुते माजी आमदार व भाजप जिल्हाध्यक्ष हिंगोली वाशीम.
श्री ज्ञानेश्वर ढोमणे धनगर धर्म पीठ जिल्हाध्यक्ष आमरावती.
श्री अशोक हटकर सभापती
बाजार समिती खामगाव बुलढाणा.
श्री सुरेश भूमरे भाजप युवक जिल्हाध्यक्ष परभणी.
भाग्यवंत नायकुडे पत्रकार आकलुज.
बाळासाहेब टकले जि.संघटक धनगर धर्म पीठ करमाळा .
श्री विठ्ठल सजगने सर जिल्हाप्रमुख धनगर धर्म पीठ सातारा.
विजय हुबाले धनगर धर्म पीठ अध्यक्ष सांगली.

READ MORE